राष्ट्रीय ओबीसी मुक्ती मोर्चा व्दारा ओबीसी विद्यार्थी प्रश्नावर भव्य धरणा दि. २० ऑक्टो. २०२१ वेळ : दु. १ वाजता स्थळ : संविधान चौक, नागपूर येथे आयोजित करण्यात आलेला आहे.
राष्ट्रीय ओबीसी मुक्ती मोर्चा व्दारा पुढील प्रमुख मागण्या करण्यात येणार आहेत.
१) राज्यातील नैशनल लॉ विद्यापिठातील प्री व पोस्ट डिग्री प्रवेशात ओबीसी आरक्षण कायदा लागू करा.
२) सर्व डीम विद्यापीठ सलग्नित व खाजगी मेडिकल व डेन्टल व अन्य अभ्यासक्रमातील राज्य डोमीसाईल कोट्यतील प्रवेशात ओबीसीला आरक्षण नीती लागू करा व प्रवेशपात्र ओबीसी विद्यार्थ्यांना १०० टक्के फी व शिष्यवृत्ती सवलत लागू करा.
३) सरकारच्यानं काही जमत नाही म्हणून राज्य ओबीसी सुचितिल ३५० जातींना नोंदणीकृत जात संस्थे अंतर्गत (३५ जिल्ह्यात १० प्रमाणे) ५०० ( २५०+२५०) विद्यार्थ्यांकरिता होस्टेल सुरु करण्याकरिता प्रत्येकी रू ५ कोटी व दरवर्षी प्रत्येकी १ कोटी अनुदान जाहीर करा.
४) केवळ ओबीसी व मागासवर्गीय विद्यार्थ्यांकरिता ग्रामीण भागात एक वर्ष वैद्यकिय इंटरशिप करण्याचा भेदभावी निर्णय रद्द करा.
५) ग्रामीण परंपरागत बलुतेदार व्यवसायिकरिता जिल्हा व तहसिल कार्यालयात स्वतंत्र क्रीमिलेअर प्रमाणपत्र वितरण कक्ष सुरु करा.
६) ओबीसी वित्त व विकास मंडळाची प्रक्रिया जाहीर करा.
७) परदेशी ऊच्च शिक्षण शिष्यवृत्तीकरिता १०० विद्यार्थी योजना करा.
Satyashodhak, obc, Mahatma phule, Bahujan