डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात “भारताला कसलाही इतिहास नसुन बौद्ध धर्म व हिंदूधर्माचा संघर्ष हा एकच इतिहास भारताला आहे. आणि हा संघर्ष आर्य भारतामध्ये आल्यापासुन सुरू झाला आहे.” या संघर्षामध्ये भारतामधील मुळ प्रवाह सिंधु संस्कृती हा एक प्रवाह व दुसरा प्रवाह आर्य भारतामध्ये आल्यापासून त्यांनी आनलेला आत्मवादचा प्रवाह. या दुसऱ्या प्रवाहामध्ये मानवाच्या उत्पतीचा जगामध्ये अनादी काळापासुन चालत आलेला सिंद्धात आहे. तो सिद्धांत म्हणजे या सृष्टीला कोणीतरी निर्माता आहे व तोच सर्व सृष्टीचे नियंत्रण करतो. त्याला आर्य ब्रम्हा त्यामधुन येणारा आत्मा व त्याच्या आधारावर रचलेले वेद याला धर्म मानीत. कालांतराने त्यांना समजुन आले की भारतीय मुळ तत्वज्ञान आपल्या वेदा पेक्षा सुधारित आहे. वेद म्हणजे लाकडी भुष्यासारखे असलेले तत्वज्ञान. याची जाणीव झाल्याने या भारताच्या मुळसंस्कृतीमधील शिवाला रूद्र या देवतेच्या नावाने स्विकारून उपनिषदांची निर्मिती करून आमचा सुद्धा वेद धर्म कसा चांगला आहे हे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. आपले वर्चस्व कायमचे अनार्यावर राहावे म्हणुन आत्मा, ब्रम्ह, गुणकर्मावर उभा असलेली व्यवस्था ठेऊन रूद्र स्विकारला अशा पद्धतीने शिवाचे तत्वज्ञान गिळंकृत केले.
सुमारे २५०० वर्षीपुर्वी सिद्धार्थ गौतमाने बौद्धधर्म स्थापुन वेदा मधुन निर्माण झालेला ब्राह्मणी धर्म लयास गेला . त्यावर प्रतीक्रांती करून पुष्पमित्र शुगांने बौद्ध धर्म नष्ट करण्याचा प्रयत्न केला व परंत वेद तथा ब्राम्हणी धर्म स्थापण्याचा म्हणजे पुर्नजीवीत करण्याचा प्रयत्न केला. परंतू वेद किंवा ब्राह्मणी धर्माचा इतका वाईट प्रभाव समाजावर होता की ते नाव घेऊन त्या नावाने धर्म सांगणे कठीण झाले म्हणुन आद्यशंकराचार्याने हिंदु या नावाने धर्माला ना व देऊन वेद ब्राह्मणी धर्म सांगण्यास सुरूवात केली. परंतु लोकांवर बौद्ध धर्माचा फार मोठा पगडा असल्याने शंकराचार्याला बौद्ध तत्वज्ञान, त्यामधील मुर्तीपुजा , ध्यान वगैरे घेऊन त्यामध्ये ब्राम्हणाचे वर्चस्व असलेला आत्मा ब्रम्ह वर्णव्यवस्था घालुन बौद्ध धर्माचे हिंदुधर्माचे नाव देऊन सांगुन आपली मनुवादी संस्कृती निर्माण केली . म्हणजे उपनिषद निर्माण करताना ज्याप्रामाणे शिवाला गिळंकत केले होते यावेळी बद्धाला गिळकंत करून मनुस्मर्ती, रामायण महाभारत यामधुन ही संस्कृती आजतागायत थोपवण्यात आली आहे. जी काही शिव धर्माची बौद्ध धर्माची प्रतीकात्मक पुजेच्या माध्यमातील चांगली तत्व गाडून त्यावर पुराणे रचण्यात आली कोठल्याही पुराणामधील गोष्टी खाली शिवाचे किंवा बुद्धाचे तत्वज्ञान गाडलेले आढळेल उदा. वामन अवतार
भारतामधील मुळची संस्कृती जीला आपण पहीला प्रवाह म्हणून संबोधले आहे ती शिवाच्या रूपात पाच हजार वर्षापासुन किंवा आर्य भारतामध्ये आल्याच्या १,००० ते १,५०० वर्षे अगोदर होती व सिद्धार्थ गौतमाने बौद्ध धर्म २,५०० वर्षापुर्वी स्थापल्याने त्या वेळी ती २५०० वर्षीची असली पाहीजे. सदर अडीच हजार वर्षापुर्वीचे काही पुरावे लिखाण वगैरे नसल्याने सापडणे अशक्यच आहे परंतु उत्खननामध्ये जी काही पीड, बैल , ध्यानस्थ मुर्ती सापडल्या त्या आधारे तर्कवादातुन या शिव धर्माचा शोध घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. परंतु त्याआधी हा सिंधुसंस्कृतीमधील प्रवाह आजपर्यंत कसा आला आहे यावर विचार करू.
