- तुकाराम माळी
जत दि. १४ आगस्ट २०२६ - गेल्या काही वर्षांपासून ओबीसी आरक्षण, जनगणना याविषयावर विविध संघटनेचे कार्य अविरत सुरू असून त्याला समाज बांधावाकडून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.
भारतात १ मार्च २०२७ पासून जनगणना सुरू झाली आहे . ही जनगणना देशभरात दोन टप्प्यात केली जाईल. या दरम्यान, जात गणना देखील केली जाईल. जनगणना प्रक्रियेअंतर्गत, संबंधित अधिकारी देशातील लोकांशी संबंधित डेटा गोळा करतील. त्यात सामाजिक, लोकसंख्याशास्त्रीय, सांस्कृतिक आणि आर्थिक डेटा समाविष्ट आहे. धोरण आखण्यात आणि विकास प्रकल्पांच्या अंमलबजावणीत हा डेटा महत्त्वाची भूमिका बजावतो.जाती जनगणना स्वतंत्र सर्वेक्षण म्हणून करण्याऐवजी मुख्य जनगणनेत समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला असून यावेळी १६ वर्षांनंतर होणाऱ्या जनगणनेत पुन्हा जातीशी संबंधित प्रश्न विचारले जातील.
देशाची जनगणना केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाच्या अंतर्गत रजिस्टर जनरल आणि जनगनणा आयुक्त कार्यालय यांच्या कडून होते आता पर्यंत त्यांच्या कार्य पद्धती नुसार सुरुवातीला घराची गणना आणि एन. पी.आर.संबंधित माहिती संकलित करण्यासाठी घरी अधिकारी येतात. त्यानंतर परत जनगणना अधिकारी घरी आल्यावर धर्म आणि जात सह इतर ४० प्रश्न विचारतात.

यावेळी जातीनिहाय जनगणना सुरु असल्यामुळे जात अणि धर्म नोंद जागृत राहून करावी
यावेळी जातीनिहाय जनगणना देशाच्या स्वातंत्र्यानंतर प्रथमच होणार असल्याने आपली असेल त्या जातीची नोंद जातीच्या रकान्यात करावी. जानेवारी महिन्यात भारताच्या रजिस्ट्रार जनरल आणि जनगणना आयुक्तांनी महत्त्वाची अधिसूचना काढली. या अधिसूचनेमध्ये जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात नागरिकांना विचारल्या जाणाऱ्या ३३ प्रश्नांची यादी देण्यात आली होती . हा जनगणनेचा पहिला टप्पा १ एप्रिल ते ३० सप्टेंबर २०२६ दरम्यान पार पडला आहे.
१४ आगस्ट २०२६ रोजी सरकारने जारी केलेल्या राजपत्रीत अधिसूचनेत ४० प्रश्नांची रूपरेषा मांडण्यात आली आहे. रजिस्ट्रार जनरल आणि जनगणना आयुक्तांकडून आदेश जारी करण्यात आले आहेत जनगणना २०२७ मध्ये पहिल्यांदाच व्यापक स्तरावर जातिनिहाय आकडे मिळवण्यात येणार आहेत.
देशाच्या बाकी भागांमध्ये फेब्रुवारी २०२७ पासून जनगणना करण्यात येणार आहे. जनगणना दोन टप्प्यात केली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात घर आणि निवासाशी संबंधित माहिती घेतली जाणार आहे. तर दुसऱ्या टप्प्यात प्रत्येक व्यक्तीची जनसांख्यिकीय आणि सामाजिक आर्थिक माहिती घेतली जाणार आहे.
त्यासाठी ४० प्रश्न विचारले जाणार आहेत ते खालील प्रमाणे आहेत.
१) तुमचे नाव काय आहे?
२) कुटुंबप्रमुखाशी तुमचे नाते काय आहे?
३) तुमचे लिंग काय आहे? (पुरुष/महिला/इतर)
४) तुमची जन्मतारीख आणि पूर्ण वर्षांतील वय किती आहे?
५)तुमची सध्याची वैवाहिक स्थिती काय आहे?
