ओबीसी बहुजन आघाडी निवडणुकीत सर्व जागा लढविणार

दिगंबर लोहार; कोकरूड येथील बैठकीत निर्धार

     शिराळा, दि. १२ - प्रस्थापितांच्या विरोधात बहुजन समाजाच्या घटनात्मक हक्क आणि अधिकारांच्या संरक्षणासाठी ओबीसी बहुजन आघाडी शिराळा तालुक्यातील नगरपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूकीत सर्व जागांवर आपले उमेदवार उभे करणार असल्याचे प्रतिपादन ओबीसी बहुजन आघाडीचे सहसचिव दिगंबर लोहार यांनी केले.

OBC_Bahujan_Aghadi_Gears_Up_to_Contest_All_Seats_in_Upcoming_Elections

    कोकरुड, ता. शिराळा येथे आयोजित ओबीसी बहुजन आघाडी बैठकीत ते बोलत होते. ओबीसी बहुजन आघाडी तालुकाध्यक्ष बाबासाहेब कदम म्हणाले, वेळोवेळी ओबीसीना डावलले जात आहे. आता ओबीसी हक्क आणि अधिकार यासाठी लढणार असून, पुर्वजांनी लढून मिळवलेले हक्क अधिकार टिकवून ठेवण्यासाठी ओबीसी बहुजनांच्या आत्मसन्मानाची ही निवडणुक असल्याने आमचा विजय नक्की होणार आहे. निवडणुकीत ओबीसींतर्फे सर्वच ठिकाणी उमेदवार उभे करणार असून समाजाने उमेदवारांच्या पाठीशी रहावे, असे आवाहन निवांत कोळेकर यांनी केले.

    यावेळी पंडित परिट विकास सुतार, सुभाष सुतार, संतोष कुंभार, संजय पोतदार, सागर सुतार, नारायण सनगर, प्रकाश गंगधर, संजय गुरव, सागर देसक, संजय यादव, तानाजी पवार, बजरंग गायकवाड, आनंदा लोहार, राजू सुतार, गणेश सुतार, संजय गायकवाड, सचिन कासार, संजय महाजन उपस्थित होते. विकास कुंभार यांनी सुत्रसंचालन केले. वैभव वाघमारे यांनी आभार मानले.