सातारा ता. १९ : ओबीसी समाजाची जातीनिहाय जनगणना करावी तसेच, ओबीसींना राजकीय आरक्षण मिळावे, या मुख्य मागण्यांसाठी सातारा जिल्हा ओबीसी महिला संघटनेच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे धरण्यात आले. या वेळी संघटनेच्या कार्याध्यक्ष शांता जानकर, सुनीता दीक्षित, दीपाली लोहार, शुभांगी लोहार, मंगला फरांदे, अर्चना दीक्षित आदी उपस्थित होत्या.
याबाबत निवेदनात म्हटले की, पाचवी ते दहावीतील स्वसंरक्षणासाठी ज्युदो कराटेचे प्रशिक्षण सक्तीचे करावे. देशात दर दहा वर्षांनी जनगणना केली जाते. आता २०२१ मध्ये ऑनलाइन जनगणना होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या जनगणनेत केंद्र सरकारने तयार केलेल्या चौकटीत ओबीसी समाजाचा कोणताही कॉलम नाही. याबाबत ओबीसी समाजाची जातीनिहाय जनगणना करण्यासाठी देशातील अनेक नेते आग्रही असताना समाजाच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे. पुढील काळात ओबीसी समाजाची जातीनिहाय जनगणना करण्यासाठीचा निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा संघटनेने दिला आहे.
Satyashodhak, obc, Mahatma phule, dr Babasaheb Ambedkar, Bahujan