निराधार विद्यार्थ्यांचा सारथी - "उमेश कोर्राम"

     तथाकथित गाजलेल्या ओबीसी नेत्यांना खजिल करणारे काम एका सामान्य निराधार कुटुंबातील परिक्षार्थीने महाज्योती ही ओबीसी विद्यार्थ्यांसाठीची संस्था जन्माला घालून करून दाखविले ।

    ओबीसी नावाने ढोल वाजवून 30-- 40 वर्षांपासून राजकारण शेकणा-या व राजकारणात आपली पुढची स्थापित करणा-या भुजबळ वडेट्टीवार मुंढेंना लाजवेल अशी क्रांतिकारी योजना-संस्था, upsc परिक्षार्थी प्रा.उमेश कोर्रामने बनवून दाखविली ।

Real Founder of mahajyoti for Other Backward class Students umesh korram     एससी एसटी ओबीसी वीजेएनटी एनटी एसबीसी अशा सर्व मागास समाजातील विद्यार्थ्यांना लाभदायी ठरेल अशा मागण्या सरकार दरबारी पोहचवत विद्यार्थ्यांना निःशुल्क सेवा सुविधा देणारे हुनरबाज विद्यार्थी नेतृत्व उमेश कोर्राम सध्या सर्व राज्याच्या विद्यार्थ्यांमध्ये दिल्लीत कौतुकाचा विषय झाला आहे । अने राज्यांच्या विद्यार्थ्यांनी आपापल्या राज्यात या योजनांसाठी आज दिल्लीत उमेश कोर्राम यांची भेट घेतली.

    जवळपास एक महिना घर सोडून मुंबईत ठाण मांडून वारंवार बैठक भेटीगाठी कागदपत्र, मुख्यमंत्र्यांची भेट, विधानसभेत मुद्द्द्दा उपस्थित करणारे सदस्य आमदार शोधणे, विषय देणे, आदी कामासाठी चालतेबोलते कार्यालय उमेश आणि टीमने चालवले. या सर्व घडामोडीपाठीवर बारकाईने नजर व सूचना करणारे कमलेश पाटील यांचे संचालन कमी येत होते ।

    बार्टी TRTI सारथी च्या धर्तीवर obc विद्यार्थ्यांसाठी एक स्वतंत्र संस्था असावी यासाठी दि.26 मार्च 2019 पहिला प्रताव तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना स्टुडंट यूनियन असोसिएशन आॅफ इंडिया तर्फे पहिला प्रस्ताव दिला गेला. नंतर चालू असलेल्या विधानसभा अधिवेशनात विषय मार्गी लागण्यासाठी उमेश कोर्राम, रणजित ठिपे,

     आकाश बांबोडे, नीतीन ईंगळे, किरण परदेशी, प्रशांत उंदिरवाडे याच्या चमूच्या कठिण मेहनतीचे योगदान मैदान मारत राहिले. उमेशने, आमदार बच्चूभाऊ कडू जितेंद्र आव्हाड छगन भुजबळ धनंजय मुंढे खा.इम्तियाज जलील यांना भेटून, मुख्यमंत्री फडणवीस व संबंधित विभागाचे मंत्री डॉ संजय कुटे, सारथीचे संचालक परिहार सर यांच्याशी वारंवारच्या भेटीगाठी ते विधानसभेतील प्रस्ताव मंजूरी व संस्थेचे नाव महात्मा ज्योतिबा फुले यांच्या नावावरून महाज्योती ठरवण्यापर्यंत उमेश कोर्राम जी ने सक्रिय भूमिका निभावली. सहज साधारण स्वभावाचा माणूस अधिकारी म्हणून परिहार यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Satyashodhak, obc, Mahatma phule, dr Babasaheb Ambedkar, Bahujan, Mandal commission
Share on Twitter
Phule Shahu Ambedkar फुले - शाहू - आंबेडकर
Youtube Educational Histry
यह वेबसाईट फुले, शाहू , आंबेडकर, बहुजन दार्शनिको के विचार और बहुजनसमाज के लिए समर्पित है https://phuleshahuambedkars.com

About Us

It is about Bahujan Samaj Books & news.

Thank you for your support!

इस वेबसाइट के ऊपर प्रकाशित हुए सभी लेखो, किताबो से यह वेबसाईट , वेबसाईट संचालक, संपादक मंडळ, सहमत होगा यह बात नही है. यहां पे प्रकाशीत हुवे सभी लेख, किताबे (पुस्‍तक ) लेखकों के निजी विचर है

Contact us

Abhijit Mohan Deshmane, mobile no 9011376209