६) विवाहाच्या वेळी तुमचे वय (पूर्ण वर्षांमध्ये) किती होते?
७)तुमच्या पती/पत्नीचे नाव काय आहे?
८) तुमची घोषित राष्ट्रीयत्व काय आहे?
९) तुमचा धर्म कोणता आहे?
१०)तुम्ही अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST) किंवा इतर कोणत्या जातीचे आहात?
११) तुमच्या वडिलांचे नाव आणि तपशील काय आहेत?
१२)तुमच्या आईचे नाव आणि तपशील काय आहेत?
१३) तुम्ही कोणत्याही प्रकारच्या दिव्यांगत्वाने प्रभावित आहात का?
१४) तुमची मातृभाषा कोणती आहे १५) तुम्हाला इतर कोणत्या भाषा येतात?
१६) तुमची साक्षरता आणि डिजिटल साक्षरता (संगणक/मोबाईल वापर) किती आहे?
१७) तुम्ही सध्या कोणत्याही शैक्षणिक संस्थेत शिक्षण घेत आहात का?
१८)तुमची सर्वोच्च शैक्षणिक पात्रता काय आहे आणि तुमचा विषय/शाखा कोणती होती?
१९) गेल्या एका वर्षात तुम्ही कधीही आर्थिक काम केले आहे का?
२०) तुमच्या आर्थिक क्रियाकलापाची श्रेणी कोणती आहे?
२१) तुमचा मुख्य व्यवसाय किंवा पेशा कोणता आहे?
२२) तुमच्या कामाची/व्यवसायाची उद्योग, व्यापार किंवा सेवा यापैकी कोणती प्रकृती आहे?
२३) कामाच्या आधारावर तुमची श्रेणी कोणती आहे? (उदा. नियोक्ता, कर्मचारी, स्वयंरोजगार इ.)
२४) तुम्ही गैर-कामगार असल्यास तुमची गैर-आर्थिक गतिविधी काय आहे?
२५) तुम्ही काम करत नसल्यास, तुम्ही कामाच्या शोधात आहात का किंवा कामासाठी उपलब्ध आहात का?
२६) तुम्ही कामाच्या ठिकाणी कशाप्रकारे प्रवास करता आणि किती अंतर कापता?
२७) तुमचे जन्मस्थान कुठे आहे?
२८) या ठिकाणापूर्वी तुमचे शेवटचे निवासस्थान कोणते होते?
२९) निवासस्थान बदलण्याचे (स्थलांतराचे) मुख्य कारण काय होते?
शेवटचे निवासस्थान बदलल्यानंतर ३०) तुम्ही या गावात/शहरात किती काळापासून राहत आहात?
३१) तुमचा कायमस्वरूपी निवासी पत्ता काय आहे?
३२) सध्या तुमची किती मुलं आहेत? (केवळ विवाहित, विधवा आणि घटस्फोटित महिलांसाठी)
३३) तुमची एकूण किती मुलं जन्माला आली होती? (केवळ विवाहित, विधवा आणि घटस्फोटित महिलांसाठी)
गेल्या एका वर्षात तुम्ही किती मुलांना जन्म दिला? (केवळ विवाहित महिलांसाठी)
३४) तुम्ही कोविड-19 चे लसीकरण कुठे करून घेतले?
३५) तुमची एकूण किती बँक खाती आहेत?
३६) तुमचा मोबाईल क्रमांक काय आहे? (उपलब्ध असल्यास)
३७) तुमचा आधार क्रमांक काय आहे? (उपलब्ध असल्यास)
३८) तुमचा मतदार ओळखपत्र (Voter ID) क्रमांक काय आहे? (उपलब्ध असल्यास)
३९) तुमचा पासपोर्ट क्रमांक काय आहे? (भारतीय पासपोर्टधारक असल्यास)
४०) तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स आहे का?
जनगणना सुरु असताना अज्ञानाने किंवा अनवधानाने कोणताही चूक होऊ नये म्हणून जात अणि धर्म नोंद जागृत राहून करावी. असे आवाहन ओबीसी संघटने कडून तुकाराम माळी यांनी केले आहे.