प्रादेशिक पक्ष हे स्थानिक मुद्दे, संस्कृती आणि भाषिक अस्मिता जपण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. ते प्रादेशिक विकासावर लक्ष केंद्रित करतात, केंद्राच्या वर्चस्वाला आळा घालतात आणि आघाडी सरकारमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात. हे पक्ष स्थानिक समस्या थेट संसदेत मांडून लोकशाही अधिक सर्वसमावेशक बनवतात.
प्रादेशिक पक्षाचे मुख्य महत्त्व व भूमिकाः स्थानिक समस्या आणि अस्मिताः स्थानिक संस्कृती, भाषा आणि प्रश्नांना प्राधान्य देऊन, हे पक्ष विशिष्ट प्रदेशाच्या गरजा पूर्ण करतात.
संघराज्य व्यवस्था बळकट करणेः केंद्रीय नेतृत्वाच्या एकतर्फी निर्णयांना विरोध करून आणि राज्यांच्या स्वायत्ततेसाठी लढा देऊन ते खरे संघराज्य टिकवण्यासाठी प्रादेशिक संघ राज्य व्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी प्रादेशिक पक्ष कार्यरत असतात.
आघाडी सरकारमध्ये भूमिका: केंद्रात सत्ता स्थापन करण्यासाठी अनेकदा राष्ट्रीय पक्षांना प्रादेशिक पक्षांची गरज भासते. यामुळे राष्ट्रीय निर्णयप्रक्रियेत राज्यांचा सहभाग वाढतो व राज्यातील विविध प्रकारच्या समस्या सोडविण्यासाठी या सत्तेच्या सहभागाचा फायदा होतो.

प्रादेशिक विकास आणि असमानता दूर करणे: केंद्र सरकारकडून दुर्लक्षित झालेल्या क्षेत्रांच्या विकासासाठी हे पक्ष आग्रही असतात.
लोकशाहीचा विस्तारः स्थानिक स्तरावरील गटबाजी किंवा प्रश्न सोडवण्यासाठी हे पक्ष थेट लोकांच्या जवळ जाऊन काम करतात, ज्यामुळे राजकीय जागरूकता वाढते.
भारतातील प्रादेशिक पक्षांचे महत्त्व. भारतातील प्रादेशिक पक्ष स्थानिक हितसंबंधांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी आणि विविध राजकीय परिदृश्यांमध्ये सांस्कृतिक ओळख वाढवण्यासाठी व संघराज्य व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी फार गरजेचे आहे...
भारतातील प्रादेशिक पक्षांचा प्रभाव आणि महत्त्व - प्रादेशिक पक्ष प्रादेशिक आकांक्षा आणि ओळख व्यक्त करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देतात. ते हे सुनिश्चित करतात की वेगवेगळ्या प्रदेशातील अद्वितीय सांस्कृतिक, भाषिक पारंपारिक सांस्कृतिक ऐतिहासिक वारसा वृद्धिंगत करण्यासाठी व प्रदेशाच्या विकासासाठी कार्य करणारे आणि त्या प्रदेशाचा अभिमान बाळगणारे राजकीय गट प्रादेशिक पक्ष म्हणून ओळखले जातात. या पक्षांचा प्रभाव प्रामुख्याने त्या त्या प्रदेशात असतो.
प्रदेशाच्या वेगळेपणाचा अभिमान बाळगणान्य व त्या प्रदेशाचा विकास करण्यासाठी सत्तेच्या स्पर्धेत उतरणाऱ्या राजकीय गटांना प्रादेशिक पक्ष असे म्हणतात. या पक्षांचा आपल्या प्रदेशा पुरता मर्यादित प्रभाव असतो.
भारतातील प्रादेशिक पक्षांचा प्रभाव आणि महत्त्व अतिशय मोलाचे आहे. प्रादेशिक पक्ष प्रादेशिक आकांक्षा आणि ओळख व्यक्त करण्यासाठी लोकसभा, राज्यसभा, विधानसभा, विधानपरिषद या व्यासपीठाचा उपयोग करून आपले प्रादेशिक अस्तित्व टिकवून ठेवतात. ते हे सुनिश्चित करतात की वेगवेगळ्या प्रदेशातील अद्वितीय सांस्कृतिक, भाषिक आणि वांशिक वैशिष्ट्ये राजकीय क्षेत्रात प्रतिनिधित्व करून त्यांच्या मुलभूत हक्क, प्रादेशिक प्रश्न, यासाठी विविध सभागृहाचे प्रतिनिधित्व करत प्रादेशिक अस्मिता जपतात.
