बहुजनांचे मारेकरी
Bahujananche Marekari prastavana
बहुजनांचे मारेकरी - लेखक बापु म. राऊत
चार्वाक व वेनाला वैदीकानी ठार मारले.
चार्वाक विचाराला 'चार्वाक दर्शन ' किवा 'लोकायत दर्शन' म्हणतात. चार्वाक म्हणजे तत्वज्ञानाच्या क्षेत्रातील एक धगधगता निखारा.अन्याय व शोषणाधिष्ठीत व्यवस्थेवर कुठाराघात करणारी विचारसरणी. मानवी जिवनातील माधुर्यावर ऊत्कट प्रेम शिकवणारी एक जिवंत विचारप्रणाली.चार्वाकमत हे आधुनिक व पुरोगामी विचाराचे मुकुटमणी आहेत . लोकांची सतत फसवणूक करणार्या वैदिक संस्कृतीवर चार्वाकाने नेहमीच कठोर हल्ले चढविले. वैदिकांनी अनेक प्रकारे चार्वाक विचारसरणीच्या लोकांना छळले. बहिष्कार घालणे, ज्ञानाचे दरवाजे बंद करणे व प्रसंगी मारेकरी पाठवून ठार करणे असे हातखंडे वैदिकानी वापरले. तरीही चार्वाक हे वैदिकांच्या विरोधात सतत मोठ्या धैर्याने उभे राहिले.
वैदिकांनी वेदांना सर्वश्रेष्ठ, स्वयंभु व ईश्वर निर्मित असे मानले आहे. चार्वाक म्हणत, “वेद हे धुर्ताची निर्मिती आहे. वेद म्हणजे धुर्त, भंड व निशाचर यानी तयार केलेली संहिता होय". चार्वाक म्हणतो, धुर्त म्हणजे दुसर्याला फसविणारा, भंड म्हणजे विदुषक, तर निशाचर म्हणजे खोटे बोलणारा. चार्वाक म्हणतो, पुत्र होणे वा न होणे या दोन घटनांपैकी कोणतीही एक घटना घडू शकते. परंतु पुत्र झाला तर आपल्या मंत्रामुळे झाला आणि नाही झाला तर कर्मकांडामध्ये काही अपुरेपणा राहीला असे सांगन हे धर्त लोक थापा मारीत असतात. पावित्र्य, शुचीता वे विशुद्धता इत्यादी मुल्याचा मुखवटा धारण करावयाचा आणि प्रत्यक्षात मात्र आपले हितसंबंध जपायचे हे स्वार्थी लोकांचे धोरण असते. प्रत्येक काळात अशा लोकानी मुखवटे धारण केले आहेत.समाजवादी ,मार्क्सवादी व गांधीवादी हे सारे मुखवटे आहेत. मुखवट्याच्या आतमध्ये जो ब्रूर चेहरा असतो तो ते संधी मिळताच उघड करतात.चार्वाक पुढे म्हणतात, वेद हे ईश्वरोक्त वा अपौरुषमय नसून ते पौरुषमय आहेत. वेद व पुराण या ग्रंथामध्ये सदैव वैदिक ब्राम्हणांचे हित, सुख व संपती याबाबतीतच विवेचन आढळते. बहुजन समाजाच्या सुखी व समृध्दीच्या कोणत्याही गोष्टी त्यात नाहीत. म्हणून वेद व पुराणे हे ब्राम्हण वैदिकांचे हितसंबंध जपणारे ग्रंथ अपौरुषमय नसून ते वैदिकांनीच वैदिकांच्या भल्यासाठी लिहलेले आहेत. म्हणून चार्वाक म्हणतात केवळ आपले सामाजिक व धार्मिक जीवन सुखमय व्हावे यासाठी काही लोक आपल्या सोयीचे ग्रंथ लिहतात व त्याना पवित्रतेची मान्यता मिळावी म्हणून ते ईश्वराने तयार केले असा आभास निर्माण करतात. अशा पुस्तकात कोणालाही टिका-टिप्पणी व ढवळाढवळ करण्याचा अधिकार नाही असे स्पष्टपणे बजावतात.
