आरक्षणाची पोटदुखी
Aarakshan acchi potdukhi
जोशी : ब्राम्हणवादी ! म्हणजे तुम्ही मला तर म्हणत नाही ना ?
मी : त्याचे ते तुम्हीच ठरवायचे आहे. पण एवढं निश्चित प्रत्येकच ब्राम्हण हा ब्राम्हणवादी असतोच असे नाही. ब्राम्हणवाद ही एक सामाजीक व्यवस्था आहे. पूर्वकालीन ब्राम्हणांनी समाजात आपले स्थान सर्वश्रेष्ठ राहावे ह्यासाठी निरनिराळया स्मृती, पोथ्या, पुराणाच्या माध्यमातून विषमतावादी साहित्य निर्माण करून विषमतावादी समाज निर्माण केला. त्याकाळी शिक्षण देण्या-घेण्याचे आरक्षण त्यांनी स्वत:पुरतेच मर्यादित केले होते. ह्या विषमतावादी व्यवस्थेचे मुख्य निर्माते पूर्वकालीन ब्राम्हण असल्यामुळे ह्या व्यवस्थेला ब्राम्हणवादी व्यवस्था म्हणतात. मनु नावाच्या एका अमानवीय वृत्तीच्या ब्राम्हणाने ह्या विषमतावादी समाजाचे माणुसकीला काळीमा फासणारे कायदे व नियम 'मनुस्मृती' ह्या ग्रंथात लिखाणबद्ध केले, त्यामूळे कधीकधी ह्या व्यवस्थेला मनुवादी व्यवस्था असेही म्हणतात. आपणास माहीतच आहे की डॉ. बाबासाहेबांनी १९२७ ला म्हणूनच मनुस्मृतीचे दहन केले. मनुस्मृतीचे दहन हे विषमतावादी व्यवस्थेचे प्रतिकात्मक दहन होते. विषमतावादी मनुस्मृतीचे दहन केल्यावर समतावादी स्मृती लिहण्याची जबाबदारीही डॉ. बाबासाहेब आंबेडकरावर स्वाभावीकपणे लादल्या गेली.
जोशी : आंबेडकरांनी ती जबाबदारी पार पाडली का ?
मी : होय डॉ. आंबेडकरांनी स्वातंत्र्य, समता, बंधुभाव असलेली भारतीय राज्यघटना लिहून ही जबाबदारी पार पाडली.
जोशी : माझ्या माहीतीनुसार मनु हा समाजशास्त्रीय तत्ववेत्ता होता. त्यांनी लिहलेली मनुस्मृती विषमतावादी होती हे तुम्ही दाव्याने कसे म्हणू शकता ?
मी : त्यासाठी मनुस्मृतीचेच दाखले मी तुम्हाला देऊ इच्छितो.
शतं ब्राम्हणमाय क्षत्रियो दण्डमर्हती ।
वैश्योऽप्यर्धशतं द्वे वा शूद्रस्तु वधमर्हति ।।
म्हणजेच ब्राम्हणाला उद्देशुन अपशब्द उच्चारल्यास क्षत्रियास १०० पण दंड, वैश्यास १५० किंवा २०० पण दंड आकारावा तर शुद्रास वध हीच शिक्षा योग्य आहे.
अब्राम्हण: संग्रहणे प्राणान्तं दण्डमहती ।
चातुर्णामपि वर्णानां दारा रक्ष्यतमाः सदा ।।
म्हणजेच ब्राम्हणेतराने परस्त्री बरोबर कामक्रीडा केली तर त्यास देहान्ताची सजा द्यावी. परंतु ब्राम्हणाला हे लागू नाही. चारही वर्णातील स्त्रीयांचे नेहमी रक्षण झाले पाहिजे.
शक्तेनापि हि शुद्रेण न कार्यो धनसंचयः।
शूद्रो हि धनमासाद्य ब्राम्हणानेव बाधते ।।
म्हणजेच शक्ती असताही शुद्राने धनसंचय करू नये, कारण की शुद्राने धन जमा केल्यास ते ब्राम्हणास बाधते वा त्रासदायक ठरते. जोशीसाहेब ह्या दाखल्यावरून तुम्ही मान्य करणारनं की मनुस्मृती विषमतावादी होती.
जोशी : खरे आहे. पण ढोबळे, तुम्ही म्हणालात प्रत्येकच ब्राम्हण हा ब्राम्हणवादी असतोच असे नाही. ह्याचा अर्थ काय ?
जोशी : काही अंशी तुमच म्हणणे खरे आहे. मला पटतयं.
मी : मग जेव्हा तुम्हाला हे पूर्णपणे पटेल आणि एक समतावादी व्यवस्था निर्माण करण्याचा आमच्या प्रयत्नात तुम्हीही सामील व्हाल, त्यावेळेस तुम्ही ब्राम्हण असणार पण ब्राम्हणवादी नसणार.
जोशी : जे ब्राम्हणवादी नाहीत त्यांना तुम्ही काय म्हणाल ?
मी : जे ब्राम्हणवादी नाहीत ते समतावादी वा बहुजनवादी. ब्राम्हणवादी व्यवस्थेवर सर्वप्रथम ऐतिहासीक हल्ला चढविणारा महापुरुष म्हणजे गौतम बुद्ध आणि गौतम बुद्धाने घोषवाक्य दिलय – 'बहुजन हिताय ! बहुजन सुखाय!' त्या काळी ब्राम्हणी व्यवस्थेमुळे नाडला जाणारा वर्ग होता शुद्र-अतिशुद्राचा. हा वर्ग सन्मानाने जगू शकेल अशी व्यवस्था निर्माण व्हावी ही बुद्धाची महत्वाकांक्षा होती. त्यामुळे त्याकाळी बुद्धाने मानलेल्या लोकांनाच आपण बहुजन म्हणू शकतो.
जोशी : आजच्या रुढ झालेल्या नामावलीनुसार बहुजन कोण ?
मी : भारतीय समाजातील दलित, आदिवासी व मागासवर्गिय ओबीसी मराठा हे बहुजन होत.
जोशी : ही सर्व बहुजन मंडळी बहुजनवादी विचार सरणीचीच असते काय ?
मी : असेही नाही. ज्याप्रमाणे प्रत्येकच ब्राम्हण हा ब्राम्हणवादी असतोच असे नाही, त्याचप्रमाणे प्रत्येक बहुजन हा बहुजनवादी असतोच असे ही नाही ?
जोशी : हे जरा विस्ताराने समजवाल काय? हे बघा देशमुख साहेब पण आले आहेत. या देशमुख.