या प्रवाहाचा उगम शिव . परंतु उपनिषदकारांनी गिळंकृत केल्याने सिद्धार्थ गौतमाने बौद्धा धर्माच्या माध्यमातून मांडले गेले. बौद्ध धर्माचे तत्वज्ञान सुद्धा पुष्पमित्र संघाच्या क्रांतीमुळे शशांक पुष्पमित्र संघ या राज्याच्या दहशतीने बुद्धाचे नाव घेणे किंवा पिवळी वस्त्र घालुन भिक्षु बनुन धर्म सांगणे भितीदायक वातावरण झाले होते एवढ्या मोठ्या एक हजार वर्षाच्या काळामध्ये या हिंदू धर्माने बहुजनांची अत्यंत वाईट परिस्थिती निर्माण केली होती. परंतु बहुजनामधील काही विचारवंताना ही स्थितीपाहुन या बहुजनासाठी काही तरी केले पाहिजे या तळमळीतून बुद्धाचेच तत्वज्ञान बुद्धाचे नाव न घेता व अंगावर पीत वस्त्र धारण न करता सांगु लागले व या मधुन भक्ती संप्रदाय निर्माण झाला असेल या गोरखनाथ, मच्छींद्रनाथ, बसवेश्वर, चक्रधरस्वामी, संत कबीर, रोहिदास ते संत तुकाराम ते जिजाऊ, शिवाजी महाराज, शाहु महाराज, महामानव ज्योतीबा फुले ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर येथ पर्यंत हा प्रवाह पोहचत आहे. आपल्या सिंधु संस्कृतीमधील शिवाचा शोध घेणे महत्वाचे असल्याने या प्रवाहावर आनखी प्रस्तुत लिहीणे टाळलेले बरे म्हणुन आपण सिंधु संस्कृतीमधील शिवाचा शोध घेण्याचा प्रयत्न करू.
कोणताही धर्म समजण्यासाठी त्या धर्माचा पाया समजणे खुप आवश्यक आहे. सिंधु संस्कृतीमधील धर्म शोधण्यासाठी प्रथम आपण आजच्या विज्ञानाच्या दृष्टीतून सृष्टीच्या निर्मितीचा सिद्धांत समजावुन घेऊ व हा सिद्धांत बौद्धधर्माच्या मुळाशी कशाप्रकारे आहे हे जाणुन घेऊ व हा बौद्धधर्माच्या सिद्धांतावर सिंधूसंस्कृतीमधील शिव कसा उभा आहे ते पाहु.
आपल्या विश्वाच्या निर्मीतीचे विश्वाचे स्वतःचे एक सुत्र असुन त्यासुत्रामधुन च विश्वनिर्माण झाले आहे व त्याच्या निर्मितीच्या सुत्रानुसार ते विकास पावले आहे व आजसुद्धा या सुत्रानुसार चालत आहे. म्हणुन विश्वाच्या निर्मितीला स्वयंभु तत्वज्ञान म्हणुन मानले जाते याचा अर्थ विश्वाच्या निर्मितीला स्वयंभ तत्वज्ञान म्हणुन मानले जाते याचा अर्थ विश्वाला कोणी निर्माण कर्ता नाही अथवा नियंत्रीत कर्ता सुद्धा नाही . तीचे स्वतःचे विकासाचे सुत्र आहे.
आजचे शास्त्रज्ञ संशोधनामध्ये कृष्ण विवरापर्यंत पोहोचले आहेत. कृष्ण विवर तप्त उष्णतेचा गोळा असल्याने त्यावर संशोधन पुढे गेले नाही. परंतु शास्त्रज्ञ म्हणतात आपली पृथ्वी अपघाताने निर्माण झाली आहे. कृष्णविवरातुन रोज सुर्य बाहेर पडुन या विश्वामध्ये जात आहेत. आपली पृथ्वी ज्या सुर्यामधुन निर्माण झाली त्यावेळी पृथ्वीवर सुर्यामधील चार वायु अचानक एकत्र आले व त्यामधुन आप तेज वायु व पृथ्वी हे चार मुळ घटक निर्माण झाले व त्या प्रत्येकाचे अणु रेणु निर्माण होऊन अमिबा नावाचा जीव निर्माण झाला. व उत्क्रांतीच्या सिद्धांतानूसार आजचा मानव घडला आहे. या सुर्यामध्ये मनात जे टाकाल तसे मन किंवा शरीर घडते मनच शरीरावर नियंत्रण करीत असल्याने मनाने सांगीतल्या प्रमाणे काम करते व शरीर जसे कार्य करेल तशी कृती घडते हे सुर्यामध्ये आहे.
