राजूरकर : वेंडली येथून ओबीसी जनजागृती भेटीगाठी अभियानाची सुरवात
चंद्रपूर, ता. २ राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे रवींद्र टोंगे यांनी मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यात येऊ नये या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी तब्बल २९ दिवस अन्नत्याग आंदोलन केले आहे. आरक्षण वाचविण्यासाठी त्यांनी परत आंदोलनाची तयारी केली आहे. आपल्या हक्कासाठी प्रत्येकांमध्ये जागरूकता आली आहे. राज्य शासनाने ओबीसी समाजाला गृहित धरण्याची चूक करू नये. सरकारने कुठल्याही परिस्थितीत मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देऊ नये, अशी ठाम भूमिका राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे महासचिव सचिन राजूरकर यांनी मांडली.
या अभियानाचे उद्घाटन राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे प्रदेश कार्याध्यक्ष दिनेश चोखारे यांच्याहस्ते झाले. कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून ऋषभ राऊत, तर प्रमुख पाहुणे म्हणून ओबीसी योद्धा रवींद्र टोंगे, डॉ. संजय घाटे, प्रेमानंद जोगी, अनिल डहाके, डॉ. दिलीप कांबळे, दिनेश कष्टी, शाम लेडे, देवराव सोनपित्तरे, भाऊराव झाडे, देवा पाचभाई, गजानन कष्टी, अरुण देऊलकर, एम. व्ही. पोटे, पांडुरंग गावतुरे, जंगलू पाचभाई, हितेश
लोडे, गोवर्धन पिपालशेंडे, उपसरपंच राजकुमार नागपुरे, बबनराव राजूरकर, गजानन कष्टी, मनीषा बोबडे, संध्या पिंपळशेंडे यांची उपस्थिती होती.
राजूरकर पुढे म्हणाले, निम्मे सत्र संपूनही ओबीसी विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात मुला-मुलींसाठी वसतिगृह सुरू झालेले नाहीत. वसतिगृह नाही, तर किमान आधार योजना लागू करून ओबीसी विद्यार्थ्यांना दिलासा देणे आवश्यक होते. सरकार प्रत्येक गोष्टीत दिरंगाईचे धोरण अवलंबत आहे. बिहारच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारने जातीनिहाय सर्व्हेक्षम करणे आवश्यक आहे. यातून ओबीसींना आणि सरकारलाही नेमक्या परिस्थतीची जाणीव होईल.
ऋषम राऊत यांनी आपल्या संविधानिक हक्कासाठी जागरूक राहून आरक्षण वाचविणे आपल्या प्रत्येकाचे कर्तव्य असल्याचे मत मांडले. प्रणाली मुसळे यांनी प्रास्ताविकातून अभियानाची रूपरेषा मांडली.
संचालन गौरी मोहितकर यांनी, तर आभार मैथली देवालकर यांनी मानले. कार्यक्रमाला रंजित पिंपळशेडे, वैभव क्षीरसागर, दीपक पिंपळशेडे, अमित टोंगे, विशाल धाबेकर, नंदकिशोर टोंगे, प्रकाश चालूरकर, सुमित देवाळकर, गौरव देवाळकर, उदय टोंगे, अविनाश टोंगे, सूरज देवाळकर, अनिकेत पिंपळशेडे, राहुल चालूरकर, संजय देवाळकर, राकेश धांडे, श्रीकृष्ण देवाळकर, सतीश पाचभाई, आशिष देवाळकर, सारंग पिंपळशेंडे, आशिष पाचभाई उपस्थित होते.