अखिल मानवजातीच्या कल्याणाची ताकद संत गाडगे बाबा यांच्या विचारांमध्ये आहे.

राष्ट्रीय उपाध्यक्ष एकनाथराव बोरसे खेड येथे संत गाडगेबाबा सभागृहाचा उद्घाटन सोहळा संपन्न

     खेड : महाराष्ट्रातील परीट समाजातील समाज बांधव बंधु भगिनी व गाडगेबाबा अनुयायी यांनी दिलेल्या लोकवर्गणीतून परीट समाज संस्था खेड, ता. खेड, जि. रत्नागिरी. या संस्थेच्या वतीने संत गाडगे बाबा यांचा अर्धाकृती पुतळा असलेले नुतन सभागृह बांधण्यात आले आहे. उद्घाटन समारंभ अध्यक्षस्थानी अखिल भारतीय धोबी महासंघ राष्ट्रीय उपाध्यक्ष एकनाथराव बोरसे शिरपूर हे होते. या सभागृहाचा उद्घाटन महाराष्ट्र परिट (धोबी) सेवा मंडळ प्रदेशा ध्यक्ष राजेंद्र खैरनार, महाराष्ट्र परिट (धोबी) सेवा मंडळ संत गाडगे बाबा स्मारक बांधकाम समिती प्रदेशाध्यक्ष दिलीपराव शिंदे, आरक्षण समिती प्रमुख तथा उद्योजक आशिष कदम, अध्यक्ष डि. डि. सोनटक्के यांचा हस्ते दि. १० डिसेंबर रोजी खेड (कुंभारआळी) ता. खेड, जि. रत्नागिरी येथे संपन्न झाला.

     यावेळी महाराष्ट्र परिट (धोबी) सेवा मंडळ प्रदेश उपाध्यक्ष शांताराम कदम, महाराष्ट्र परिट (धोबी) सेवा मंडळ प्रदेश उपाध्यक्ष अरुण धोबी, कोकण विभागिय अध्यक्ष बळवंतराव साळुंके, तंटामुक्ती समिती प्रदेशाध्यक्ष ज्ञानेश्वर गवळी, आरक्षण समिती सल्लागार सुधीर खैरनार, महिला मंडळ प्रदेश कार्याध्यक्ष सुषमा अमृतकर, आरक्षण समिती सचिव संतोष सवतीलकर, मुरलीधर शिंदे, नाशिक जिल्हाध्यक्ष विजय शिरसाठ आदि प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित होते. प्रथम संत गाडगे बाबा यांचा ६७ व्या स्मृतीदिना निमित्तानं खेड येथील संत बाबा
यांच्या पुतळ्यास मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी बोलतांना अखिल भारतीय धोबी महासंघ राष्ट्रीय उपाध्यक्ष एकनाथराव बोरसे यांनी अखिल मानवजातीच्या कल्याणा ची ताकद संत गाडगे बाबा यांचा विचारांमध्ये आहे. शेंगांव ता. दर्यापुर जि अमरावती संत गाडगे बाबा यांची कर्मभुमी, जन्मभुमी असुन संत गाडगे बाबा यांनी त्यांचे जिवनात खुप महान कार्य केले आहे. त्यांचे विचार जिवंत राहावे व लोकाभीमुख राहुन त्यांच्या विचाराची प्रेरणा मिळावी. या करीता संत गाडगेबाबा सभागृह बांधले गेले असुन, संत गाडगेबाबांनी महाराष्ट्रात स्वच्छता व व्यसनमुक्ती करिता आपले सर्व जीवन खर्ची घातले. समाजातील व्यसनाधिनता दुर होवून समाज सुशिक्षित व सुसंस्कृत व्हावा यासाठी आयुष्यभर किर्तनामधुन उपदेश करित राहिले. संत गाडगेबाबांनी जनतेला स्वच्छता व व्यसनमुक्तींचा संदेश दिला. असे प्रतिपादन अखिल भारतीय धोबी महासंघ राष्ट्रीय उपाध्यक्ष एकनाथराव बोरसे यांनी केले. संत गाडगेबाबा परीट समाज संस्था खेड अध्यक्ष अशोक जांभूळकर यांच्या मार्गदर्शना खाली उद्घाटनाचा कार्यक्रम संपन्न झाला. परीट समाज आरक्षण समन्वय समिती प्रदेश युवक उपाध्यक्ष संतोष शिंदे हे स्वागताध्यक्ष म्हणून होते. कार्यक्रमासाठी खेडच्या संत गाडगेबाबा परीट समाज संस्थेच्या वतीचे पदाधिकारी यांनी परिश्रम केले.

Satyashodhak, obc, Mahatma phule, dr Babasaheb Ambedkar, Bahujan, Mandal commission
Share on Twitter
Phule Shahu Ambedkar फुले - शाहू - आंबेडकर
Youtube Educational Histry
यह वेबसाईट फुले, शाहू , आंबेडकर, बहुजन दार्शनिको के विचार और बहुजनसमाज के लिए समर्पित है https://phuleshahuambedkars.com

About Us

It is about Bahujan Samaj Books & news.

Thank you for your support!

इस वेबसाइट के ऊपर प्रकाशित हुए सभी लेखो, किताबो से यह वेबसाईट , वेबसाईट संचालक, संपादक मंडळ, सहमत होगा यह बात नही है. यहां पे प्रकाशीत हुवे सभी लेख, किताबे (पुस्‍तक ) लेखकों के निजी विचर है

Contact us

Abhijit Mohan Deshmane, mobile no 9011376209