बौद्ध धर्म सुद्धा स्वयंभुतत्वाज्ञानावर उभे आहे. बुद्धाच्या अनेक मुर्त्या धर्म सिद्धांत सांगण्यायसाठी निर्माण झाल्या त्यापैकी एक मुर्ती भुमिला हाताने स्पर्श करीत असल्याचे दाखविण्यात येते या मध्ये पारंपारीक अर्थ सांगीतला जातो की बुद्ध म्हणतात मी सत्य शोधल्या शिवाय उठणार नाही असा निर्धार केला आहे. व त्याला साक्षी ही भुमी आहे. खरे म्हणजे एवढ्या मोठ्या मानवाला कोणाची भिती आहे की साक्ष ठेवणे गरजेचे आहे व ती सुद्धा निर्जीव भुमी ! तर्काने विचार केल्यास असे आढळुन येते की बुद्ध म्हणतात सत्य येथेच या भुमिवर आहे. या विश्वाला कोणी निर्माण कर्ता नाही अथवा नियंत्रण करणारा नाही. या भुमिवर विश्वनिर्मितीच्या सिद्धातानुसार मानव येथेच घडला आहे त्याला घडविणारा कोणी नाही हेच तत्व ज्ञान लिंग पुजेद्वारे सांगीतले जात होते कारण काठमांडू मधील आठशे वर्षाच्या प्रचंड स्तुपावर अनेक प्राचीन मुर्त्या निरिनिराळ्या रूपामध्ये आहेत त्यामध्ये एक मुर्ती बुद्ध संभोग करीत असलेला आहे याचा अर्थ मानव येथेच घडल्याचे प्रतीक असु शकेल. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी “बुद्ध आणि त्याचा धम्म” या ग्रंथामध्ये लिहीले आहे की माणुस आप तेज वायु व पृथ्वी या घटकाच्या प्रत्येका दोन स्कंधापासून घडला आहे. एका स्कंधापासुन शरीर (जड) दुसऱ्या स्कंधापसून मन (अजड) बनले आहे. मन शरीरावर नियंत्रण करीत असल्याने मन श्रेष्ठ आहे. म्हणुन स्त्रीला जास्त महत्व देण्यात आले आहे. व बुद्ध धर्म मातृप्रधान संस्कृती असल्याने सिद्धार्थ गौतमाला आईचे नावाने संबोधले जाते.
शंकराचा शिव धर्म सुद्धा स्वयंभु तत्वज्ञानावर उभा आहे म्हणुन शंकराला महादेव. आदि देव अशी नावे आहेत परंतु शंभे हे सुद्धा एक नाव आहे . स्वयंभुचा अपभ्रंष शंभो झाला आहे व आर्यांनी त्याला गीळकृत केल्यावर भोळा सांब म्हणुन विबंडन केले आहे. शंकर इतका भोळा, मुर्ख आहे की शिष्याला काय वर द्यावा हे युद्ध माहीत नसल्याने शिष्याने डोक्यावर हात ठेवल्याने जळुन भस्म झाला अशी पुराणामध्ये कथा रचुन शंकराचे अवमुलन केले आहे. ज्या प्रमाणे बुद्धाला गिळकृत करून नववा अवतार बनवुन तो म्लेंछांचा संहार करण्यास येणार असे सांगुन बुद्धाच्या अहिंच्या तत्वाचे विडंबन केले आहे. त्याचप्रमाणे शंकराचे अवमुल्यन करण्यात आले आहे. सिंधुसंस्कृती मधील उत्खननामध्ये पिंड, बैल , ध्यानस्थ मुर्ती सापडली आहे यावरून असे अनुमान निघु शकते की पिंड सुद्धा जन्माचा सिद्धांत सांगत आहे. माणुस येथे या भुमिवर निर्माण झाला आहे. स्त्री आणि पुरूषाच्या मिलनातून घडला आहे. शरीर मनाच्या एकत्री करणातुन माणुस घडला आहे. शरीर (जड) दाखविण्यासाठी शंकराची मुर्ती निर्माण झाली असेल व मन दाखविण्यासाठी पार्वतीची मुर्ती दाखविण्यात आली असेल. पुरूष आणि स्त्रि एकच आहे हे दाखविण्यासाठी अर्धनटेश्वराची मुर्ती निर्माण झाली असेल. दक्षिण भारतामधील मदुराईच्यार मंदीरामध्ये अनेक मुर्त्या दाखविण्यात आल्या असुन एक मुर्ती मिशा दाखवुन स्तन दाखविले आहे आणि म्हणुनच शंकराची मुर्ती व पार्वतीची मुर्ती स्वतंत्र दाखविण्यात येते तिरूपतीच्या बालाजी सुद्धा वर एकटाचा उभा आहे तर खाली लक्ष्मी एकटीच असल्याने व मन स्त्रीचे प्रतीक असल्याने दिसून येते. शंकराचे प्रतीक असल्याने मातृप्रधान संस्कृती मानण्यात येते.
