श्रीधर महादेव जोशी, अर्थात एस. एम. जोशी, (जन्म: १२ नोव्हेंबर १९०४; मृत्य: १ एप्रिल १९८९) हे भारतीय स्वातंत्र्यसैनिक, समाजवादीकार्यकर्ते होते. ते प्रथम समाजवादी, नंतर प्रजासमाजवादी आणि शेवटी संयुक्त समाजवादी पक्षाचे सभासद होते. पत्रकारिता, लेखन, वक्तृत्व, राजकारण व समाजकारण या क्षेत्रांतील निःस्वार्थीपणे अन् अविरतपणे केलेल्या कार्यामुळे ज्यांचे आयुष्यच ‘एक धडपडीचा इतिहास' बनून गेले असे ते समाजवादी लढवय्ये असून मवाळ वृत्तीचे एक नेते होते. एसएम जोशींचे महाविद्यालयीन शिक्षण पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजातून झाले.
भारत स्वातंत्र्य संग्रामात सहभागी होवुन अनेक वेळा कारावास भोगावा लागला भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एक अग्रगण्य लढावु नेते म्हणून त्यांनी योगदान दिले. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही स्वार्थाकडे दुर्लक्ष करून, देशार्थासाठी कार्यरत राहणे एसएम जोशींनी चालूच ठेवले. १९५७ साली ते महाराष्ट्र विधानसभेत आमदार झाले आणि १९६७ साली ते २ ऱ्या लोकसभेसाठी खासदार म्हणून निवडून गेले.

घरात दोन वेळच्या जेवणाची पंचाईत असताना आणि स्वतःचेच दुःख डोंगराएवढे असतानाही देशहिताच्या गोष्टी करण्याची इच्छा त्यांना लहानपणापासूनच होती. जो दुबळा आहे त्याच्या बाजूने आपल्या तत्त्वांची ताकद उभा करणारा हा लढवय्या अगदी लहानपणापासून लोकहितदक्ष असे.
देश स्वतंत्र व्हावा म्हणून आपापल्या परीने आणि मार्गाने प्रत्येक जण लढत होता. जहाल - मवाळांच्या अखंड प्रयत्नातून आशेचा किरण सामान्यांच्या नजरेच्या टप्प्यात येत होता. हे प्रयत्न, राष्ट्रभक्तीचे वातावरण या सर्वांविषयी एस. एम. यांना विलक्षण ओढ होती.
एस. एम. जोशी हे संयुक्त महाराष्ट्र समितीचे सक्रिय सभासद होते. संयुक्त महाराष्ट्रासाठी झालेल्या चळवळीत आणि त्यानिमित्त झालेल्या प्रत्येक सार्वजनिक सभेत एस एम जोशी यांची हजेरी असे.
महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे सदस्य म्हणून त्यांनी काम केले राज्यात समाजवादी विचारांचा प्रसार करून सामान्य माणसाला सक्षम करण्यासाठी प्रभावी प्रयत्न केले. त्यांच्या नेतृत्वाखाली फार मोठी समाजवादी विचारांची युवा पिढी निर्माण झाली असंख्य नेते कार्यकर्ते लोकसभा, विधानसभा, विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या साथी, सहकारी नेतृत्वाची फळी तयार झाली.
अश्या समाजवादी विचारवंत साथी एस एम जोशी यांचे दि १ एप्रील १९८९ ला निधन झाले. अशा थोर समाजवादी स्वातंत्र्यसेनानी, समाजसुधारक, विचारवंताला विनम्र अभिवादन...
सौ. मिरा राजेंद्र सानप, इंद्रप्रस्थ कॉलनी नगर रोड बीड] मो. नं. ९४२००१९५९७