वडगाव फाटा ते दीक्षाभूमीपर्यंत निघाली यात्रा
चंद्रपूर १३ फेब्रुवारी - मराठ्यांचे ओबीसीकरण करू नये, ओबीसींची जनगणना करण्यात यावी, ओबीसींचे ७२ वसतिगृह, आधार योजना सुरू करावी, २६ जानेवारीला काढलेली अधिसूचना करावी आदी मागण्यांना घेऊन वर्धा जिल्ह्यातील सेवाग्राम येथून निघालेल्या ओबीसी जनगणना संकल्प यात्रेचा समारोप चंद्रपूर महानगरात झाला. महानगरातील वडगाव फाटा ते दीक्षाभूमीपर्यंत पायी मार्च काढण्यात आला.
सोमवारी सायंकाळी ५.३० वाजता वडगाव फाटा - जनता कॉलेज चौक- वरोडा नाका प्रियदर्शिनी सभागृह जटपुरा गेट-छत्रपती शिवाजी महाराज चौक महात्मा गांधी चौक- डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक - बॅ. खोब्रागडे स्मारक जटपुरा गेट दवाबाजार- रामनगर चौक मार्गे दीक्षा भूमी येथे यात्रेचा समारोप झाला.
यावेळी झालेल्या समेत उमेश कोराम, प्रा. अनित डहाके, अॅड. पुरुषोत्तम सातपुते, प्रा. सूर्यकांत खनके यांनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक मनस्वी गिडे यांनी तर आभार प्रमोद पाटील यांनी मानले.