मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यावे, पण ओबीसीतून नको. धाराशिव येथे ओबीसी समाजाची बैठक महाएल्गार मेळाव्यासंदर्भात चर्चा
धाराशिव - राज्यात मराठा समाज आरक्षण मागत आहे. त्यांना सरकारने स्वतंत्र आरक्षण द्यावे. या आरक्षणाला ओबीसी समाजाचा अजिबात विरोध नसून ओबीसी समाजाला असलेल्या आरक्षणातून देऊ नये. ओबीसी समाजामध्ये याबाबत जनजागृती करण्यासाठी ओबीसींचा महा एल्गार मेळावा धाराशिव जिल्ह्यात घेण्यात येणार आहे. या संदर्भात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीमध्ये सविस्तर चर्चा करण्यात आली.
यावेळी धनंजय शिंगाडे, पांडुरंग कुंभार, कैलास शिंदे, डॉ स्नेहलता सोनकाटे, रज्जाक अत्तार, दिपक जाधव, रचि कोरे-आळणीकर, बाळासाहेब शिंदे, आबासाहेब खोत, उमाकांत लकडे, अक्षय माने आदींसह इतरांनी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन लक्ष्मण माने यांनी तर आभार संतोष भोजने यांनी मानले. या बैठकीत धाराशिव, तुळजापूर, उमरगा, लोहारा, वाशी, कळंब, भूम व परंडा या तालुक्यातील ओबीसी समाज बांधव जिल्हाभरातून मोठ्या संख्येने उपस्थित होते.