इंदापूरच्या सभेत फलटण तालुक्याची ताकद दाखवू - गिरीश बनकर

     सोमंथळी - सध्या सुरू असलेल्या आरक्षण विषयक प्रश्नावर समोरच्या बाजूने सभांवर व सभा घेतल्या जात आहेत त्यात संविधानिक पध्द्तीने मागणी न करता फक्त ओबीसी नेते व विषेशतः ना छगन भुजबळ यांच्यावर खालच्या पातळीत टीका केली जात आहे. ओबीसी आरक्षणावर बोलणाऱ्या ना भुजबळ साहेबांना ताकद देण्यासाठी फलटण तालुक्यातून मोठ्या संख्येने ओबीसी बांधव जाणार आहेत. या सभेसाठी आपण सर्वजण महिला व तरुण मोठ्या संख्येने उपस्थित रहा असे आवाहन ओबीसी संघर्ष समितीचे युवा कार्यकर्ते व आरक्षण अभ्यासक गिरीश बनकर यांनी विठ्ठलवाडी ता फलटण येथे बैठकी दरम्यान केले ओबीसी आरक्षण संघर्ष समितीच्या बैठका गावो गावी सुरू आहेत त्यातील काल रात्री झालेल्या विठ्ठलवाडी,शिंदेंमळा तरडगाव येथील बैठकींना ओबीसी बांधवांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला यावेळी समाज बांधवांना ओबीसी आरक्षणाची आकडेवारी सासवड ग्रामपंचायत सदस्य अमोल रासकर यांनी समजून सांगितली तर समता परिषदेचे तालुका अध्यक्ष बापूराव शिंदे यांनी सभेला जाण्यासाठी केलेले नियोजन सांगितले या सभेसाठी सर्वांनी घराला कुलूप लावून मोठ्या संख्येने उपस्थित रहा असे आवाहन या वेळी त्यांनी केले.

Phaltan taluka in Indapur OBC meeting

Satyashodhak, obc, Mahatma phule, dr Babasaheb Ambedkar, Bahujan, Mandal commission
Share on Twitter
Phule Shahu Ambedkar फुले - शाहू - आंबेडकर
Youtube Educational Histry
यह वेबसाईट फुले, शाहू , आंबेडकर, बहुजन दार्शनिको के विचार और बहुजनसमाज के लिए समर्पित है https://phuleshahuambedkars.com

About Us

It is about Bahujan Samaj Books & news.

Thank you for your support!

इस वेबसाइट के ऊपर प्रकाशित हुए सभी लेखो, किताबो से यह वेबसाईट , वेबसाईट संचालक, संपादक मंडळ, सहमत होगा यह बात नही है. यहां पे प्रकाशीत हुवे सभी लेख, किताबे (पुस्‍तक ) लेखकों के निजी विचर है

Contact us

Abhijit Mohan Deshmane, mobile no 9011376209