ओबीसी जनगणना संकल्प यात्रा जिल्ह्यात

     चंद्रपूर, ता. ८ जातीनिहाय जनगणना करण्यात यावी, मराठ्यांचे ओबीसीकरण करू नये यासाठी ओबीसी जनगणना संकल्प यात्रेला सेवाग्राम येथून सुरूवात झाली. ही यात्रा आज ब्रह्मपुरीत दाखल झाली आहे. येत्या १२ फेब्रुवारी रोजी चंद्रपुरात येणार आहे. जिल्ह्यात यात्रेचे स्वागत करण्यासाठी ओबीसी सेवा संघतर्फे सकल ओबीसी समाजाची बैठक पार पडली.

OBC_janganana_Sankalp_yatra     ओबीसी जनगणना संकल्प यात्रा संयोजक उमेश कोर्राम, संघर्ष वाहिनीचे दीनानाथ वाघमारे, ओबीसी सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष प्रा. अनिल डहाके यांच्या नेतृत्वात निघाली आहे. १२ फेब्रुवारीला यात्रेचे आगमन होईल. वडगावफाटा ते दीक्षाभूमीपर्यंत पैदल मार्च काढण्यात येणार आहे.

    दीक्षाभूमी येथे यात्रेचा समारोप होईल. यात्रा नियोजन करण्यासाठी धनोजे कुणबी समाज मंदिरात पार पडलेल्या बैठकीला अध्यक्ष सूर्यकांत खनके, अॅड. सातपुते, नंदू नागरकर, प्रा. अनिल डहाके, हिराचंद बोरकुटे, लक्ष्मणराव धोबे, विजयराव टोंगे, संदीप गिर्हे, प्रा. नरेंद्र बोबडे, सुनील मुसळे, डॉ. कांबळे, अनिल शिंदे, अवधूत कोठेवार, विलास माथानकर, प्रा. सुरेश विधाते यांच्यासह अन्य जणांची उपस्थिती होती.