सिंधुसंस्कृती योग संस्कृती म्हणुन ओळखली जाते. योग म्हणजे एकत्री करण शरीर आणि मनाचे एकत्री करणे असे असावे. जीलाच ध्यान संस्कृती म्हणून संबोधले जाते उत्खननांमध्ये ध्यानस्थ मुर्ती मिळालेली आहे. शंकराच्या ९० टक्के मुर्त्या ध्यान रूपातच आहेत. ज्याप्रमाणे ९० टक्के बुद्धाच्या मुर्ती ध्यान रूपातच आहेत. म्हणजे ध्यान किती महत्वाचे आहे हे लक्षात येऊ शकते.
शास्त्रज्ञ सांगतात हे विश्व धुलीकणापासुन बनले आहे. व शंकराचे भस्मसुद्धा हेच सांगत आहे की माणुस कणापासुन घडला आहे. हाच मायावाद समजला जातो. माणुस कणापासुन जन्म धारण करतो व मृत्युनंतर चार घटक विघटन पाहुन विश्वातील कणाला मिळतात. डोळ्याला जे दिसते ते सर्व अस्थाई आहे प्रत्येक वस्तु अशा अस्थाई स्वरूपात असते आपणास जे अनुमत्ते दिसते ते सर्व भासमान आहे. बदलण्याची क्रीया सतत चालु असल्याने सर्व क्षणिक आहे. बुद्ध तत्वज्ञान सुद्धा शुन्यवादाच्या तत्वाद्वारे हेच सांगत आहे की शुन्यतुन (कण) निर्माण होते व कणालाच विघटन स्वरूपात मिळते.
मुर्ती पुजेचा उगम सिंधु संस्कृतीमध्ये झाला असेल. उत्खनां मध्ये पिंड, बैल, पशुपतीनाथ, तीन शिंगे असलेला माणुस पींपळ वड अशा वृक्षाची चित्रे सापडली आहेत. काही मुर्त्या सापडलेल्या आहेत या मध्ये तर्कावरून असे अनुमान निघु शकते की त्या काळी सुद्धा मुर्ती पुजेचा वापर होत असला पाहीजे. तीन शिंगाचा माणुस हे दर्शवीत असेल तीसरा डोळा म्हणजे ध्यानामधून निर्माण होणारी प्रज्ञा. शंकराला तीसरा डोळा दाखविण्यात येतो तो सुद्धा प्रज्ञेचे प्रतीक म्हणुन असावा. पशुपतीनाथ म्हणजे अज्ञजनांना ज्ञान देणारा नाथ असे असेल. एक स्त्रिरूपातील मुर्ती नृत्यकरीत असुन हातामध्ये दागीने घालुन शृंगार केल्याचे दाखविले आहे. उत्खननामध्ये घरांची, रस्त्यांची सांडपाण्यांची असलेली व्यवस्था सापडली आहे यावरून असे अनुमान निघते की सिंधु संस्कृतीमधील समाज किती त्या काळी सुद्धा प्रगत झालेला होता म्हणूनच इतिहासकारात जगामधील पुढारलेली संस्कृती म्हणून मान्यता पावली आहे. त्याकाळी सर्व जग विश्वासाचा निर्माण करता व नियंत्रण करणाऱ्या देव नावाच्या कल्पनेत वावरत होते. सिंधु संस्कृतील मधील समाज ध्यानाच्या द्वारे मनाचा विकास करूनच एवढी प्रगती करू शकला म्हणजे आजचे शास्त्र जो विश्वाचा उत्क्रांतीवाद मांडत आहे तो सिंधु संस्कृतीमधील माणसाला सुद्धा ज्ञात असला पाहीजे.
