वणी :- छ. शिवाजी महाराजांचा चेहरा आणि व्यक्तीमत्व एवढे आश्वासक आणि मोहक होते की राजांची जनताच नव्हे तर त्यांचे शत्रुही त्यांच्या व्यक्तीमत्वाने प्रभावित होत. त्यामुळे आग्रा दरबारात शिवाजी महाराजांच्या समोर येण्याचे औरंगजेबाने टाळले होते. असे प्रतिपादन गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली चे सिनेट सदस्य आणि चंद्रपुर जिल्हा संभाजी ब्रिगेड चे अध्यक्ष प्रा.डॉ. दिलीप चौघरी यांनी केले.
या जाहीर सभेचे अध्यक्षीय मार्गदर्शन मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष अंबादास वागदरकर यांनी केले.स्वागतपर मनोगत स्वागताध्यक्ष तथा कापुस पणन महासंघाचे संचालक संजय खाडे यांनी व्यक्त केले. तर प्रास्ताविक भुमिका संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष अजय धोबे यांनी मांडली. जाहीर सभेच्या पुर्वी मान्यवरांकडून शिवरायांच्या पुतळ्याला माल्यार्पण करण्यात आले.जाहीर सभेच्या प्रारंभी जिजाऊ,शिवरायांना अभिवादन झाले.नामदेव ससाणे,अमोल बावने,सोनाली थेटे,किरण गोडे यांनी सामुहिक जिजाऊ वंदना सादर केली.सोबतच कॉम्रेड शंकरराव दानव आणि शेतकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष जिवन पा.कापसे यांना मौन आदरांजली देण्यात आली.याप्रसंगी मराठा सेवा संघाचे वतीने शेतमालाला रास्तभाव,जातनिहाय जनगणना,सरकारी नौकर भरती आणि जुनी पेन्शन योजना या संदर्भाने शासनाला पाठवायच्या निवेदनाचे ठराव मंजुर करण्यात आले.संजय गोडे यांनी या ठरावाचे वाचन केले तर उपस्थितांनी हात उंचावून या ठरावाला संमती दिली.या कार्यक्रमाला उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे,प्रा.बाळकृष्ण राजुरकर,नामदेव जेनेकर,डॉ.शांताराम ठाकरे,रमेश येरणे,भारती राजपुत,देवराव धांडे, विधीज्ञ विनोद चोपणे,मंगल तेलंग,विजय नगराळे आणि डॉ.अविनाश खापने हे प्रमुख मान्यवर म्हणुन उपस्थित होते.
सुरवातीस श्रीजा धांडे या चिमुकलीने सादर केलेली शिवगर्जना आणि सुरभी कुचनकर,धृव नीखाडे,स्वामिनी कुचनकर,सुषमा डाहुले यांनी शिवचरित्रावर सादर केलेले संक्षिप्त सादरीकरण लक्षणीय ठरले. या वेळी दशरात्रौत्सवात संपन्न झालेल्या स्पर्धांचे बक्षीस वितरण क्रां.सावित्रीबाई फुले वाचनालयाचे वतीने मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.संपुर्ण कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संभाजी ब्रिगेडचे दत्ता डोहे आणि आशिष रिंगोले यांनी केले.तर उपस्थितांचे आभार मराठा सेवा संघाचे नितीन मोवाडे यांनी मानले.यशस्वितेकरिता भाऊसाहेब आसुटकार,सुरेंद्र घागे,विधीज्ञ अमोल टोंगे,वसंत थेटे,मारोती जिवतोडे आदींनी प्रामुख्याने परिश्रम घेतले. कार्यक्रमाला वणीकर जनतेची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.