भारतरत्न डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त वडगांव नगरपंचायत कार्यालयात नगराध्यक्ष मयुर ढोरे यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी उपनगराध्यक्षा पुनम जाधव, नगसेविका शारदाकाकू ढोरे, नगरसेवक राजेंद्र कुडे, चंद्रजीत वाघमारे, दिलीप म्हाळसकर, प्रविण चव्हाण, गणेश जाधव आणि नगरपंचायत अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
१४ एप्रिल हा दिवस "वर्ल्ड नॉलेज डे" म्हणूनही संपूर्ण देशभर साजरा केला जातो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने त्यांना मानवंदना देण्यासाठी मिलिंदनगर मधील कु. नम्रता प्रवीण भालेराव व कु. श्रेया राजेंद्र ओव्हाळ या दोन विद्यार्थीनींनी सलग अठरा तास अभ्यास करुन बाबासाहेबाना मानवंदना देण्याचा दृढ विश्वास पूर्ण केला.