ओबीसी आरक्षणाला विरोध करणाऱ्यांचा पराभव निश्चित - प्रा. श्रावण देवरे

     परतवाडा - ओबीसीच्या संविधानात्मक आरक्षणाला विरोध करणाऱ्या लोकप्रतिनिधींचा आगामी निवडणुकीत पराभव निश्चित होणार असल्याचे प्रतिपादन आ. बच्चू कडू यांचे नाव न घेता ओबीसी राजकीय आघाडीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. श्रावण देवरे यांनी केले.

The_defeat_of_those_opposing_OBC_reservation_is_certain      ते येथील क्रांतिज्योती ब्रिगेड संघटनेतर्फे आयोजित स्थानिक जिनियस स्टडी सर्कलमधील ओबीसी संवाद बैठकीला प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन करताना बोलत होते. बैठकीच्या अध्यक्षस्थानी क्रांतिज्योती ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष अॅड. नंदेश अंबाडकर उपस्थित होते, तर प्रमुख अतिथी म्हणून म. फुले बँकेचे उपाध्यक्ष प्रमोद कोरडे, शोभा देवरे, संयोजक मनोज अंबाडकर उपस्थित होते.

     ते पुढे म्हणाले की, जे लोकप्रतिनिधी ओबीसी समाजाची मते घेऊन निवडून येतात आणि दुटप्पी भूमिका घेऊन ओबीसी योद्धा ना. छगन भुजबळ आणि ओबीसी आरक्षणाला विरोध करतात, अशा संधीसाधू प्रस्थापित मराठाथार्जीने उमेदवारांविरुद्ध ओबीसी समाज एकजूट होऊन त्यांना सत्तेतून खाली खेचतील, यात आता शंका नाही. दरम्यान, विद्रोही कवी पंढरी पगारे यांनी ओबीसी आरक्षणावर कविता सादर केली. बैठकीचे संचालन विनोद लांडे यांनी केले. तर आभार अॅड. नंदेश परतवाडा येथे ओबीसी संवाद बैठक अंबाडकर यांनी मानले. याप्रसंगी जयकुमार चर्जन, प्रा. लक्ष्मीधर मुळे, ओमप्रकाश अंबाडकर, कृषक आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर वानखडे, रामदास मसने, प्राचार्य श्रीकृष्ण गोरडे, वसंत धोबे, सुधीर रसे, नितीन गणोरकर, तुषार खेरडे, गणेश बेलसरे, प्रा. डॉ. आशिष सोनार, योगेश पवार, राजेश भुयार, डॉ. निलिमा मुळे, योगिता सोनार, शीला चर्जन, जया नेरकर, माधुरी भुयार, शुभांगी रसे, सुहास बेलसरे, नीलेश गोरडे, अरुण गणोरकर, सुनील राऊत, प्रमोद शेवतकर, नंदकिशोर बासनकर, आकाश भिवरकर आदी ओबीसी बांधव उपस्थित होते.