बहुजनांचे मारेकरी
Bahujananche Marekari prastavana
बळी राजाला फसवून ठार मारले
भारताच्या भूमीवर बळी नावाचा राजा होऊन गेला. हा बळी बहुजन नायक हिरण्यकश्यपु व प्रल्हाद यांचा वंशज होय. हा बळी राजा महापराक्रमी व दानशूर होता. बळीच्या राज्यात सर्व जनता सुखी व समृद्ध होती. सर्वाना समान वागणूक मिळत होती. समानता व संपन्नता या गुणानी त्याचे राज्य विपुल होते. राज्यात वर्णभेद व वर्गभेदाला थारा नव्हता. स्त्रियांना समाजात मानाचे स्थान होते. कोणीही कोणावर अत्याचार करीत नव्हते. अशा या लोकहितवादी राजाचे साम्राज्य इथल्या वैदिक आर्याच्या डोळ्यात सारखे खुपत होते. त्यावेळी आर्य टोळी चा प्रमुख ‘वामन' हा होता. या वामनाने बळीला अनेक प्रकारे हरविण्याचा प्रयत्न केला. पण लोककल्याणकारी राजा बळी ला हरवू शकला नाही. म्हणन कपट व छल नितीने बळी राजाला मारण्याचे ठरले. एका ब्राम्हण ऋषीची वेषभूषा परिधान करून आर्यप्रमुख वामन बळीला भेटायला आला. या वेषांतर केलेल्या वामनाने भिक्षेत बळीला तीन पाऊले जमीन मागितली. दानशूर बळीने तीन पाऊले जमीन देण्याचे मान्य केले. वामनाने एक पाय जमिनी (पृथ्वी) वर व दुसरा पाय आकाशात व तिसरा पाय ठेवण्यासाठी बळीचे डोके मागितले.
सत्यवादी व दानशूर बळीने आपले डोके समोर केले. डोके समोर करताच वामनाने बळीच्या डोक्यावर पाय ठेऊन त्याला जमीनीत (पाताळात)गाडले. म्हणजेच बळीचा खून केला. आर्य ब्राम्हण यालाच 'वामनावतार' असे म्हणतात. वास्तविक तीन पायाचा माणूस अजुन तरी जगाच्या पाठीवर आढळला नाही. एक पाय जमीनीवर व दुसरा पाय पाताळात असणे अशा 180 च्या कोनात व्यक्ती उभी राहू शकत नाही. पण बळीच्या खुनाचा आरोप आपल्यावर येऊ नये म्हणून ब्राम्हणांनी कथा रचल्या व त्या सत्यकथा आहेत असे सांगुन बहुजन समाजाला मुर्ख बनविले. बळीची सत्ता हातात घेऊन ब्राम्हणांनी जनसामान्य बहुजनांचा छळ सुरु केला. बळीच्या राज्यात मिळणा-या सुखापासुन सामान्य जनता वंचित झाली व वामनाच्या ब्राम्हणी व्यवस्थेला दुषणे देऊ लागली. वामनाच्या काळत बहुजन समाजावर अत्याचार करण्यात आले. बळीच्या राज्यात सुखी असलेली जनता दुःखी झाली. आजही बहुजन समाज बळीचे नाव मोठ्या आदराने व ममतेने घेत असतो.
'ईडा पिडा टळो व बळीचे राज्य येवो', असे वचन सर्रास ग्रामीण भागात आजही वापरले जाते. दक्षिणेतील 'ओनम' हा सण बळी राजाचा उत्सव आहे. बळीच्या स्मृतीप्रित्यर्थ 'ओनम' नावाचा सण धुमधड्याकात साजरा करतात. दस-याला सोने लुटून घरात प्रवेश करणा-या भावाला त्याच्या आया बहिणी ' ईडा पिडा टळो बळीचे राज्य येवो' असे म्हणतात. बळीचे राज्य परत यावे म्हणुन प्रार्थना करतात. परंतु बहुजन समाज ज्या व्यक्तीला आदर्श मानतो व त्यांची मनोभावे पुजा करतो. त्या आदर्श पुरुषाचा शेणाचा पुतळा बणवून ब्राम्हण त्याचे पोट फाडतात नंतरच घरात प्रवेश करतात याचाच अर्थ असा की बहुजन समाज व भटाब्राम्हणाची विचारधारा आणि कृती ह्या एकमेकाविरुध्द आहेत. म्हणून भटाब्राम्हणांचा व बहुजनांचा धर्म एक होऊ शकत नाही. त्यांचे नाते शोषक व शोषित असे आहे. परंतु भटकलेला बहुजन समाज आज ब्राम्हणांची तळी उचलतो. अज्ञानापोटी आपल्याच गुलामीचा आनंद व्यक्त करीत असतो.