भाजपला अप्रत्यक्ष होणारी मदत टाळण्याची भुमिका
यवतमाळ - महाविकास आघाडीसोबत लोकसभाच्या जागा वाटपावरून वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांचे महाविकास आघाडीसोबत अजूनही एकसुर जुळल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे ' वंचित' लोकसभेच्या तोंडावर पुन्हा २०१९ चीच भुमिका घेतली तर ? अशी शंका आंबेडकरी जनतेमधून व्यक्त केली जात आहे. मात्र २०२४ मध्ये निवडणुकीच्य माध्यमातून लोकशाही भक्कम करायची असल्याने कुठल्याही परिस्थितीत भाजपला फायदा व्हायला नको म्हणून जर स्वतंत्रपणे निवडणुक लढण्याचा निर्णय ‘वंचित'कडून झाला तर जिल्ह्यातील आंबेडकरी समाज महाविकास आघाडीच्या सोबत राहण्याची भुमिका वाघापुर, वडगाव, पिंपळगाव, उमरसरा, वैशालीनगर, लोहारा, भोसा या भागातील समाजबांधवांनी छोटेखानी बैठकांमधून स्वयंस्फुर्तीने घेणार असल्याची माहिती बैठकीमध्ये उपस्थित असलेल्या आंबेडकरी अनुयायांनी दिली.
तश्या स्थितीत ' वंचित' ला मत देवून भाजपला ताकद देण्याऐवजी महाविकास आघाडीच्या सोबत राहण्याची भुमीका आंबेडक जनतेकडून कॉर्नर बैठका घेवून समाजबांधवांसमोर मांडली जात आहे.