"हमारा हक मांगते, नहीं किसी से भीख मांगते": आगामी जनगणनेत ओबीसींचा स्वतंत्र कॉलम हवा; नागपुरात सकल ओबीसी महामोर्चाचा एल्गार

गांधी-शास्त्री जयंतीनिमित्त व्हरायटी चौकात राज्यव्यापी सत्याग्रह; २५ ऑक्टोबरला जिल्हास्तरावर महामोर्चे, नोव्हेंबरमध्ये 'चलो दिल्ली'चा इशारा


नागपूर : देशात १९३१ नंतर अधिकृत जातनिहाय जनगणना झालेली नाही. शैक्षणिक आरक्षण, शासकीय नोकऱ्यांतील प्रतिनिधित्व आणि कल्याणकारी योजनांचा अचूक लाभ मिळण्यासाठी अचूक आकडेवारी आवश्यक आहे. याच न्याय्य हक्कासाठी राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीचे औचित्य साधून 'सकल ओबीसी महामोर्चा'च्या वतीने शुक्रवारी दुपारी १२ वाजता राज्यव्यापी शांततापूर्ण सत्याग्रह आंदोलन छेडण्यात आले. नागपूरच्या सीताबर्डी येथील महात्मा गांधी पुतळ्याजवळ (व्हरायटी चौक) हे आंदोलन झाले.

📌 आंदोलनाची माहिती

आयोजकसकल ओबीसी महामोर्चा
स्वरूपराज्यव्यापी शांततापूर्ण सत्याग्रह आंदोलन
वेळशुक्रवार, दुपारी १२ वाजता
स्थळमहात्मा गांधी पुतळ्याजवळ, व्हरायटी चौक, सीताबर्डी, नागपूर

🎤 केंद्राच्या भूमिकेवर तीव्र आक्षेप

आंदोलनादरम्यान सकल ओबीसी महामोर्चाचे मुख्य संयोजक उमेश कोर्राम यांनी केंद्र सरकारच्या भूमिकेवर तीव्र आक्षेप घेतला. २०११ च्या जनगणनेत त्रुटी राहिल्याचे खुद्द सरकारनेच सर्वोच्च न्यायालयात सांगितले आहे, मग तीच सदोष पद्धत पुन्हा का राबवली जात आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

Aagami Janagannet OBC cha Swatantra Column Hava Nagpurat Sakal OBC Mahamorchacha Elgar

ओबीसी समाजाची दिशाभूल केल्याप्रकरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि जनगणना आयुक्त मृत्युंजय कुमार नारायण यांनी तातडीने आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

✊ महामोर्चाच्या प्रमुख मागण्या

  • डिजिटल जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलम देण्यात यावा
  • नोंदीतील चुका टाळण्यासाठी 'प्री-कोडेड ड्रॉप-डाऊन मेन्यू' अनिवार्य करावा

⚠️ पुढील आंदोलनाचा इशारा

उमेश कोर्राम यांनी स्पष्ट इशारा दिला की, २ ऑक्टोबरचा सत्याग्रह ही संघर्षाची नांदी आहे. सरकारने तातडीने निर्णय न घेतल्यास:

  • २५ ऑक्टोबर : संपूर्ण महाराष्ट्रात जिल्हास्तरावर विराट 'ओबीसी महामोर्चे' काढले जातील.
  • नोव्हेंबर : राजधानी दिल्लीत 'चलो दिल्ली'ची हाक देत निर्णायक लढा दिला जाईल.

📣 घोषणांनी दणाणला परिसर

"हमारा हक मांगते, नहीं किसी से भीख मांगते" अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला. या सत्याग्रह आंदोलनात नागपूरसह संपूर्ण विदर्भातील हजारो समाजबांधव, शेतकरी, महिला आणि तरुण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

🙋 उपस्थित मान्यवर व कार्यकर्ते

सत्याग्रहात अॅड. अंजली साळवे, राम बाणते, सुरेश गुडधे, अभिविलास नखाते, ज्ञानेश्वर रक्षक, व्यंकटेश पोटफोडे, राजेश काकडे, अशोक काकडे, महेश गिरी, राजेंद्र बढिये, मुकुंद अडेवार, कुमुदिनी गुधडे, वंदना वनकर, सुषमा भड, प्रताप पटले, साधना बोरकर, अर्चना बर्डे, कृतल आकरे, पीयूष आकरे, आकाश वैद्य, विनीत गजभिये, यजुर्वेद सेलोकर, नयना झाडे, विजेता धोटे, बाबा तुमसरे, समीर अरबट आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते.