ओबीसींचा एल्गार, जत तहसीलवर मोर्चा

सर्वपक्षीय नेत्यांची उपस्थिती : मागण्या मान्य न केल्यास आंदोलनाची व्याप्ती वाढविणार

     जत - जतेत "ओबीसी विविध मागण्यांसाठी आज सकल ओबीसी समाजाच्यावतीने मोर्चा काढण्यात आला. मोर्चाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानापासून होऊन, महाराणा प्रताप चौक, गांधी चौक, संभाजी चौक मार्गे तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला.

OBC_march_on_Jat_Tehsil     या मोर्चात ओबीसीचे राज्याचे नेते माजी आमदार प्रकाश शेंडगे, शंकरराव लिंगे, डीपीआयचे अध्यक्ष सुकुमार कांबळे, ओबीसी संघटनेचे जिल्हाध्यक्ष संजय विभुते, लक्ष्मण हाके, लोकमत पतसंस्थेचे संस्थापक शंकरराव वगरे, अशोक बनेनवार, सरदार पाटील, तुकाराम माळी, सरदार पाटील, महादेव पाटील, सलीम गवंडी, संजय कांबळे, बंडू डोंबाळे, विक्रम ढोणे यांनी आरक्षणासंदर्भात आपली मते व्यक्त केली.

    यावेळी जिल्हा बँकेचे संचालक मन्सूर खतीब, रमेश पाटील, आकाराम मासाळ, परशुराम मोरे, सलीम पाच्छापुरे, अशोक बनेनवार, यांच्यासह असंख्य ओबीसी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    मोर्चाचे रूपांतर तहसील कार्यालयासमोरील प्रांगणात सभेत झाले. यावेळी नेत्यांची भाषणे झाली.

सभेत करण्यात आलेल्या मागण्या

    धनगर जमातीच्या अनुसूचित जमाती आरक्षणाची अंमलबजावणी करावी. ओबीसी प्रवर्गात मराठा समाजाचा समावेश करू नये. बिहारच्या धर्तीवर महाराष्ट्रात ओबीसींची जातनिहाय जनगणना करावी. मराठा समाजाला देण्यात आलेली खोटी कुणबी प्रमाणपत्रे रद्द करावीत. खोटी बिंदुनामावली तयार करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कार्यवाही करावी. ७ सप्टेंबर २०२३ रोजी कुणबी सर्टिफिकेट देण्यासाठी सरकारने काढलेला जीआर रद्द करावा. अशा मागण्या करण्यात आल्या.