जिल्हा राष्ट्रीय ओबीसी बहुजन शिक्षक लातूर संघाच्या वतीने प्रदेशाध्यक्ष अनिल नाचपल्ले यांच्या वाढदिवसा निमित्त अभिष्टचिंतन

     राष्ट्रीय ओबीसी बहुजन शिक्षक संघाचे प्रदेशाध्यक्ष अनिल नाचपल्ले यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून लातूर जिल्हा कार्यकारिणीने त्यांचा वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळा दिनांक पाच जून रोजी हॉटेल वैष्णवी रिंग रोड लातूर येथे आयोजित केला व महाराष्ट्रातील संघटना बांधणी चा शुभारंभ यानिमित्ताने केला. प्रथमतः क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. राज्यातील अनुसूचित जाती, जमाती तथा इतर मागासवर्गीय अशा बहुजन शिक्षकांची ही राज्यवापी संघटना, आपल्या संविधानिक हक्क व न्यायासाठी लढणारी, बहुजन हिताय बहुजन सुखाय" हे ब्रीदवाक्य उराशी बाळगून काम करणारी महाराष्ट्रातील बहुजनांची एकमेव संघटना आहे अशा प्रकारचे प्रास्ताविक यजमान जिल्हाध्यक्ष हिरालाल पाटील यांनी केले.

Latur OBC Shikshak Sangh cha Anil Nachpalle Vadhdivas Samaroh

     राष्ट्रीय ओबीसी बहुजन शिक्षक संघाच्या वतीने येणाऱ्या कालावधीमध्ये विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचा प्रश्न असो की वस्तीगृहाचा प्रश्न, कर्मचाऱ्यांच्या नॉन क्रिमीलेअरचा प्रश्न असो की पदोन्नतीचा प्रश्न, समाजातील महाज्योतीतीच्या मार्फत मिळणारा निधी असो की इतर राज्य तथा केंद्र सरकारच्या योजना असो या सर्व बाबीवर राष्ट्रीय ओबीसी बहुजन शिक्षक महासंघ नियोजनबद्ध काम करणार असल्याचे या बैठकीतून निष्पन्न झाले.. महाराष्ट्रातील जिल्हा परिषदेच्या शाळा संच मान्यतेच्या नावाखाली, पट संख्येच्या नावाखाली बंद पाडण्याचा घाट या शासनाने घातला आहे. बहुजनांची मुलं या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिकत असतात त्यामुळे या शाळा बंद करू नये. असा ठराव एकमताने घेणेत येऊन हजारो शिक्षक अतिरिक्त ठरवणारा 15 मार्च 2024 चा शासन निर्णय तात्काळ रद्द करण्यात यावा अशी एकमुखी मागणी करण्यात आली. शिक्षकांच्या बदल्यांचा प्रश्न हा असाच रेंगाळत कासव गतीने सुरू आहे त्यामुळे आंतरजिल्हा बदली असो की जिल्हांतर्गत बदली असो हा शिक्षकांचा अगदी जिव्हाळ्याचा प्रश्न शासन हाताळण्यात सपशेल अपयशी ठरत आहे त्यामुळे येणाऱ्या कालावधीमध्ये बदली प्रक्रिया ही विहित कालावधीतच झाली पाहिजे त्यामुळे याही बाबीचा ठराव घेऊन शासनाला पाठवणार असल्याचे सुतोवाच प्रदेश सरचिटणीस संतोष भोजने यांनी केले. लातूर जिल्ह्यातील सर्व दहा तालुक्यांमध्ये राष्ट्रीय ओबीसी बहुजन शिक्षक महासंघ येणाऱ्या काही दिवसात तालुका निहाय शाखा गठित करून एक आदर्श "लातूर पॅटर्न" महाराष्ट्राला देईल अशा प्रकारची ग्वाही जिल्हाध्यक्ष हिरालाल पाटील यांनी दिली.. राज्यातील महिला शिक्षिकाना संघटित करून, महिलांचे अनेक प्रश्न शासन दरबारी मांडून, महिलांना न्याय देण्यासाठी आपल्यावर संघटनेने मोठी जबाबदारी दिली आहे ती जबाबदारी मी नक्कीच पूर्ण करेल. मला आपल्या सर्वाच्या सहकार्याची अपेक्षा आहे. अशी अपेक्षा महिला प्रदेशाध्यक्ष रेखाताई सुडे यांनी वेक्त केली. महाराष्ट्रातील संघाचा पहिला जिल्हाध्यक्ष होण्याचा मान धाराशिव जिल्ह्याला मिळाला असून आजीवन सभासद तथा सामान्य सभासद सर्वात जास्त करून तिथे ही पहिल्या क्रमांकावर जिल्हा राखण्यात आम्ही नक्कीच यशस्वी होऊ असा निर्धार धाराशिव जिल्हाध्यक्ष अनंत फुलसुंदर यांनी केला. आपली संघटना ही महाराष्ट्र राज्याचे माजी शिक्षक आमदार आदरणीय बाळाराम पाटील साहेब व महाराष्ट्र राज्याचे माजी राज्य मागासवर्गीय आयोगाचे सदस्य आदरणीय बी.एल. सगर किल्लारीकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असून महाराष्ट्र मध्ये सर्व जिल्हानिहाय शाखा गठीत होत असून येणाऱ्या कालावधीमध्ये बहुजनांचे शिक्षण वाचवण्यासाठी, विद्यार्थी हित जपण्यासाठी, समाज प्रबोधन करण्यासाठी आपण सर्व जबाबदार घटक या नात्याने काम करून महाराष्ट्रामध्ये एक आदर्श संघटना निर्माण करण्याचे आवाहन प्रदेशाध्यक्ष अनिल नाचपल्ले यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून वेक्त केले.

