वर्धा लोकसभेकरिता प्रवीण वानखडे करणार - राष्ट्रीय ओबीसी महासंघाची उमेदवारी

     वरुड - राज्यात होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्षाचे उमेदवार जाहीर होत आहे.

     राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांच्या आदेशाने राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे विदर्भ उपाध्यक्ष प्रवीण वानखडे यांची वर्धा लोकसभा मतदार संघाकरीता उमेदवार म्हणून वर्णी लागली असल्याची माहिती आहे. राज्यात होऊ घातलेल्या २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्षाचे उमेदवार जाहीर होत आहे. पण त्यामध्ये ओबीसी नेत्यांना अल्पप्रमाणात उमेदवारी मिळत आहे. भारतात मोठ्या संख्येने ओबीसी समाज आहे. पण दुःखाची बाब अशी की, याच ओबीसी समाजाला आताच्या परिस्थितीमध्ये किंमत कमी होत चालली आहे.

    संसदेत जर ओबीसी समाजाचा नेता नसला तर येणारया काळात ओबीसीचे आरक्षण धोक्यात यायला वेळ लागणार नाही. महाराष्ट्रात ओबीसी समाज ५४ टक्के आहे. त्यात २७ टक्के ओबीसींना आरक्षण आहे. यामध्ये व्हीजे, एनटी, माळी, तेली, धनगर, बंजारी, कुणबी अशा अनेक जाती आहेत. एवढया मोठचा समाजाचे आरक्षण संपवण्याचा घाट गेल्या काही दिवसांपासून घातला जातोय, त्यासाठी
मंत्रालयापास ून खालपर्यंतचे लोक जबाबदार आहे.

    जर खरेच ओबीसींचे प्रश्न सोडवायचे असतील तर संसदेत ह्या ओबीसी समाजाचा खरा माणून असायला हवा. यासाठी आपण सर्वांनी २०२४ च्या लोकसभा निवडणूकीत विचारांचाओबीसी माणूस निवडून आणणे गरजेचे आहे. यासाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाने मला वर्धा लोकसभेकरीता उमेदवारी दिली असून ओबीसीसह शेतकरी शेतमजूर सुशिक्षित बेरोजगारांना उद्योग यासाठी कटीबध्द व प्रयत्नशिल राहून सर्व घटकातील जनतेचे प्रश्न सोडविण्याकरीता काम करणार असल्याचे प्रवीण वानखडे यांनी म्हटले आहे.

Satyashodhak, obc, Mahatma phule, dr Babasaheb Ambedkar, Bahujan, Mandal commission
Share on Twitter
Phule Shahu Ambedkar फुले - शाहू - आंबेडकर
Youtube Educational Histry
यह वेबसाईट फुले, शाहू , आंबेडकर, बहुजन दार्शनिको के विचार और बहुजनसमाज के लिए समर्पित है https://phuleshahuambedkars.com

About Us

It is about Bahujan Samaj Books & news.

Thank you for your support!

इस वेबसाइट के ऊपर प्रकाशित हुए सभी लेखो, किताबो से यह वेबसाईट , वेबसाईट संचालक, संपादक मंडळ, सहमत होगा यह बात नही है. यहां पे प्रकाशीत हुवे सभी लेख, किताबे (पुस्‍तक ) लेखकों के निजी विचर है

Contact us

Abhijit Mohan Deshmane, mobile no 9011376209