काष्टीत महात्मा जोतिबा फुले यांना अभिवादन

     श्रीगोंदा : काष्टी (ता.श्रीगोंदा) गावातील संतवाडी येथे स्मृतिदिनानिमित्त महात्मा जोतिबा फुले यांना अभिवादन करण्यात आले.

mahatma_jyotiba_phule_punyatithi_Kashti      अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत सदस्य चांगदेव पाचपुते होते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ बहि:शाल विभागाचे प्रा. प्रशांत खामकर यांचे यावेळी व्याख्यान झाले. प्रास्ताविक अखिल भारतीय माळी महासंघाचे जिल्हाध्यक्ष निवृत्ती शेलार यांनी केले.

    रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य बाजीराव कोरडे व रयतचे माजी लाईफ मेंबर रंगनाथ राजपुरे यांनी विचार व्यक्त केले. यावेळी अखिल भारतीय माळी महासंघाचे उपाध्यक्ष दादा गोरख कोकाटे, लेखाधिकारी निवृत्ती खेतमाळीस, डॉ. संजय कोकाटे, गंगाराम कोकाटे, सचिन कोकाटे, ओंकार कोकाटे, सागर शिंदे, सागर चव्हाण, मदन गडदे, दादाराम कोकाटे, रफिक शेख उपस्थित होते.