सांगलीत पेरियार प्रबोधनीचे पाचवे राज्यस्तरीय प्रशिक्षण शिबीर उत्साहात संपन्न

जातनिहाय जनगणना, ओबीसी आरक्षण, मंडल आयोग आणि कलम ३४० वर सखोल मंथन
ओबीसींचा स्वतंत्र राजकीय पक्ष आणि लढ्यातील तरुणांची भूमिका या विषयांवर परिसंवादात्मक चर्चा

    सांगली : पेरियार प्रबोधनी संस्थेचे पाचवे राज्यस्तरीय प्रशिक्षण शिबीर सांगली येथे मोठ्या उत्साहात पार पडले. जातनिहाय जनगणना, ओबीसी आरक्षण, भारतीय संविधानाचे ३४० वे कलम, मंडल आयोग, ओबीसींचा स्वतंत्र राजकीय पक्ष आणि या लढ्यात तरुणांची भूमिका या विषयांवर शिबिरात परिसंवादात्मक पद्धतीने सखोल चर्चा करण्यात आली. राज्याच्या विविध भागांतून आलेल्या कार्यकर्त्यांच्या सहभागामुळे शिबिराला विशेष रंगत आली.

    शिबिराची सुरुवात महापुरुषांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली.

Sangli Periyar Prabodhinis Fifth State Level Training Camp Concludes on a High Note

मंडल आयोगाचा इतिहास आणि जनगणनेची गरज

    संस्थेचे इंजि. शिवाजी शेंडगे यांनी शिबिराचा हेतू स्पष्ट करून मंडल आयोगाचा इतिहास आणि त्याच्या अंमलबजावणीबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. कोल्हापूर येथील प्रा. दिगंबर लोहार यांनी जातनिहाय जनगणना का गरजेची आहे, यावर अभ्यासपूर्ण विवेचन केले. जनगणनेतून समोर येणारी आकडेवारीच धोरणनिर्मिती आणि प्रतिनिधित्वाचा पाया ठरते, हा मुद्दा त्यांच्या मांडणीतून अधोरेखित झाला.

जीआरमुळे ओबीसी समाजात अस्वस्थता

    ज्येष्ठ अभ्यासक निवांत कोळेकर यांनी ओबीसी आरक्षण, शासनाचे विविध आदेश आणि विशेषतः २ सप्टेंबर २०२५ च्या जीआरमुळे ओबीसी समाजात निर्माण झालेली अस्वस्थता या विषयावर भाष्य केले. तसेच सर्व उपस्थितांनी ओबीसी म्हणून मतांच्या रूपाने संघटित व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.

Periyar Prabodhini Cha Paachva Rajyastariya Prashikshan Shibir Sangliit Utsahaat Sampann

"आरक्षण वाचवायचे तर आंदोलनात्मक लढा अपरिहार्य"

    ओबीसींमधील लहान-सहान जाती-समूहांची विदारक परिस्थिती अमोल पांढरे यांनी आपल्या मनोगतातून मांडली. आरक्षणाचे संरक्षण करायचे असेल तर आंदोलनात्मक लढा उभारल्याशिवाय पर्याय नाही, असे स्पष्ट मत सचिन सुतार यांनी व्यक्त केले. याप्रसंगी जनार्दन झेंडे, गरुड सर आणि प्रा. गौतम शिंगे सर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

शिबिराला यांची उपस्थिती

    या प्रशिक्षण शिबिरास माणिक पुजारी, शिवाजी मरले, तायाप्पा वाघमोडे, तुकाराम माळी, विक्रम ढोणे, भारतनाना थोरात, सुरेश पांढरे, सूर्यकांत कोळेकर, कालाप्पा कोळेकर, अजित भांबुरे, राजेंद्र रसाळ, तानाजी दुधाळ, अजित खरात, उत्तम पांढरे, इंजि. खताळ साहेब, सायमोते साहेब, माने सर, सौ. शेंडगे मॅडम, सौ. थोरात मॅडम, सौ. कोळेकर मॅडम यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

    शिबिराचे स्वागत व प्रास्ताविक निवांत कोळेकर यांनी केले. इंजि. शिवाजी शेंडगे यांनीही शिबिराचा उद्देश मांडला. शेवटी अमोल पांढरे यांनी उपस्थितांचे आभार मानले.