भंडारा - मंडल दिनानिमित्त पूर्व विदर्भातील सात जिल्ह्यात दि.१ ते ७ ऑगस्ट २०२२ दरम्यान मंडल यात्रेचे आयोजन करण्यात आले. यात संविधान चौक नागपूर येथून यात्रेचा शुभारंभ झाला. भंडारा, गोदिया, गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ व नागपूर येथून मार्गक्रमण करत दि.७ ऑगस्टला नागपूर येथे समारोप होईल. भंडारा येथे यात्रेचे भव्य स्वागत करण्यात आले. त्रिमुर्ती चौकात डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला माल्यापी व अभिवादन करून शहरात बाईक रॅली काढण्यात आली. यात ओबिसी कार्यकर्ते व युवावर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाले. जय ओबिसीजय संविधान, जय भारत, ओबिसींची जात निहाय जनगणना झालीच पाहिजे, जिनकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी अशा घोषणा देत रॅली गांधी चौक भंडारा येथे पोहचली, म. गांधी व महात्मा फुले यांच्या पुतळ्यांना माल्यार्पन करण्यात आले. इंद्रराज सभागृह, सार्वजनिक वाचनालय भंडारा येथे मंडल आयोग जनप्रबोधन कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन गोपाल देशमुख यांनी केले तर आभार पंकज पडोळे यांनी मानले. कार्यक्रमाची सांगता संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करुन करण्यात आली.
कार्यक्रमाला प्रामुख्याने रोशन उरकुडे, रमेश शहारे, मैय्याजी लांबट, ईश्वर निकुडे, वसंता काटेखाये, राजेश देशमुख, दिलीप गभणे, मनोहर निरगुळकर, विनोद राठोड, विलास जगनाडे, परसराम बारई, मनोज बोरकर, मंगला वाडीभस्मे, के झेड.शेंडे, डॉ.जयश्री सातोकर, वृंदा गायधने, भगीरथ धोटे, वामन गोधुळे, प्रा.उमेश सिंगनजुडे, डॉ.आशिष माटे, अरुण जगनाडे, सुभाष पाल, सुरेश वैरागडे, केशव हुड, हर्षिक अंबादे, श्रीकृष्ण पडोळे, आयुष चिमुरकर, बंटी चने, राहुल पचारे, प्रणय चिंचेकार, विशाल राखडे, अक्षय लुटे, अंकुश पंचबुध्दे, सुशील तिजारे, आशीष कडव, सुधाकर मोथलकर, प्रशांत मते, सेजल सार्वे, आचल कडव, स्नेहा मते, श्रीकृष्ण बागडे, राज बालपांडे, मोनल मोहनकर, सीम बाते, प्रणाली तरारे, वहीद बाबर यांनी सहकार्य केले.