राष्ट्रीय ओबीसी महासंघाची सभा जाधव विद्यालय, मोसमपुल मालेगाव (नाशिक) येथे पार पडली. यावेळी महासंघाचे सहसचिव शरद वानखेडे यांनी ओबीसींनी एकत्र येऊन काम करावे असे सांगितले. महासंघाच्या माध्यमातून शासनाकडून काही मागण्या मान्य करून घेतल्या महाराष्ट्र शासनाकडे ३४ व केंद्र सरकारकडे २० मागण्या केल्या आहेत असे ते बोलले.तसेच इतर मागासवर्गीयांना मागासवर्गीयांप्रमाणे सवलती मिळायला हव्यात असे आग्रही प्रतिपादन केले. व्यासपीठ हे विचारपिठ बनावे यासाठी प्रयत्नशील असावे असेही त्यांनी सुचविले.
यावेळी राष्ट्रीय ओबीसी युवा अध्यक्ष सुभाष घाटे यांनी आपल्या तेज वाणीने सभेत चैतन्य निर्माण केले. ते म्हणाले,ओबीसींनी खुप सहन केले आहे. आता लढा उभारावा. यावेळी प्रदेशाध्यक्ष कल्पना मानकर, कार्याध्यक्ष ज्योती ढोकणे यांनीही सभेस मार्गदर्शन केले.मालेगाव ओबीसी संघटनेचे अध्यक्ष रमेश उचित यांनी ओबीसींच्या मागण्यांसाठी लढ्याला पाठिंबा आहे असे सांगितले. नाशिक विभागीय अध्यक्षा स्वाती वाणी यांनी सभेचे आयोजन केले होते. यावेळी जिल्ह्याच्या विविध भागातून महिला प्रतिनिधी मोठ्या संख्येने हजर होते. मालेगाव ओबीसी संघटनेचे मनोहर कासार, राजेंद्र चौधरी, अशोक पठाडे,बाळासाहेब पवार, सुनिल वडगे, राजेंद्र अहिरे, राजेंद्र वडगे, विजय भावसार, मयूर वांद्रे, शरद दुसाने, शाबान तांबोळी, रविराज सोनार, विजय वडगे इ. सहीत अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. नियोजन व्यवस्था प्रविण वाणी यांनी चोख ठेवली.