राष्ट्रीय ओबीसी कर्मचारी अधिकारी महासंघाचे राज्य सरचिटणीस अनिल नाचपले यांच्या अध्यक्षतेखाली धाराशिव जिल्हा शाखेची सभा शासकीय विश्रामगृह धाराशिव येथे संपन्न झाली.
प्रथम सर्व महापुरुषांच्या एकत्रित प्रतिमांना पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांचा धाराशिव शाखेच्या वतीने सत्कार करण्यात आला.
या पहिल्या अधिवेशनास धाराशिव जिल्ह्यातून जास्तीत जास्त कर्मचारी अधिकारी उपस्थित राहतील असे आश्वासन जिल्हाध्यक्ष संतोष भोजने यांनी दिले. ओबीसी च्या विविध प्रश्नांवर पदाधिकारी यांनी आपले मते मांडले व ओबीसी एकतेचा नारा मजबूत करणेचा निर्धार केला...
या सभेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून राज्य उपाध्यक्ष सुखदेव भालेकर, राज्य समन्वयक बिजयकुम र पिनाटे, लातूर जिल्हा महिला अध्यक्ष रेखा सुडे, मराठवाडा विभागीय अध्यक्ष लक्ष्मण दावणकर , धाराशिव जिल्हा अध्यक्ष संतोष भोजने यांच्या सह जिल्ह्यातील असंख्य कर्मचारी अधिकारी व संघटनेचे जिल्हा तालुका पदाधिकारी उपस्थित होते.
या आढावा बैठकीत नविन पदाधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली. जिल्हा प्रवक्ता पंकज कासार काटकर, जिल्हा उपाध्यक्ष संजय क्षिरसागर, सचिन राऊत, विशाल जाधव, आबासाहेब माळी, दयानंद जवळगावकर तर श्री मच्छिंद्र बोकडे तालुका अध्यक्ष लोहारा, भास्कर कांबळे तालुकाध्यक्ष कळंब, सखाराम शिंदे वाशी तालुकाध्यक्ष बालाजी माळी तालुका अध्यक्ष तुळजापूर, शिशुपाल पुरी तालुका कार्याध्यक्ष वाशी शिवशंकर राऊत तालुका सरचिटणिस वाशी मनोज पंडित यांची निवड करण्यात आली, या सर्वांना मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आली.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री. संतोष भोजने तर आभार सुखदेव भालेकर यांनी मांडले. बैठकीची सांगता जय ओबीसी, जय संविधान या घोषणेनी केली गेली. बैठकीसाठी बिभिषण हजारे, राजेंद्र लोहार, भास्कर कांबळे, माळी ए. एम. बोकडे एम. व्ही., शंकर गोरे, मनोज पंडीत, बालाजी माळी, दयानंद जवळगावकर, सोमनाथ जाम गावकर, बापु काळे, पुरुषोत्तम म्हेत्र, वनवे डी. एच. विशाल जाधव, विजय घोळवे, विनायक आगलावे, जाधवर सतिश शिंदे सखाराम, शिशुपाल पुरी, क्षिरसागर धनंजय, शिवशंकर राऊत, हराळे भगवान, मर्डे रमेश, थोरात पी. एम. सचिन राऊत या पदाधिकार्यांची उपस्थिती होती.