महाराष्ट्राची मुलुख मैदानी तोफ शिवजयंतीला वाशिम मध्ये धडाडणार.. प्रसिद्ध युवा शिवव्याख्याते शंकर भारती यांचे सुंदर वाटीकेत व्याख्यान - नाना देशमुख यांचे हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन
वाशिम - महाराष्ट्रातील ख्यातनाम वक्ते तसेच वाशिम जिल्ह्याची शान युवा वक्ते शंकर भारती यांचे १९ फेब्रुवारी ला वाशिम येथील स्थानिक सुंदर वाटीकेत शिवजयंती निमित्त व्याख्यानाचे आयोजन केले आहे. अशी माहिती एका प्रसिद्ध पत्रकाद्वारे युवा सामाजिक कार्यकर्ते नाना देशमुख यांनी दिली आहे. तरी सर्व महिला भगिनींनी तसेच पुरुष मंडळी आणि 'युवा मंडळींनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. संजयभाऊ देशमुख ( माजी राज्यमंत्री) तसेच उद्घाटक मा. सिद्धार्थ देवळे साहेब ( वंचित बहुजन आघाडी विदर्भ प्रमुख) तसेच उपस्थित मान्यवर मा. सुधिरभाऊ कव्हर, सुरेशभाऊ मापारी, किरणताई गिर्ह, जिल्हा परिषद सदस्या सौ कल्पनाताई राऊत, सामाजिक कार्यकर्ते कैलास राऊत, गजाननराव देशमुख, नितीनभाऊ मडके, गजानभाऊ देशमुख, बाळासाहेब देशमुख, अविनाशभाऊ चव्हाण, असणार आहेत तर, कार्यक्रमाचे नियोजन मा.नानाभाऊ देशमुख, संगीताताई गावंडे, सुनिताताई बोलवार, बालाबाई घुले, स्लप्निलभाऊ वाघ, पुष्पाताई काळबांडे, स्वातीताई बहाकर, शुभम कंकाळ, पल्लवीताई कलकोट, पंचफुलाबाई कांबळे, सय्यद याकुब, वर्षाताई काळबांडे, निताताई खंडारे, संतोष सरकटे आणि सर्व मित्रमंडळ सुंदर वाटिका वाशिम यांनी केले आहे.