कोलकत्ता मधील स्वप्नील विश्वास यांनी एक ग्रंथ लिहीला असून त्याचे नाव 'बौद्ध धर्म और मोहोजदाडो' हडप्पानगरीला धर्म असे आहे. विश्वास यांनी स्वतः सिंधु संस्कृती मध्ये उत्खणन करून संशोधन केले आहे. त्यांना उत्खननामध्ये त्याकाळी बौद्ध धर्म असल्याच्या वस्तु उपलब्ध झाल्याचे आढळून आले आहे. पिंपळ वृक्ष, डाव्या खांद्यावर चिवर धारण केलेली भिक्षु स्वरूपातील मुर्ती मिळाल्या आहेत व यावरून त्यांनी सिंधुसंस्कृतीमध्ये बौद्ध धर्म होता हे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे. यावरून असे अनुमान निघु शकते की सिंधु संस्कृतीमध्ये सुद्धा बौद्ध धर्म होता किंवा शंकराचा शिवधर्मच सिद्धार्थ गौतमबुद्धा पर्यंत अस्तीत्वात असला पाहीजे. सिद्धार्थ गौतम बुद्ध सुद्धा म्हणतात माझ्या अगोदर सुद्धा पाचशे बुद्ध होऊन गेलेत. परंतु काळाच्या ओघात त्यावेळी कोणत्या स्वरूपात असावे याबद्दल काहीच पुरावे नसल्याने निष्कर्ष निघु शकत नाही. की बौद्ध धर्म होता की शिव धर्म होता. असो.
मुर्ती पुजेचा विकास बौद्ध धर्मातील महायान पंथाने फार मोठ्या प्रमाणात केला होता. या मुर्ती पुजे मुळेच सर्व भारतभर बौद्ध धर्म प्रसारित झालाच परंतु मुर्ती रूपातुनच बाहेरच्या देशामध्ये सुद्धा प्रसारीत झाला होता. गणपती शंकर यांच्या मुर्त्यारूपातुनच बाहेरच्या देशामध्ये सुद्धा प्रसारीत झाला होता. गणपती, शंकर यांच्या मुर्त्या जपान कंबोडीया वगैरे देशामध्ये पुजल्या गेल्यात आहेत.
बौद्ध धर्मामध्ये काही मुर्त्या धर्माचा सिद्धांत सांगण्यासाठी निर्माण झाल्या आहेत तर काही मुर्त्या मनाच्या चांगल्या विकासासाठी गुण वाढविण्यासाठी गुणात्मक मुर्त्या निर्माण झाल्या आहेत. आपल्या मनामध्ये जो गुण वाढवायचा असेल त्या गुणाची मुर्ती निर्माण करून त्या मुर्तीमधील गुणाची श्रद्धा आपल्या मनामध्ये पुजेच्या माध्यमाने निर्माण करण्यासाठी प्रतीकात्मक पुजेचा जन्म झाला. याच पुजेला सगुण पुजा म्हणून सुद्धा संबोधण्यात येते असे. शंकराचार्याने हिंदु धर्माची पुजा केल्यावर याच मुर्त्या हिंदु धर्मामध्ये घेऊन त्यामध्ये आत्मा घालुन मुर्त्या मध्ये गुण नसून प्राणप्रतीष्ठा केल्याने त्यामुर्तीमध्ये देवाची शक्ती असुन तीला पुजल्यावर बळी दिल्यावर तुमची दुःखे दूर होतील अशा पद्धतीने सगुण पुजे ऐवजी निर्गुण पुजा अस्तीत्वात आली याच पुजेला प्रतीकात्मक पुजे एवजी प्राकृतीक पुजा म्हणून सुद्धा मान्यता मिळाली. मुर्ती प्रतीकात्मक पुजे ऐवजी या मुर्तीमध्ये या प्रकृतीमधील शक्ती म्हणजे आत्मा ब्रम्हा असुन तोच पुजा केल्यावर आपले प्रश्न सोडवील हा भाव निर्माण केला गेला.
आता आपण मुर्ती मधील दाखवलेल्या भवानांचा विचार करू प्रथम बौद्ध धर्मामधील मुर्ती मधील भावनांचा विचार करू. बौद्ध धर्मामध्ये भुमिस्पर्श रूप, अभयदान रूप, ध्यानामधील रूप, धम्मचक्रामधील रूप व महापरीनिर्वामधील रूप या धर्माचा सिद्धात सांगणाऱ्या रूपांचा विचार करू बुद्धाचा एक हात भुमिला स्पर्श केलेला आहे अशी बुद्धाची मुर्ती जणुकाही सांगत आहे सत्य येथे या भुमिवरच आहे. या विश्वाला कोणी निर्माण कर्ता नाही अथवा कोणी नियंत्रण करणारा नाही विश्वाचे विकासाचे स्वतःचे सुत्र असून या मधून विश्वाची घडण झाली असुन एक अमिबा जीवा पासुन आजचा मानव विश्वाची घडण झाली असून एका अमिबा जीवा पासून आजचा मानव उत्क्रांती सिद्धांतानुसार घडला आहे. थोडक्यात म्हणजे अनात्मा तत्वज्ञानाचा सिद्धांत मांडला गेला.
