राष्ट्रीय एकता व अखंडतेचे शिल्पकार
लेखक : डॉ. राजेंद्र मुरलीधर सानप, संचालक महाराष्ट्र राज्य ग्रांथालय संघ, बीड मो. 9420019597
"एकता हीच आपली ताकद आहे, विभाजन हेच आपले सर्वात मोठे दुर्बलता आहे." - सरदार वल्लभभाई पटेल
थोर नेतृत्व, अद्वितीय व्यक्तिमत्व
भारताचे लोहपुरुष म्हणून ओळखले जाणारे सरदार वल्लभभाई पटेल हे केवळ एक राजकीय नेता नव्हते, तर ते आधुनिक भारतीय राष्ट्राच्या एकतेचे शिल्पकार होते. त्यांची जयंती ३१ ऑक्टोबर रोजी संपूर्ण देशात राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरी केली जाते. देशाच्या अखंडोसाठी, सुरक्षतेसाठी आणि प्रशासनाच्या दृढ़ पाया रचण्यासाठी त्यांनी दिलेले योगदान अमूल्य आहे.
नडीयाद येथे जन्म
सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्म ३१ ऑक्टोबर १८७५ रोजी गुजरातमधील नडीयाद येथे झाला. ते शेतकरी कुटुंबात जन्मले. साधेपणा, कष्ट आणि प्रामाणिकपणा ही त्यांची जीवनमूल्ये होती. लहानपणापासूनच त्यांच्यात नेतृत्वगुण होते.

स्वातंत्र्य लढ्यातील योगदान
महात्मा गांधींच्या विचारांनी प्रेरित होऊन वल्लभभाई पटेल यांनी स्वातंत्र्य चळवळीत सक्रिय सहभाग घेतला. त्यांनी खेडा सत्याग्रह (१९१८) आणि बारडोली सत्याग्रह (१९२८) यांसारख्या आंदोलने यशस्वीपणे नेतृत्व केले. बारडोली सत्याग्रहातील त्यांच्या यशामुळे त्यांना "सरदार" ही उपाधी मिळाली. शेतकन्यांच्या हक्कांसाठी लढणारा हा नेता जनमानसात लोकप्रिय झाला.
स्वतंत्र भारतांचे पहिले उपपंतप्रधान आणि गृहमंत्री
१९४७ मध्ये भारत स्वतंत्र झाला, तेव्हा सरदार वल्लभभाई पटेल यांची स्वतंत्र भारताचे पहिले उपपंतप्रधान आणि गृहमंत्री म्हणून नियुक्ती झाली. या जबाबदारीच्या काळात त्यांनी देशाच्या सुरक्षेपासून अंतर्गत प्रशासनापर्यंत अनेक महत्वाचे निर्णय घेतले.
५६५ संस्थानांचे विलिनीकरण
स्वातंत्र्यानंतर भारतासमोर सर्वात मोठे आव्हान होते ५६५ संस्थानांचे भारतात विलिनीकरण. सरदार पटेल यांच्या कणखर नेतृत्व, दूरदृष्टी आणि मुत्सदेगिरीमुळे ही अशक्यप्राय वाटणारी कामगिरी शक्य झाली. हैदराबाद, जूनागढ़, काश्मीर यांसारख्या कठीण प्रश्नांवर त्यांनी अत्यंत धैर्याने आणि राष्ट्रहिताला प्राधान्य देऊन निर्णय घेतला. यामुळे आजचा अखंड, एकसंध भारत घडला.
राष्ट्रीय एकता दिवसांचे महत्व
सरदार पटेल यांची जयंती ३१ ऑक्टोबर हा दिवस राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवसांचे उहिष्ट्र देशातील सर्व समाजघटकांमध्ये एकता, सौहार्द आणि राष्ट्रप्रेमाची भावना दृढ करणे हे आहे. आजच्या काळातही त्यांचे विचार, त्यांचे कणखर निर्णय आणि राष्ट्रहिताची दृष्टी प्रत्येक भारतीयासाठी प्रेरणादायी आहे.
"देशाची एकता, अखंडता आणि सार्वभौमत्व राखणे हीच खरी देशभक्ती आहे. सरदार पटेल यांचे जीवन आपल्याला हेच शिकवते की, वैयक्तिक स्वार्थापेक्षा राष्ट्रहित नेहमी मोठे असते."