बैठकीत घेतला निर्णय : सरकारच्या निषेधाचा ठराव : 15 तालुक्यात राबविले अभियान
चंद्रपूर, - राष्ट्रीय ओबीसी महासंघ, ओबीसी संघटना व जात संघटनांची बैठक मातोश्री सभागृहात पार पडली. राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे महासचिव सचिन राजूरकर यांच्या नेतृत्वाखाली ही सभा घेण्यात आली. यावेळी 1 नोव्हेंबर 2023 रविंद्र टोंगे यांच्या वेंडली गावापासून ओबीसींच्या भविष्यासाठी भेटी गाठी जनजागृती अभियान सुरू जिल्ह्यातील 15 तालुक्यात अभियान राबवून त्याचा समारोप चिमूर तालुक्यात करण्याचा निर्णय घेण्यात आला.
ओबीसी योध्दा रवींद्र टोंगे, विजय बलकी व प्रेमानंद जोगी यांचा नागरी सत्कार कार्यक्रम 30 ऑक्टोबर प्रियदर्शन सभागृहात सायंकाळी 6 वाजता घेणार आहे. ओबीसीत मोडणारे खासदार, आमदार यांनी अजूनपर्यंत मराठा समाजाला ओबीसीतून देऊ नये, असे निवेदन सरकारला दिले नाही आहे, त्यांना तसे निवेदन देण्यासाठी भाग पाडणे.
सभेला विदर्भ तेली महासंघाचे प्रा. सूर्यकांत खनके, माळी महासंघाचे अरुण तिखे, रामभाऊ खडलिंगे, प्रा अनिल शिंदे, नंदू नागरकर, पप्पु देशमुख, रविंद्र टोंगे, विजय बलकी, प्रेमानंद जोगी, डॉ. दिलीप कांबळे, शाम लेडे, राजेश बेले, श्रीधर मालेकर, कृणाल चहारे, अरूण देऊलकर, हितेश लोडे, मनिषा बोबडे, कुसुम उदार, रजनी मोरे, गोमती पाचभाई उपस्थित होते.