आदर्श नगर नागपूर येथे भिमाकोरेगाव विजयी शौर्य दिवस साजरा
भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे झालीत पण भारतीयांची परिस्थिती इंग्रज राजवटीपेक्षाही वाईट देशातील राज्यकर्त्यांनी केलेली आहे. देशातील शेतकरी व तरुण आत्महत्या करतो, तरुण बेरोजगार आहेत.खाजगिकरणाच्या माध्यमातून आरक्षणाची विल्हेवाट लावण्यात आली. नागरिकांना प्राथमिक गरजा पूर्ण करण्यासाठी संघर्ष करावा लागतो. राज्यातील 62000 शाळा शासन बंद पाडत आहेत. ओबीसीची जनगणना व 72 वसतिगृहाचा प्रश्न कायम आहे.लोकसभा मध्ये 33% महिलांना आरक्षण दिले,पण ओबीसी महिलांना त्यात वाटा दिला नाही. महाराष्ट्रात बियरची विक्री कमी का होते? यासाठी महाराष्ट्र शासनाने 5 IAS अधिकाऱ्यांची समिती नेमली, पण सरकारी शाळेत पटसंख्या कमी का होत आहे ? या संबंधात सरकारने एकाही अधिकाऱ्यांची समिती नेमली नाही. गरिबी, भूकमरी, कुपोषण ह्या समस्या आतापर्यंत संपल्या नाहीत.असे मत जगदिश वाडिभस्मे यांनी मांडले.