वैदिकांनी 'कर्मसिध्दांत' भोळ्याभाबड्या बहुजनावर लादला आहे. या सिद्धांतामुळे शोषण व विषमता या विरुद्ध बंड करण्याची प्रेरणा मारली गेली आहे. दारिद्र्य व जातीव्यवस्थेतील कमीपणा याला सामान्य माणसे माझ्या गत आयुष्यात केलेल्या वाईट कर्माची निष्पत्ती आहे असे मानून अत्याचार व गुलामी सहन करीत असतात. शोषक समाजव्यवस्थेचे चित्रण भोळ्या बहुजनाला समजत नाही. अपमान व दुःख निमुटपणे ते सहन करीत असतात. त्यामुळे प्रचलित समाज व्यवस्थेविरुद्ध बंड करण्याची उर्मीच बहुजनात तयार होत नाही. जे माझ्या नशिबी लिहिले आहे तेच सत्य होय असे नेहमी वाटत असते.चार्वाकानी म्हटले,“ मरण हेच मोक्ष होय”. कर्मसिद्धांत नाकारताना त्यानी प्रयत्नवादाचा पुरस्कार केला.वैदिकांचे धर्माचरण हे पैसा मिळविण्याचे साधन होय. लोकांना आपल्या वंशाचा व वर्णाचा अकारण अभिमान असतो. आपला वंश शुद्ध, पवित्र व श्रेष्ठ आहे अशी त्यांची श्रद्धा असते. ते वास्तवाकडे डोळेझाक करीत असतात. भ्रामकपणांचे तत्वज्ञान मांडणा-या वैदीक संस्कृतीवर चार्वाकाने कठोर हल्ले चढविले.चार्वाक हे इश्वराचे अस्तित्व नाकारत होते.त्यानी वैदीकांच्या वर्चस्वाला नकार दिला. यज्ञ संस्कृती बाबत स्वत:चा धंदा सोडुन यज्ञ पाहत बसणे व हातचे सोडुन काल्पनिक धनाच्या पाठीमागे धावणे हे चार्वाकाला मुळीच पटत नव्हते. म्हणून वैदीक चार्वाकाची नास्तिक म्हणुन हेटाळणी करीत. 'जो वेदाला नाकारतो तो नास्तीक', अशी नास्तिकपणाची व्याख्या ब्राम्हणांनी करुन ठेवली होती. वास्तविक नास्तिकतेची ही व्याख्याच चुकीची आहे. ज्या गोष्टीचे मुळातच अस्तित्व नाही त्या गोष्टीचे स्विकारणे हा नास्तीकपणा होय, तर केवळ अस्तित्वात असलेल्या गोष्टीचे समर्थन करणे हा आस्तिकवाद होय'. चार्वाक मूळातच अस्तित्वात असलेल्या गोष्टीचे समर्थन करीत त्यामुळे ते आस्तिकच होत.
वैदीक संस्कृती ही कधीच सहिष्णू नव्हती. या संस्कृतीने नेहमीच हत्या केल्या आहेत. चार्वाक मताच्या अनेक अनुयायाचा त्यांनी खात्मा केला. पूर्वीच्या काळात जिवात्म्याने केलेल्या कर्माची फळे त्याला पुनर्जन्म घेऊन फेडावी लागतात. हा वैदिकांचा कर्म सिध्दांत आहे.परंतु चार्वाकाने मृत्युनंतर आत्म्याला कर्माची फळे भोगावी लागतात हा विचार धुर्ताचा आहे व बहुजन समाजाने आत्मा व पुनर्जन्म हा विचार टाकून दिला पाहीजे असी भूमिका घेतली म्हणजे चार्वाकानी अन्यायावर आधारलेल्या समाजव्यवस्थेला नाकारले होते.
ज्यांचे खायचे त्याच्यावरच उलटायचे ही वैदीकांची पारंपारीक नीती आहे. या नितीतून राजे सुध्दा सुटले नाहीत. वेन हा चार्वाक विचारांनी भारावलेला राजा होता. त्याने सत्तेवर येताच यज्ञ,दान आदी कर्मकांड निषिद्ध ठरविले. कोणीही यज्ञ, यजन, दान व हवन करु नये अशी राजाज्ञा काढली. त्यामुळे वैदिकांच्या प्रतिष्ठा व कमाईला धक्का बसला. ते वेनाला धमकाऊ लागले व म्हणू लागले, “ यज्ञधर्म नष्ट झाला तर सर्व जग नष्ट होते. यज्ञात अर्पण केलेल्या आहुतीचा परिणाम म्हणन हे सर्व जग चालले आहे ”. तरीही वेनाने यज्ञाला मान्यता दिली नाही. मुनी खवळले, या पाप्याला ठार मारले पाहीजे असे कुंजबुजत कट रचू लागले व कट रचून वेनाला ठार मारले. वेनाने राजकीय व लष्करी सत्ता आपल्या हातात असूनही आपल्या विरोधकांना ठार मारले नाही वा छळ केला नाही. पण विना शस्त्र वैदिकांनी डावपेचाद्वारे वेनाला ठार मारले. इतर सामान्य माणसाप्रमाणे कष्ट व मेहनत करा व सामान्या प्रमाणेच जीवन जगा. ही वेनाची वैदिक ब्राम्हणांप्रती निती होती. ते राज्यातील सर्व जनतेला एकाच मापात मोजून समान वागणूक देत हे तर राज्याचे कर्तव्यच असते, पण फुकटात खायची सवय झालेल्या ब्राम्हणांना हे कसे पटणार ?. त्यानी वेनाच्या या नितीचा निषेध केला व आपल्या नितीप्रमाणे वेन राजाची विल्हेवाट लावली.