दुसरी मुर्ती अभ्यदानामधील उभी असलेली अथवा बसलेल्या अवस्थेत असते एक हात आर्शिवाद देण्याच्या स्वरूपात आहे. जणु काही बुद्ध माणसाला भयमुक्त राहण्याचा संदेश देत आहेत. सत्यसमजल्यावर माणसाने आत्मा, ब्रम्हा, परमेश्वरद याच्या भयातून मुक्त राहाण्यास सांगत आहे. सत्य समजल्यने माणसाने निर्भयपणे जगण्यासाठी आपले प्रयत्न केला पाहिजे.
तिसरी मुर्ती बुद्ध ध्यान करीत बसले आहेत अशा स्वरूपामध्ये दाखविण्यात येते या मुर्तीमधील भाव सांगत आहे की माणसाला सत्य समजले आहे. त्यामुळे तो भयमुक्त झाला आहे व आता आपले जीवन कशाप्रकारे व्यतीत करावे ही ध्यान मदा जण काय संपर्ण धम्माचरणाचा संदेश देत आहे. या मध्ये ध्यानमार्ग, बद्ध धम्म संघ या त्रीरत्नावरील श्रद्धा, पंचशिलेचे आचरण ते अंमलात आनण्याचा मार्ग म्हणजे आर्य अष्टांग मार्ग तो चिकटीने अंमलात आनण्यासाठी दशपारमीत्ता वगैरे धम्माचरणाचा मार्ग दाखवित आहे.
चौथी मुद्रा हाताच्या आंगठा व एक बोट याचे चक्ररूपात दाखवून हे धम्मआचरणाचा मार्ग सर्व मानवासाठी जगभर प्रसारीत करण्याचा संदेश देत आहे.
पाचवीमुद्रा एका कुशीवर झोपलेली रूपामध्ये आहे जणु काय बुद्ध सांगतात अनीत्य सिद्धांतानुसार प्रत्येकाला मृत्यू आहे. प्रिय गोष्टींचा सुद्धा वियोग आहे म्हणुन माणसाने वियोग झाल्याने दुःख करणे व्यर्थ आहे असाच संदेश बुद्ध देत आहेत असे वाटते.
मध्यम मार्ग सांगणारी बुद्धाची एक मुर्ती वारणशीमधील बुद्ध विहारात बसवलेली आहे. ही मुर्ती भारतामध्ये कोठे दिसत नाही. ब्रम्हा देशामधून आणली असल्याचे सांगण्यात आले. सदर बुद्धाची मुर्ती हातामध्ये भिक्षा पात्र असुन एक हात मोजना साठी पात्रामध्ये घालत आहेत अशा रूपामध्ये मुर्तीचा भाव दाखविण्यात आला आहे. यावरून असे अनुमान काढता येते की भोजन घेते वेळी मध्यम मार्गानेच घ्यावे. भगवान बुद्ध म्हणतात भुक हा रोग आहे व भोजन हे त्यावरील औषध आहे. याचा अर्थ भुक शमण्यापुरतेच भोजन घ्यावे. येथे भोजनाच्या स्वरूपात जरी मध्यम मार्ग सांगीतला असला तरी भगवान बुद्धांना असा संदेश द्यावयाचा असेल माणसाने भौतीक वादाचा आस्वाद सुद्धा मध्यम मार्गानेच घ्यावा. जेवढी ऐपत व गरज पाहुन भौतीक वाद स्विकारावा.
भगवान बुद्धाच्या या रूपामधून जसा धर्माचा सिद्धांत मंडला आहे त्याचप्रमाणे प्रतीकात्मक पुजेच्या माध्यमातून अनेक मुर्त्या गुणदर्शक म्हणुन पुजल्या जात. होत्या आपल्या स्वभावा मध्ये कल्याणकारक गुण निर्माण होण्यासाठी त्या त्या गुणाची मुर्ती असे व पुजेच्या सातत्याने मनामध्ये त्या गुणाची वाढ होत होती. उदाहरणार्थ प्रज्ञा निर्माण करण्यासाठी मंजुमी, मतीला तारणारी तारामती वगैरे.
शिव धर्माच्या तत्वज्ञानात सुद्धा अशा प्रतीकात्मक पुजेच्या माध्यमातुन गुण दर्शक मुर्त्यामधून मनाचा विकास करण्याची पद्धत असावी परंतु काळाच्या अशा प्रकरच्या मुर्त्या नष्ट झाल्या असतील हे उत्खणामध्ये सापडलेल्या पिंड, बैल, पशुपतीनाथाची मुर्ती ध्यानस्थ मुर्ती तीन शिंगे असलेली मुर्ती या अस्तीत्वात असलेल्या मुर्त्या या अस्तीत्वात असलेल्या मुर्त्यावरून सिद्ध होत आहे.
