रविवार, दिनांक १७ ऑक्टोबर रोजी चाळीसगावला, समाज प्रबोधिनी बहुुद्देशिय संस्थेतर्फे आयोजित "खान्देशातील आंबेडकरी चळवळ खंड - १" या ग्रंथाच्या प्रकाशन सोहळ्या व चर्चासत्रात . प्रा.गौतम निकम व सहका-यांनी हाती घेतलेल्या ग्रंथप्रकल्पातील ४ खंडांपैकी खंड १ चे प्रकाशन आदरणिय ज. वि. पवार सरांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाचे अध्यक्ष कॉ. सुबोध मोरे हे होते. प्रा. भि. ना. पाटील व चाळीसगाव, धुळे, नंदुरबार मधील अनेक मान्यवर मंडळी सदर कार्यक्रमास मोठ्या प्रमाणात उपस्थित होती.
प्रा.निकम सरांच्या ३० वर्षाच्या ध्यासातुन हा ग्रंथ साकार झाला असुन या ग्रंथाच्या माध्यमातुन खानदेशातील आंबेडकरी चळवळीचा अज्ञात ईतिहास महाराष्ट्रातील जनतेसमोर येत आहे. खानदेशाशी असलेला बाबासाहेबांचा संबंध, बाबासाहेबांसोबत व नंतर काम करणा-या कार्यकर्त्यांनी नेतृत्वाशिवाय खडतर परिस्थितीत कश्या रितीने चळवळ कशी चालवली याची महत्वपुर्ण, संदर्भापुर्ण माहीती सदर ग्रंथात उपलब्ध आहे. अभ्यासकांसाठी हा ग्रंथ अतिशय मोलाचा ठरणार आहे.
कार्यक्रमाची सुरवात प्रज्ञा निकम यांच्या दमदार आवाजातील भीम गीताने झाली. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते ज. वी. पवार सरांनी खानदेशाशी चळवळीच्या निमित्ताने आलेला संबंधावर प्रकाश टाकला. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे साहीत्य प्रकाशनात त्यांनी पार पाडलेली महत्वाची भुमिका अनेकांना प्रथमच समजली असेल. त्यांनी या खंडाच्या लिखाणासाठी प्रा. निकम यांचे अभिनंदन करुन हे फार मोठ काम असल्याची गौरवोद्गार काढले. कॉ. सुबोध मोरे यांनी सुद्धा प्रा. निकम याच्याबद्दल गौरोद्गार काढून खानदेशातील चळवळ लोकांसमोर आणल्याबद्दल अभिनंदन केले. प्रा.गौतम निकम यांनी हा खंड लिहीण्याची प्रेरणा त्यांना कशी मिळाली व त्यासाठी त्यांसाठी आवश्यक संदर्भ गोळा करताना त्यांना कोणकोणत्या अडचणींवर मात करावी याबाबत उपस्थितांना अवगत केले. त्याच्या भाषणातुन चाळीसगावात असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थिकलशाविषयी आनेकांना पहील्यांदाच माहीती मिळाली. या प्रसंगी प्राचार्य भी. ना. पाटील, प्रा. सतिश म्हस्के यांनी सुद्धा त्यांचे मनोगत व्यक्त केले.
दुस-या सत्रात झालेल्या चर्चासत्रात कॉ. सुबोध मोरे, शमिभा पाटील, प्रा. राजश्री पगारे, प्रा. संबोधी देशपांडे यांनी त्यांचे विचार व्यक्त केले. सामाजिक विषमता दुर करण्यासाठी "बौद्धधम्माची उपयोगिता" या विषयावर चर्चा झााली. वेळेअभावी वक्त्यांना विषयाची हवी तशी मांडणी करता आली नाही.
कल्पतेश देशमुख यांनी या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले. कार्यक्रमात उपस्थितांनी स्वत:च नाव असलेलं कृत्रिम पानं पानगळ झालेल्या बोधीवृक्षाला लावण्याची आगळी-वेगळी कल्पना आयोजकांनी राबवली. तसेच खानदेशातील अनेक सामजिक संस्थांचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या कामाची दखल घेऊन त्यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला.
Satyashodhak, dr Babasaheb Ambedkar, Bahujan