राष्ट्रीय पातळीवर प्रादेशिक पक्षांचे महत्त्व हे १९९० नंतर भारतीय राजकारणात अधिक प्रमाणात वाढल्याचे दिसत आहे. प्रादेशिक पक्षाच्या पाठिंब्या शिवाय केंद्रात सरकार स्थापन होताना दिसत नाही. सतत आघाडी सरकारने प्रादेशिक पक्षाचे महत्व वाढवले आहे. सध्याचे केंद्रीय सरकार हे काही प्रमुख प्रादेशिक पक्षांच्या पाठिंब्याने कार्यरत आहे पुढील काही प्रादेशिक पक्षांच्या सहकार्याने सहभागाने आपली सत्ता टिकवण्यासाठी महाराष्ट्रात शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रबादी (अजित पवार), तामिळनाडूत , बिहारमध्ये जनता दल , लोकजनशक्ती (चिराग पासवान), आणि ओडिशामध्ये बीजू जनता दल , उत्तर प्रदेशातील अपनादल, आंध्रप्रदेश मध्ये चंद्रबाबू नायडु यांचा तेलगु देसम या पक्षास असंख्य प्रादेशिक पक्षांनी आपल्या आपल्या राज्याच्या राजकारणात व केंद्रात सरकार आणण्यासाठी पाठिंबा देवून महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
भारतातील प्रादेशिक पक्ष राष्ट्रीय पातळीवर स्थानिक हितसंबंधांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी आणि विविध राजकीय परिदृश्यांमध्ये सांस्कृतिक ओळख वाढवण्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. ते विविध दृष्टिकोनांचा परिचय करून, प्रादेशिक असमानता दूर करून आणि राष्ट्रीय राजकारणावर आपला प्रभाव निर्माण करतात, भारतातील प्रादेशिक पक्ष एकाच पद्धतीचे आणि एकाच विचारसरणीला बांधलेले नाहीत. केंद्रीय पक्ष व प्रादेशिक पक्ष यांच्यातील संबंध द्वंद्वात्मकच असणार आहेत. केंद्रातील सतेला विरोध करत असतानाच केंद्रात सत्तेवर असलेल्या सरकारला...
भारतीय राजकारणातील प्रादेशिक पक्षाचा प्रभाव प्रादेशिक पक्षांची मर्यादा राज्य विषया संबधीतच विचार करावा लागतो आहे.
महाराष्ट्रातील प्रादेशिक पक्ष
महाराष्ट्रात अनेक प्रादेशिक पक्ष कार्यरत आहेत शेतकरी कामगार पक्ष, बहुजन विकास आघाडी, शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी (अजित पवार), रिपब्लिकन पक्ष, शेतकरी संघटना, शिवसेना (उद्धव ठाकरे), राष्ट्रवादी (शरद पवार), जनसुराज्य, राष्ट्रीय समाज पार्टी, बहुजन वंचित आघाडी, असे असंख्य पक्ष आहेत. ते त्यांच्या कुवतीनुसार आप आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. काही पक्ष राष्ट्रीय पक्षांशी युती करून आपला जनाधार वाढवत आहेत. पण काही प्रमाणात राष्ट्रीय पक्ष स्व स्वार्थ साठी यांचा वापर करून घेत आहेत. विचार सरणी विभिन्न पण सत्ता समिकरणासाठी आघाडी धर्म हे तत्त्व अवलंब करतात. हे कधी कधी चुकीचे असते. पण सत्ता समिकरणात निवडणुकीच्या राजकारणात या पक्षाना हे सूत्र योग्य वाटते. ते कसे योग्य ते आपल्या प्रचार अभिनयातुन जनतेला आपलेसे करण्यासाठी पटवतात.
भारतीय राष्ट्रीय राजकारणात सहभागी असणाऱ्या पक्षांचा क्रम पुढीलप्रमाणे इंडियन नॅशनल काँग्रेस (आय), कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया, भारतीय जनता पक्ष, स्वतंत्र पक्ष, सोशलिस्ट पार्टी, बहुजन समाज पक्ष, इंडीयन नॅशनल लोकदल, राष्ट्रीय जनता दल, समाजवादी पार्टी पी डी पी, नॅशनल कॉन्फ्ररस, अकाली दल, आम आदमी पार्टी, तुर्णमूल कांग्रेस, टि व्ही के. या राष्ट्रीय प्रादेशिक पक्षांसह इतर प्रादेशिक पक्षांचा सक्रीय सहभाग आहे.
भारतीय राजकारणात आघाडी पर्व सुरू झाले आहे त्यामुळे प्रादेशिक पक्षांना चांगले दिवस आले आहेत. तसेच राष्ट्रीय पक्षाकडून मिळणाऱ्या वाढत्या सन्मानजनक वागणुकी बरोबरच काही प्रादेशिक पक्षांना असुरक्षितता निर्माण होत आहे. राष्ट्रीय पक्ष प्रादेशिक पक्षांना कुरघोड्या राजकारणाने त्यांच्या अस्तित्वा बाबत धोका निर्माण होऊ शकतो हे ही त्रिवार सत्य आहे. सध्याच्या काळात प्रादेशिक पक्षांना चांगले महत्त्व व दिवस आहेत हे नाकारता येत नाही.
डॉ. राजेंद्र सानप, ९४२००१९५९७