आता सध्या अस्तित्वात असलेल्या मुर्त्यांचा विचार करू शंकराला नटेश्वराच्या रूपात दाखवले आहे. बाळावर पाय देऊन नृत्य करीत आहे अशा स्वरूपातील शंकराची मुर्ती आहे. आद्यशंकराचार्य हिंदु धर्माची स्थापना केल्यावर पुराण रचुन शंकर नृत्य करण्यात एवढा निपुण होता की बाळाला पायाचे ओझे न लादता नृत्य करीत असे एवढा शंकर नृत्य करण्यात पटाईत होता. नटेश्वराची पुजा केली तर पुजा करणारा सुद्धा नृत्यामध्ये पारंगत होईल असे दाखविण्यात आले आहे परंतु आपण तर्काने विचार केला तर असे दिसुन येईल की शंकर आज्ञानाच्या प्रवाहात नाचत आहे. माणसाचे मोठे पण असलेली माणुसकीएवढी लहान केली आहे की ती माणुसकी बाळाच्या रूपात दाखवलेली आहे व आपले माणुसपण अज्ञान असल्याने तुडवत आहे. माणुसकी तुडवणे म्हणजे दुःखामध्ये रहात आहे. भगवान बुद्ध सुद्धा ज्ञान प्राप्ती होण्याअगोदार माराच्या, तृष्णनेच्या आघाताने दुःखी अवस्थेमध्ये होता परंतु ज्ञानप्राप्ती झाल्यावर प्रचंड प्रज्ञावान झाला व दु:ख मुक्तीच्या मार्ग शोधण्यात यशस्वी झाला होता. शंकर सुद्धा ध्यान करण्या आगोदर दुःखात होता परंतु ध्यान साधना केल्यावर शंकराला एवढे ज्ञान प्राप्त झाले की ते जटामधून गंगाप्रवाहात असल्याच्या स्वरूपात दाखविण्यात आले आहे. प्रज्ञा म्हणजे निर्मळ बुद्धी व ती डोक्यामधुन निर्माण होते म्हणुन डोक्यावर जटा दाखवुन त्यामधून गंगेच्या प्रतीकामधून प्रज्ञा दाखविण्यात आली आहे. जटा म्हणजे प्रज्ञा निर्माण होण्याचे ठिकाण भगवान बुद्धांच्या डोक्यावर केस दाखविण्याचे प्रतीक म्हणजे प्रज्ञा निर्माण होण्याचे ठिकाण म्हणून दाखविली जाते. अशाप्रकारे शंकराच्या ध्यानस्थ मुर्त्या जवळ जवळ ९० टक्केच्या प्रमाणात आहेत बुद्धाच्या सुद्धा ध्यानस्थ रूपातील मुर्त्या ९० टक्के आढळतात यावरून ध्यान किती महत्वाचे आहे हे लक्षात येते.
भगवान बुद्धांनी जन्म म्हणजे दु:ख, दुखाला कारण आहे, कारणाचे विश्लेषण म्हणजे प्रत्युदसम्नत्पात व दु:ख निवारण्याचा मार्ग म्हणजे आर्य अष्टंग मार्ग ही चार आर्य सत्य सांगीतली आहेत. शंकराच्या शिव धर्मात सुद्धा पिंडी समोर बैल दाखविण्यात येतो. बैल म्हणजे दुःखाचे, कष्टाचे प्रतीक असले पाहीजे. शंकराच्या धान्यस्थ मुर्ती मधील सर्प हेच दर्शवितोकी जीवनामध्ये दुःख आहे परंतु प्रज्ञेमुळे दुःख असुन सुद्धा चंद्राप्रमाणे जीवन शितलपणे घालवु शकतो म्हणजेच दुःख असे तरी दुःखाच्या वेदना जाणवणार नाहीत अथवा सुख असेल तरी हुरळुन जाणार नाही अशी सुख दुःखाच्यावर असलेली मनाची स्थिती प्रज्ञेमुळे होत असते.
