पूर्व विदर्भातून नवी दिल्ली ओबीसी महाअधिवेशनाला जाणार हजारो ओबीसी बांधव

नवी दिल्लीत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे सातवे महाअधिवेशन ७ ऑगस्टला

     चंद्रपूर - राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे सातवे महाअधिवेशन ताल कटोरा इनडोअर स्टेडियम, नवी दिल्ली येथे ७ ऑगस्टला आयोजित केले आहे. या अधिवेशनाची महासंघाचे राष्ट्रीय समन्वयक डॉ. अशोक जीवतोडे यांच्या मार्गदर्शनात तयारी सुरू आहे.

Thousands_of_OBC_brothers_will_go_from_East_Vidarbha_to_New_Delhi_for_the_OBC_Maha_adhiveshan      ओबीसींची जातनिहाय जनगणना व्हावी, जनगणनेत निष्पन्न झालेल्या ओबीसी संख्येनुसार संपूर्ण भारतात ओबीसी आरक्षण लागू करण्यात यावे, केंद्र सरकारने २४३ टी, २४३ डी सेक्शन ६ मध्ये बदल करावा, केंद्रात स्वतंत्र ओबीसी मंत्रालय स्थापन व्हावे, प्रत्येक जिल्ह्यात ओबीसी विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह व्हावे, ओबीसी विद्यार्थ्यांना शंभर टक्के शिष्यवृत्ती मिळावी, शेतकऱ्यांना शंभर टक्के सबसिडीवर योजना लागू करावी, ओबीसी कर्मचाऱ्यांना पदोन्नती मिळावी, क्रिमिलिअरची मर्यादा वाढवावी आदी अनेक विषयांवर अधिवेशनात मंथन होणार आहे.

     या अधिवेशनासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री भूपेश बघेल, मुख्यमंत्री नितीश कुमार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री स्टॅलीन, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री भगवान कराड, केंद्रीय मंत्री कपिल पाटील, माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव, माजी मंत्री छगन भुजबळ, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आदींना निमंत्रित केले आहे. या अधिवेशनाला लाखोंच्या संख्येने ओबीसी समाजबांधवांनी उपस्थित राहावे, असे आवाहन राष्ट्रीय राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांनी केले आहे.