अशोक चव्हाण : मराठा समाजाची दिशाभूल करू नये
कोल्हापूर : "मराठा आरक्षणासाठी कोल्हापूर किंवा मुंबईत दहा बैठका घेतल्या तरीही त्याचा काहीही होणार उपयोग नाही. केंद्र सरकार आरक्षणामध्ये असणारी ५० टक्क्यांची अट शिथिल करत नाही, तोपर्यंत मराठा आरक्षण मिळणार नाही. त्यासाठी दिल्लीतच बैठक घेणे आवश्यक आहे. यापूर्वी मराठा समाजाला दिलेले आरक्षण केवळ मतांसाठीच होते, अशी टीका माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली.
भावनांशी खेळ
■ आरक्षण हा कोणत्याही एका पक्षाचा प्रश्न नाही. तरीही मराठा समाजाला झुलवत ठेवण्याचे काम अनेक ठिकाणी घडत आहे. लोकांच्या भावनेशी निगडित ही बाब असताना त्यांच्याशी खेळत असल्याच •आरोप चव्हाण यांनी केला.
मराठा विरुद्ध ओबीसी होऊ नये
■ ओबीसीमधून आरक्षण मागितल्यास नव्याने वाद निर्माण होऊ शकतो. याऐवजी केंद्र सरकारने आरक्षणातील ५० टक्क्यांची अट शिथिल केली तर मराठा आरक्षण मिळू शकणार असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.