ओबीसी समाजाकडून पाथरी शहर कडकडीत बंद

छगन भुजबळ यांच्या विषयी बेताल वक्तव्य करणाऱ्याना तात्काळ आळा घाला... गोळी मारून ठार करण्याच्याची धमकी देणाऱ्या समाजकंटकावर गुन्हा दाखल करा

     पाथरी - महाराष्ट्रचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या विषयी बेताल वक्तव्य करणाऱ्याना तात्काळ आळा घालावा तसेच त्यांना गोळी मारून ठार करण्याच्याची धमकी देणान्या समाजकंटकावर गुन्हा दाखल करून त्यास त्वरीत अटक करण्यात यावी. तसेच गोपिचंद पडळकर यांच्यावर इंदापुर येथे झालेल्या चप्पल फैक प्रकरणी तपास करून सदर व्यक्तीवर तात्काळ गुन्हा दाखल करावा. सदर प्रकरणी समस्त भावना ओबीसी समाजाच्या दुखावल्या आहेत.

Pathri city strictly closed by OBC community     त्यामुळे ओबीसी बांधवांच्या वतीने दि. १५. रोजी पाथरी शहर बंद कडकडीत बंद करण्यात आला करून निषेध व्यक्त करण्यात आला आहे, तसेच व्यापाऱ्यांनी सकाळी आठ वाजल्यापासून प्रतिष्ठाने दुकाने बंद ठेवून या आंदोलनात उत्स्फूर्त सहभाग नोंदवल्याने आपल्या बाजारपेठेत शुकशुकाट होता. तसेच सेलू कॉर्नर येथे सकल ओबीसी समाज एकत्र आल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. आ. पडळकर यांच्यावरील हल्लयाच्या निषेधार्थ शुक्रवारी पाथरी बंद चे आवाहन करण्यात आले होते. या पार्श्वभुमीवर शहरासह तालुक्यातून समाज बांधव सकाळी एकत्र जमण्यास सुरूवात झाली. यावेळी पाथरी शहरातून निषेध रॅली काढण्यात आली. सेलू कॉर्नर चौक मार्गे ही रॅली बस स्टँड रोड, मोंढाने रॅली काढण्यात आली. यावेळी जोरद- र घोषणाबाजी करून घटनेचा निषेध नोंदविण्यात आला. संबंधितांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणीही सकल ओबीसी वतीने करण्यात आली. यावेळी बहुसंख्येने ओबीसी समाज बांधव उपस्थित होते. बंदला व्यापारी वर्गाने चांगला प्रतिसाद दिला.

Satyashodhak, obc, Mahatma phule, dr Babasaheb Ambedkar, Bahujan, Mandal commission, Savitri Mata Phule
Share on Twitter
Phule Shahu Ambedkar फुले - शाहू - आंबेडकर
Youtube Educational Histry
यह वेबसाईट फुले, शाहू , आंबेडकर, बहुजन दार्शनिको के विचार और बहुजनसमाज के लिए समर्पित है https://phuleshahuambedkars.com

About Us

It is about Bahujan Samaj Books & news.

Thank you for your support!

इस वेबसाइट के ऊपर प्रकाशित हुए सभी लेखो, किताबो से यह वेबसाईट , वेबसाईट संचालक, संपादक मंडळ, सहमत होगा यह बात नही है. यहां पे प्रकाशीत हुवे सभी लेख, किताबे (पुस्‍तक ) लेखकों के निजी विचर है

Contact us

Abhijit Mohan Deshmane, mobile no 9011376209