पारशिवनी तालुक्यातील कोलितमारा येथील रहिवासी रामदास सोमकुवर यांच्या मुलीचा मंगल परिणय सोहळा अमन सभागृह पारशिवनी येथे दि.७ नोव्हेंबर २०२१ रोजी आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी रामटेक विधानसभा निर्वाचन क्षेत्राचे आमदार आशिषबाबू जयस्वाल प्रामुख्याने उपस्थित होते. मंगल परिणय सोहळ्याच्या निमित्ताने रामदासजी सोमकुवर यांचे स्वलिखित पुस्तक जंगल झाडीमुळे माणसाचे परिवर्तन आणि माझा जंगल खजिनां पेंच या दोन पुस्तकाचे प्रकाशन व पुस्तक स्टाॅलचे उत्घाटन आमदार आशिष जयस्वाल यांच्या हस्ते करण्यात आले. याच दिवशी प.पु. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा शाळा प्रवेश दिन विद्यार्थी दिवस असल्याने संविधान प्रस्ताविकेचे वाचन डॉ.इरफान अहमद यांचे द्वारे वधू-वर, उपस्थित प्रमुख अतिथी व निमंत्रित सर्व पाहुणेमंडळींनी केले. याप्रसंगी आमदार आशिष जयस्वाल म्हणाले की, असा आगळावेगळा मंगल परिणय सोहळा पारशिवनी तालुक्यात पहिल्यांदाच होत आहे की, ज्यामध्ये वधूवरांना भेट स्वरूपात पुस्तके, महापुरुषांचे विचार,बोधिवृक्ष देण्यात येत आहे. रामदासजी जंगलझाडीतील दुसरे मारुती चितमपल्ली आहे,असे मत व्यक्त केले.