इतिहास एक समाजिक शाखा असून प्रत्येक ज्ञानशाखेशी तिचा संबंध आहे. कारण प्रत्येक ज्ञानशाखेला एक स्वतंत्र इतिहास असतो. उगम, विकास, विस्तार आणि हास या स्थित्यंतराची नोंद म्हणजे इतिहास होय. केवळ सनावली, घटना, कारणे आणि परिणाम यांचा वृत्तांत म्हणजे इतिहास नव्हे तर इतिहास व ऐतिहासिक साधने यांना सामाजिक परिवर्तनाच्या दृष्टीने अत्यंत महत्व आहे. समाज, साहित्य, विचार आणि इतितहास आपले मत मांडत असतो आणि त्यातूनच अलिखित मुद्रित होत असतो. ही ऐतिहासिक प्रक्रिया घडत असताना इतिहासाला काही साधनांची अत्यंत आवश्यकता असते. त्यांत भौतिक साधनांइतकेच विचार साधनेला देखील महत्व आहे परिवर्तनशील विचारामुळे समाजाला दिशा मिळते व मागदर्शन होत असते.
सद्गुरू गाडगेबाबांचे विचार सांगणे वेगळे आणि त्यांचे विचार प्रवाहाच्या काळात जगणे वेगळे, ह्यात मोठी सांस्कृतीक तफावत आहे. परिवर्तनशील सद्गुरू गागडगेबाबांचे विचार हे समाजाला इतिहास काळातून वर्तमानकाळाची जाणीव देत असतात. बाबांच्या विचारातून समाजाला दिशा मिळते, सद्गुरूगाडगेबाबांचे विचार प्रवाहित परीवर्तन घडवून आणणारे आहेत. स्थितिवादाच्या आग्रहामुळे प्रवाहित सामाजिक जीवन खुंटते कुजते आणि सर्वनाशास प्रेरित होते. यांचे भान ठेवून सद्गुरू गाडगेबाबांनी स्थितीवादावर, पुनर्वादावर प्रहार प्रवाहित समाजाला परिवर्तनाकडेनेणारे विचार दिले. स्थितीवादामुळे अथवा पुनर्वादामुळे मानवी जीवन एका विशिष्ठ वर्तुळात बंदिस्त होते. तेव्हा मानवाला गुलामगिरीची अवस्था प्राप्त होते. दुर्बळ मानसिकता निर्माण होते आणि मग त्यातून मुक्त होण्याकरिता मानवाला पुन्हा पुन्हा बंधनात ठेवण्याचा प्रयत्न करते. अशा स्वरूपाची विचार निर्मिती मानवाला पुन्हा पुन्हा बंधणात ठेवण्याचा प्रयत्न करते. अशा स्वरूपांची विचार निर्मिती आपणांस मराठी भाषेतील पुराण साहित्याद्वारे पाहण्यास मिळते. हे पुनर्वादी विचार होय.
याकरिता समाजाने सद्गुरू गाडगेबाबांचे शेवटचे किर्तनातील बाबांचे विचार समजावून घेऊन पुरोगामी मानवतावादी बनावे. सद्गुरू गाडगेबाबांची विचारांची दिशा समजावून घेण्याकरीता महात्मा ज्योतिबा फुले व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे समग्र साहित्य वाचावे. फक्त यांचे विचारच सद्गुरू गाडगेबांबाचे विचार समजावून देण्यास मार्गदर्शक आहेत. त्यांच्या विचारांचे समीक्षण नाही.
'ज्याचे हाती झोळी - तो जगाते सांभाळी' असे सार्थ वर्णन करता येईल असे परिशुद्ध असलेले सद्गुरू श्री गाडगेबाबांनी संत विचारांना आचारच करून घेतला . ठिकठिकाणच्या अनिष्ठ रूढींना मुठमाती दिली. समाज व्यसनमुक्त व्हावा म्हणून हाती भाकरी खात हा महात्मा रानोमाळ हिंडला. जगा धाकुटे होईन याचा साक्षात कृती पुरावा म्हणजे श्रीसद्गुरू गाडगेबाबा !
ओ.बी.सी. सेवा संघ पुरस्कृत कर्मवीर
मा. दत्तात्रय तुळसीराम दळवी राष्ट्रीय अध्यक्ष भारतीय ओ.बी.सी . परिषद विभागीय चिटणीस धोबी महासंघ
Satyashodhak, dr Babasaheb Ambedkar