बौद्ध धर्मामध्ये बुद्ध, धम्म व संघ ही तीन रत्ने धम्माबद्दल श्रद्धा वाढवण्यासाठी अत्यंत महत्वाची मानली जातात बुद्ध म्हणजे ज्ञान धम्म म्हणजे ज्ञान आचरण्याचा मार्ग व संघ म्हणजे धत्त आचरण करणाऱ्या समाजाचार संघ. हेच तत्वज्ञान शंकराच्या शिव धर्मात सुद्धा त्रिशुळाच्या प्रतीका मधुन दाखविण्यात आले आहे सत्यं, शिवं, सुंदरं ही तीन रत्ने असुन सत्यं म्हणजे ज्ञान शिंव म्हणजे ज्ञान आचरण्याचा शिवाचा मार्ग व सुंदर म्हणजे आचरण करणाऱ्यांचा समाजाचा संघ. हेच तत्वान शंकराच्या शिव धर्मात सुद्धा त्रिशुळाच्या प्रतीका मधुन दाखविण्यात आले आहे. सत्यं, शिंव सुदरं ही तीन रत्ने असुन सत्यं म्हणजे ज्ञान शिवं म्हणजे ज्ञाने आचरणाचा शिवाचा मार्ग व सुंदर म्हणजे आचरण करणाऱ्या समाजाचा आनंद. त्रिशुळाला डमरू बांधलेला दाखविण्यात आले आहे डमरू प्रचारकरण्याचे प्रतीक आहे. जसे बुद्ध धर्मामध्ये धम्मचक्र दोन हरणांच्यामध्ये असलेले दाखविण्यात येते याचा अर्थ हे धमाचे तत्त्वाज्ञान सर्वमानवासाठी जगभर प्रसारीत केले पाहीजे व शंकराचे डमरू सुद्धा हेच सांगत आहे. की शिवाचे तत्वज्ञान जगभर प्रसारीत झाले पाहीजे. भगवान बुद्धाचा जसा अनीत्याच्या रूपातून शुन्यवाद सांगीतला आहे त्याचप्रमाणे शंकराचे भस्म सुद्धा रूपातून मायावाद सांगत आहे.
बौद्ध धर्मामधील अनेक तत्वाचा ब्राह्मणांनी आत्मवाद घालुन भ्रम निर्माण केला त्याचप्रमाणे शिवाचे तत्वज्ञान गिळकृत केल्यावर त्यामधील गुणदर्शक मुर्त्या आत्मवाद घातल्याने भ्रष्ट केल्या आहेत. म्हणुन शंकराचे शिव तत्वज्ञानावरील गुणधारक देव (मुर्त्या) त्यागुन नव्या स्वरूपात शिव तत्वज्ञान रचुन शिव धर्माचे प्रकटीकरण होणे फार आवश्यक आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा बौद्ध धर्मा मध्ये २२ प्रतीज्ञा घालुन हिंदु देव देवतांचा त्याग करण्यास सांगण्यात आले आहे व बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ लिहुन नव्या स्वरूपातील धर्माची रचना करून संसारीक जीवनासाठी त्याचा उपयोग होण्यासाठी प्रयत्न केला आहे. या जीवनामध्ये आनंदी जीवन जगुन होण्यासाठी प्रतीकात्मक पुजे साठी एकच बुद्ध स्विकारला आहे. याच पद्धतीने आपल्या शिवधर्म सांगणाऱ्यांनी शिवाच्या तत्वज्ञानामध्ये ब्राह्मणांनी घातलेला आत्मा ब्रह्मवाद काढून बहुजनांच्या समाजाचा मानसीक भैतीक स्तर उंचवण्यासाठी नव्या रूपात शिव मांडून एक नवा धर्म ग्रंथ सुद्धा निर्माण केला पाहिजे. पिंड आणि त्रिशुल प्रतीक असलेला शिवरायाच्या काळातील भगवा ध्वज निर्माण केला पाहीजे. या नव्या शिवधर्मामध्ये सिंधु संस्कृतीचा शिव स्विकारून त्या रचना शंकर - पार्वती - भक्तीपंथा मधील होऊन गेलेले सर्व संत - छत्रपती शिवाजी महाराज - जिजाऊमाँ - अहिल्यादेवी - शाहु महाराज - महामानव जोतीबा फुले - सावित्रीमाई यांच्या प्रतीकाचा पुजे साठी उपयोग करून प्रतीकात्मक देव किंवा निर्गुण पुजेमधील देव कल्पना वापरून आमचा नवा बहुजन समाज घडविण्याचे कार्य करावे. भारतामधील जेवढी पिंडी असलेली अथवा शंकराची रूपे असलेली बालाजी, विठ्ठल या मंदीरा सहीत बहुजनांच्या ताब्यात घेऊन तेथे बहुजनांचाच पुजारी राहील अशी व्यवस्था निर्माण करण्यासाठी चळवळ निर्माण केली पाहीजे. कालांतराने शिव व बुद्ध यांचे साम्य बहुजनामध्ये लक्षात आले तर संपूर्ण भारत सिंधु संस्कृतीवर उभा राहिलेला दिसेल ही अपेक्षा.
मा. एस. पी. कडलक
Satyashodhak, dr Babasaheb Ambedkar