महात्मा फुले यांच्या द्विजन्मशताब्दी वर्षनिमित्त बिरारी परिवारात सत्यशोधक पद्धतीने दशपिंड व गंधमुक्ती कार्यक्रम !...
पित्र व उपस्थित मान्यवरांना महापुरुषांच्या ग्रंथांचे वितरण !...
सर्व बहुजनांनी सत्यशोधक समाजाची कास धरावी : पी डी पाटील ( जिल्हाध्यक्ष - सत्यशोधक समाज संघ, जळगांव )
शोषणमुक्त व भयमुक्त समाज निर्माण करणे काळाची गरज - भगवान बोरसे ( तालुकाध्यक्ष -सत्यशोधक समाज संघ, चाळीसगाव )
चाळीसगांव - चाळीसगाव शहरातील विवेकानंद नगर करगाव रोड येथील सामाजिक कार्यकर्ते संजय बळीराम महाजन यांचे बंधु व कुणाल महाजन यांचे काका व देवव्रत महाजन यांचे वडील निसर्गवासी विजय रुपला महाजन उर्फ भिकन बळीराम महाजन ( सेवानिवृत्त उपमुख्याध्यापक ए बी हायस्कूल चाळीसगाव ) यांचा गंधमुक्त व उत्तरकार्याचा कार्यक्रम सत्यशोधक पद्धतीने पार पडला. सर्वप्रथम संत, महापुरुष व महामातांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. सत्यशोधक पद्धतीने विधी करत असताना सत्यशोधक समाजाची प्रार्थना सत्यशोधक विधीकर्ते साळुबा पांडव यांनी म्हटली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सत्यशोधक समाज संघाचे तालुकाध्यक्ष भगवान बोरसे यांनी केले. प्रास्ताविकात अंधश्रद्धा व कर्मकांडाला फाटा देत पुरोहितविना हा विधी सत्यशोधक पद्धतीने झाला. पूर्वी मोक्षप्राप्तीसाठी चांदीची गाय, चांदीची शिडी, छत्री, कपडे, खारी, खोबरे, काजू , बदाम मध्यस्थीला दिले जात असे पण सत्यशोधक समाजामध्ये या कुठल्याही वस्तूंची आवश्यकता नाही.किंबहुना या कर्मकांडाला विरोध आहे. शोषणमुक्त व भयमुक्त समाज निर्माण करणे गरजेचे आहे असे प्रतिपादन भगवान बोरसे यांनी केले.

याप्रसंगी सत्यशोधक समाज संघाचे जिल्हाध्यक्ष पी डी पाटील यांनी क्रांतीसूर्याचे सामाजिक - शैक्षणिक कार्य विशद करून शोषणमुक्त समाज निर्माण करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. महापुरुषांना डोक्यावर नाही तर डोक्यात घेण्याची गरज आहे. हीच खरी तात्यासाहेब महात्मा फुले व सावित्रीमाई यांना आदरांजली असेल असे प्रतिपादन पाटील यांनी केले. सत्यशोधक विधीकर्ते साळुबा पांडव यांनी संपूर्ण परिवाराला एकसंघ राहण्याची शपथ दिली. याप्रसंगी सर्व मित्रांना व उपस्थित नातलगांना महापुरुषांचे अनमोल ग्रंथ भेट स्वरूपात देण्यात आले यानंतर परिवाराच्या माध्यमातून पाच वृक्षांचे रोपण ( आंबा , चिंच , निम , वड , पिंपळ ) वडीलांच्या स्मृतीप्रित्यर्थ शेतात करण्यात आले. बिरारी परिवाराने सामाजिक बांधिलकी जपत सत्यशोधक समाज संघाला 2100 रु चा सहयोग निधी दिला.
याप्रसंगी वंजारी येथील माजी पंचायत समिती सदस्य गोपाल महाजन, रवंजे येथील महिला सरपंच सुरेखा चौधरी, सत्यशोधक समाज संघाचे विधीकर्ते भगवान रोकडे, उपाध्यक्ष कैलास जाधव, उषा रमेश महाजन, प्रमिला संतोष महाजन, शोभा प्रल्हाद महाजन, डॉ. प्रतिभा महेश झगडे, ज्ञानेश्वर महाजन, विक्रम महाजन, प्रा.एम एस महाजन, प्रा.एस बी महाजन तसेच आप्तेष्ट नातेवाईक आणि मित्रपरिवार यासह कजगाव व शहरातील सामाजिक, शैक्षणिक, पत्रकारिता, राजकीय, आप्तेष्ट मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
- - - - - -- - - - - -- - - - - -- - - - - -
शेतात अस्तींचे विसर्जन
निसर्गवासी विजय रुपला महाजन उर्फ भिकन बळीराम महाजन ( सेवानिवृत्त उपमुख्याध्यापक ए बी हायस्कूल चाळीसगाव ) वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ मुलांच्या हस्ते शेतात आंब्याचे रोप लावण्यात आले.वडिलांची आठवण म्हणून तिथेच अस्ती विसर्जन केले.भविष्यात आंब्याची फळे नातवंडे खातील आणि आजोबा नेहमी स्मरणात राहतील.
- - - - - -- - - - - -- - - - - -- - - - - -
महापुरुषांचे अनमोल ग्रंथ भेट
कार्यक्रमाला उपस्थित सर्व आप्तेष्ट - नातलग मान्यवर यांना पुस्तक वाचनाची आवड निर्माण व्हावी याकरिता ५० महापुरुषांचे अनमोल ग्रंथ भेट देण्यात आले.यातून महापुरुषांचा विचार घरा - घरापर्यंत पोहोचेल.
- - - - - -- - - - - -- - - - - -- - - - - -
सत्यशोधक समाज संघाला बिरारी परिवाराकडून 2100 रु चा सहयोग निधी