सकल लिंगायत महासमितीची स्थापना राज्यातील लिंगायत संघटनाचा ऐक्याचा एल्गार..!
पुणे :- महाराष्ट्रातील प्रमुख लिंगायत संघटना एकत्र करून सकल लिंगायत महासमितीची स्थापना करण्यात आली आहे. समाजाच्या प्रमुख मागण्या आणि प्रश्नांसाठी लिंगायत समाजाच्या प्रमुखांनी ऐक्याचा एकमुखी एल्गार पुकारला आहे.
महाराष्ट्रातील लिंगायत संघटनांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची व्यापक बैठक लिंगातय समाज संघर्ष समितीचे मुख्य समन्वय काकासाहेब कोयटे यांच्या पुढाकारातून पुणे येथे आयोजित करण्यात आली होती.यावेळी लिंगायत समाज संघर्ष समितीचे अध्यक्ष सुनिल रूकारी,कार्याध्यक्षा सरलाताई पाटील,लिंगायत महासमितीचे अध्यक्ष सुदर्शन बिरादार, लिंगायत सेवा संघाचे अध्यक्ष विजय शेटे, महाराष्ट्र बसव परिषदेचे अध्यक्ष शिवानंद हैबतपुरे, राष्ट्रसंत मिशनचे अध्यक्ष रामदास पाटील, महात्मा बसवेश्वर स्मारक कृती समितीचे अध्यक्ष डॉ.बसवराज बगले, काँग्रेसचे प्रवक्ते नरेंद्र व्यवहारे, भाजपाचे प्रवक्ते प्रेरणा होनराव, मनसेचे संतोष जिरेसाल, शिवसेनेचे ज्ञानेश्वर खर्डे, राष्ट्रवादीचे संजय चितारी, आम आदमी पक्षाचे नरेंद्र देसाई, सौ. सुहासिनीताई कोयटे, उपाध्यक्ष राजेंद्र मुंडे, भगवान कोठावळे, मराठवाडा प्रमुख उदय चौंडे, संघटक गुरूनाथ बडूरे, युवा अध्यक्ष प्रदीप साखरे, शिवलिंग ढवळेश्वर, अनिल चौगुले, ज्ञानेश्वर खर्डे, चंद्रशेखर दणदणे, निशाताई बिडवे, भगवान कोठावळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
राज्यस्तरीय किमान समान कार्यक्रम
राज्यस्तरीय समन्वय समिती
ओमप्रकाश तथा काकासाहेब कोयटे यांच्या नेतृत्वाखाली समाज प्रमुखांची एक राज्यस्तरीय समन्वय समिती यावेळी गठीत करण्यात आली.यामध्ये सर्वश्री काकासाहेब कोयटे ( कोपरगाव ) सुनिल रूकारी ( पुणे ) सरलाताई पाटील ( कोल्हापूर ) प्रा.सुदर्शन बिरादार ( लातूर ) विजयकुमार शेटे ( लातूर ) बसवराज कणजे ( चिंचवड ) शिवानंद हैबतपूरे ( लातूर ) रामदास पाटील ( नांदेड ) डॉ.बसवराज बगले ( सोलापूर ) प्रेरणाताई होनराव ( लातूर ) अनिल चौगुले ( नासिक ) आदींचा समावेश करण्यात आला आहे.किमान समान कार्यक्रमाचे धोरण ठरवून प्रत्येक जिल्ह्यात आणि शासनस्तरावर त्याची अंमलबजावणी करण्याचे काम या राज्यस्तरीय समन्वय समितीकडून करण्यात येणार आहे.
या बैठकीला केशवराव नगरे, जयश्री तोडकर, उज्ज्वला बसवे, संतोष लिभारे, अर्चना खडके, शिवा खांडकुळे, दत्तात्रय वायचळ, शिवानंद कथले,सतीश नीलकंठ, राजेश कोठाळे, अरूण आवटे, सुधीर भुसारे, गिरीश सोनेकर, अनिल रुद्रके, लक्ष्मी घोडके, श्रीकांत तोडकर, नंदकुमार गवंडर, निंगप्पा तळे, तुषार स्वामी, प्रा.मुचाटे, बसवराज हिरेमठ, यांच्यासह बहुसंख्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.