मराठी भाषा अभिजात दर्जा दिन मराठी भाषेचा गौरव

     मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त झाल्याच्या वर्धापन दिनानिमित्त मराठी भाषेच्या समृद्ध परंपरेचा गौरव, अभिमान आणि वारसा महत्व पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने 3 ऑक्टोबर हा 'अभिजात मराठी भाषा सन्मान दिन' म्हणून साजरा करण्यात येतो. या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजित करण्यात येतात.

     मराठी भाषेला भारत सरकारकडून 3 ऑक्टोबर 2024 रोजी अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. भारत सरकारने या दिवशी मराठीसह पाली, प्राकृत, आसामी आणि बंगाली या भाषांना अभिजात भाषेच्या श्रेणीत समाविष्ट केले. मराठी भाषेला अभिजात दर्जा देताना सरकारने भाषेच्या प्राचीनत्वाचे, साहित्य सौंदर्याचे व तिच्या मूळ स्वभावाचे निकष ठरवले होते. जे मराठी भाषेने पूर्ण केले. हा दर्जा मिळाल्याने मराठी भाषेचा गौरव झाला व तिच्या सांस्कृतिक व सामाजिक विकासाला नवीन दिशा मिळाली. केंद्र सरकारने मराठी भाषेला 'अभिजात दर्जा' देण्याचा निर्णय घेतला. सरकारने गेल्या अनेक दशकांपासूनची मराठी जनतेची ही मागणी पूर्ण केली आहे. अभिजात दर्जा मिळवण्यासाठीचे सर्व निकष पूर्ण गेले. केंद्र सरकारने अभिजात भाषेचे निकष ठरवताना मराठी भाषा प्राचीन व साहित्य श्रेष्ठ असावी. भाषेचे वय दीड ते अडीच हजार वर्षांचे असावे. भाषेला स्वतःचे स्वयंभूपण असावे. प्राचीन भाषा आणि तिचे आधुनिक रूप यांचा गाभा कायम असावा. हा दर्जा ज्या भाषांना दिला जातो, त्या भाषेच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र सरकारकडून भरीव अनुदानही मिळते. अभिजात भाषेच्या यादीत समाविष्ट झाल्यामुळे मराठी भाषेची ओळख जागतिक स्तरावर वाढली आहे. अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यासाठी त्या भाषेला प्राचीन साहित्य आणि महत्त्वपूर्ण अभिलेख नोंदी पुरावा असावा लागतो. या दर्जाद्वारे भाषेच्या ऐतिहासिक परंपरा, साहित्यिक योगदान आणि सांस्कृतिक वारसा यांना मान्यता दिली जाते. अभिजात भाषेला स्वतःचे स्वयंभू स्वरूप असले पाहिजे व तिच्या प्राचीन तसेच आधुनिक रुपांमध्ये जुना गाभा कायम असावा. हा कि मराठी भाषेचा पुर्ण होता.मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यामुळे तिच्या सांस्कृतिक आणि साहित्यिक परंपरेचा गौरव वाढला आहे. या दर्जाच्या माध्यमातून मराठी भाषेची ओळख जागतिक स्तरावर पोहोचण्यास मदत झाली आहे. या दर्जा मिळालेल्या भाषांना केंद्र सरकारकडून त्यांच्या संवर्धन व विकासासाठी दरवर्षी भरीव अनुदान मिळते. अभिजात भाषेचा दर्जा मिळविणे म्हणजे त्या भाषेतील साहित्य, कला व संस्कृतीचा गौरव होतो. अभिजात भाषा हा वैशिष्ट्यपूर्ण भाषेला भारत सरकारद्वारे दिला जाणारा एक दर्जा आहे. अभिजात या शब्दाचा अर्थ असा आहे.'अभिजात' म्हणजे उत्कृष्ट, प्राचीन आणि प्रतिष्ठित.

Marathi Bhasha Abhijat Darja Din Marathi Bhasha cha Gaurav

    अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याचे काही फायदे आहेत. 

    अभिजात दर्जा मिळाल्याने भाषेला एक खास आणि प्रतिष्ठित स्थान मिळते.भाषेचा ऐतिहासिक वारसा आणि सांस्कृतिक योगदान यांसारख्या गोष्टींना जागतिक मान्यता मिळते. यामुळे त्या भाषेच्या घटकांचा आत्मविश्वास वाढतो आणि तिची ओळख जागतिक स्तरावर वाढते. भारतामध्ये मराठी, पाली, प्राकृत, आसामी आणि बंगाली यांसारख्या भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला आहे.

     मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी फार मोठी चळवळ उभी करण्यात आली होती. राज्य सरकारने रंगनाथ पठारे यांच्या नेतृत्वाखाली एक समिती देखील नेमली होती. या समितीने 500 पानांचा अहवाल केंद्राकडे सादर केला होता. ज्यात मराठी भाषा वैशिष्ट्यपूर्ण • असून ती अभिजात भाषेचे सर्व निकष पूर्ण करते याचे पुरावे देण्यात आले होते.

     मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे आता मराठीच्या बोलींचा अभ्यास करण्यास प्रोत्साहन मिळेल, संशोधन आणि साहित्यसंग्रह शोध प्रबंध करण्याच्या दृष्टीने चालना मिळणार आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे भारतातील सर्व 450 विद्यापिठांमध्ये मराठी भाषा शिकवण्याची सुविधा उपलब्ध केली जाऊ शकते. मराठीतील प्राचीन ग्रंथांना मराठी भाषेत अनुवादित करण्यात सुरुवात होणार. या मराठी ग्रंथामुळे राज्यातील 12 हजार ग्रंथालयांसाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे. या निणर्यानंतर ही सर्व ग्रंथालयांचे सशक्तीकरण होणार आहे. मराठी भाषेच्या उत्कर्षासाठी, जपण्यासाठी, त्याच्या संवर्धनासाठी काम करणाऱ्या संस्था, व्यक्ती आणि विद्यार्थ्यांना मोठी मदत मिळू शकेल. 

     अभिजात भाषेतील स्कॉलर्ससाठी दरवर्षी दोन राष्ट्रीय पुरस्कार दिले जातात. यापुढे हा पुरस्कार मराठी भाषेत काम करणाऱ्या व्यक्तीला मिळेल. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे आता मराठीच्या बोलींचा अभ्यास करण्यास प्रोत्साहन मिळेल, संशोधन आणि साहित्यसंग्रह करण्याच्या दृष्टीने चालना मिळणार आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषा दर्जा देवुन मराठी भाषेचा सन्मान केला •आहे. हा मराठी भाषा अभिजात दर्जा दिन सन्मान गौरवाने उत्साहात साजरा केला जात आहे. हि बाब अभिमानास्पद आहे. 

लेखक - डॉ. राजेंद्र मुरलीधर सानप,  सदस्य - महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघ, इंद्रप्रस्थ कॉलनी, नगर रोड, बीड. मो.नं. 9420019597