माननीय प्रधानमंत्री,
भारत सरकार,
नवी दिल्ली.
विषय: अयोध्येच्या मंदिरात मूर्ती ऐवजी ज्ञानाचा प्रकाश देणाया सावित्रीची शाळा सुरू करणे बाबत...
सन्माननीय प्रधानमंत्री साहेब, आपणास देशातील ९५ टक्के जनतेच्यावतीने नम्र विनंती करते की, आपला भारत देश संविधानावर चालणारा देश असून, धर्मनिरपेक्ष राष्ट्र म्हणून आपल्या भारताला जगात मानाचे स्थान आहे. परंतु आपण देशाच्या सांविधानिक पदावर असताना देखील, चातुर्वर्ण्य व्यवस्थेच्या म्हणजेच मनुवादी ब्राह्मणी व्यवस्थेच्या दबावास बळी पडून त्यांच्या वर्णव्यवस्था मजबूत करण्याच्या धार्मिक अजेंड्याखाली, भारतीय जनतेला अंधश्रद्धेच्या खाईत ढकलून, मानसिक विकलांग करत विषमतावादी व्यवस्थेचे गुलाम बनवित आहात. खरेतर बहुजनांचा नेता देशाचे नेतृत्व करत असताना, खऱ्या अर्थाने मंदिरातील मूर्ती, बहुजन समाजाला वैचारिक विकासात्मक दृष्टी देईल का ? हा प्रश्न अनुत्तरितच राहतो. यावर विचार व्हायला हवा. अयोध्येत कुठलाही ऐतिहासिक पुरावा नसलेल्या काल्पनिक रामाची मूर्ती स्थापन करून, देशाला अज्ञानाच्या अंधकारात टाकण्याऐवजी त्या मंदिरात ज्ञानाचा प्रकाश देणाऱ्या सावित्रीमाईंची शाळा सुरू करावी.
धन्यवाद, जय भारत.
देशाला अंधश्रद्धेच्या खाईत ढकलून मानसिक विकलांग करत गुलाम बनवणाऱ्या मनुवादी प्रवृत्तीच्या विरोधात या पत्राचा जास्तीत जास्त वापर करून जनजागृती करावी.
आपली विश्वासू
प्रिया वंदना सुभाष नप्ते