     या सभेला महाराष्ट्र भरातून संघाच्या महिला प्रदेशाध्यक्षा श्रीम. रेखाताई सुडे, राज्य सरचिटणीस संतोषजी भोजने, मराठवाडा विभागीय अध्यक्ष संजयजी मळभागे, धाराशिव जिल्हाध्यक्ष अनंत फुलसुंदर, हिंगोली जिल्हाध्यक्ष लहू राक्षे,लातूर जिल्हाध्यक्ष हिरालाल पाटील, संघाचे मार्गदर्शक लक्ष्मण दावणकर, मंगेश सुवर्णकार, राज्य समन्वयक अभय पाटील, संजय तुरीवाले, हरीनंद सगर, गोविंद सगर, अनंत फुलसुंदर, योगीराज कुंभार, भास्कर कांबळे, संजय बनकर, बालाजी माळी, भास्कर कांबळे, बालाजी चंटमपल्ले, अभय बिरादार, रवी मद्देवाड, सोमनाथ लोखंडे, श्रीकांत मद्दे, रविभाऊ गुट्टे, मनमत तोडकर, भारत पंडीकोंडे, सचिन मुंडे, के. के. फडणीस, आर. बी. राठोड, श्रीमती गुणाले मॅडम, श्री. एम. जे. मुंडे, श्री. ए.बी. तेलंगे, श्री. एन. बी. उपलाई, श्री. सुरनर सर, श्री. निरगुडे सर, श्री. बालाजी माळवदकर, सौ. मीनाताई शिरसागर, श्रीम. उषाताई शिंदे, मंगेशजी सुवर्णकार, लक्ष्मणजी दावणकर, सुदर्शन पाटील, दत्तात्रय बिराजदार श्री. गोविंद सगर, श्री. गोविंद नीलामे, श्री. भरत पंदकोंडे, श्री. मुरलीधर मनदुमले, श्री. प्रमोद गुंठे, आदी पदाधिकारी उपस्थित होते. मराठवाडा विभागातील सर्व जिल्हाध्यक्ष यांनी ही सभेला आवर्जून उपस्थिती लावली. सभेचे बहारदार सूत्रसंचालन हिरालाल पाटील यांनी तथा आभार प्रदर्शन लहू राक्षे यांनी केले.

Satyashodhak, obc, dr Babasaheb Ambedkar, Bahujan, Mandal commission
Share on Twitter
Phule Shahu Ambedkar फुले - शाहू - आंबेडकर
Youtube Educational Histry
यह वेबसाईट फुले, शाहू , आंबेडकर, बहुजन दार्शनिको के विचार और बहुजनसमाज के लिए समर्पित है https://phuleshahuambedkars.com

About Us

It is about Bahujan Samaj Books & news.

Thank you for your support!

इस वेबसाइट के ऊपर प्रकाशित हुए सभी लेखो, किताबो से यह वेबसाईट , वेबसाईट संचालक, संपादक मंडळ, सहमत होगा यह बात नही है. यहां पे प्रकाशीत हुवे सभी लेख, किताबे (पुस्‍तक ) लेखकों के निजी विचर है

Contact us

Abhijit Mohan Deshmane, mobile no 9011376209