समाजवादी विचारवंत छोटे लोहिया जनैश्वरजी मिश्र

     समाजवादी विचारवंत छोटे लोहिया स्व. जनेश्वर मिश्रा (५ ऑगस्ट १९३३ - २२ जानेवारी २०१०) हे समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रति लोहीया म्हणून सर्वत्र परिचित होते. सामान्य कार्यकर्ता ते केंद्रीय विविध खात्यांचे मंत्री ते भारतीय संसदेचे सदस्य होते आणि त्यांनी भारतीय संसदेच्या वरिष्ठ सभागृह राज्यसभेत उत्तर प्रदेशचे त्यानी. प्रतिनिधित्व केले होते. समाजवादी विचारसरणीशी असलेल्या त्यांच्या एकनिष्ठ वचनबद्धतेमुळे, त्यांना स्व डॉ राम मनोहर लोहिया यांच्या संदर्भात छोटे लोहिया ( लोहिया कनिष्ठ ) म्हणून त्यांची ओळख होती.

Samajwadi Vicharvant Chhote Lohia Janeshwar Mishra

     त्यांचा जन्म ५ ऑगस्ट १९३३ रोजी बालिमा येथील शुभनयहिन (शुभंथली) गावात झाला. त्यांच्याकडे बी.ए. आणि एल.एल.बी. पदवी होती. ते पूर्णानंद इंटर कॉलेजच्या विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष होते आणि त्यांनी अलाहाबाद विद्यापीठातही शिक्षण घेतले. त्यांच्या विद्यार्थी जीवनात ते समाजवादी युवाजन सभेत सामील झाले आणि डॉ. राम मनोहर लोहिया आणि राज नारायण यांची भेट घेतली. लोकसभा त्यांनी प्रयागराज लोकसभा मतदारसंघाचे तीनदा प्रतिनिधित्व केले. ते पहिल्यांदा १९६९-७० मध्ये इंदिरा गांधी मंत्रिमंडळातील पेट्रोलियम मंत्री के. डी. गालवीय यांचा पराभव करून प्रयागराज जिल्ह्यातील फुलपूर मतदारसंघातून लोकसभेचे सदस्य बनले. त्यानंतर, त्यांनी १९७७ च्या निवडणुकीत प्रयागराज लोकसभा मतदारसंघातून व्ही. पी. सिंह यांचा सुमारे ९०,००० मतांनी पराभव केला. त्यांनी १९७७-८० मध्ये सहाव्या लोकसभेचे आणि १९८९-९१ मध्ये नवव्या लोकसभेचे सदस्य म्हणून काम केले व्ही पी सिंह यांच्या मंत्रिमंडळात केंद्रीय मंत्री म्हणून काम केले.१९९६ मध्ये ते राज्यसभेवर निवडून गेले. २०००आणि २००६ मध्ये ते पुन्हा राज्यसभेवर निवडून गेले. अशा महान समाजवादी विचारवंत छोटे लोहिया जनैश्वरजी मिश्र यांचा २२ जानेवारी २०१० रोजी अलाहाबाद येथील तेज बहादूर सानू रुग्णालयात हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. त्यांच्या मृत्यूच्या वेळी ते समाजवादी पक्षाचे उपाध्यक्ष आणि राज्यसभेचे सदस्य होते. त्यांच्या पश्चात दोन मुली आहेत, त्यापैकी एक मीना तिवारी आहे. उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव राजकारणात प्रवेश करण्याचे श्रेय जनेश्वर मिश्रा यांना देतात. या विचारवंत नेत्याला मला १९९६ साली खा राज बब्बर व मा आ डॉ एम एस अजीज साहेब यांच्या मुळे अनेकदा भेटण्याचे भाग्य मिळाले जवळून सहवास लाभला ते अत्यंत शांत समाजवादी विचारवंत साथी होते त्यांना आज त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन

लेखक - डॉ राजेंद्र मुरलीधर सानप, संचालक - महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघ, इंद्रप्रस्थ कॉलनी नगर रोड बीड, मो.नं. ९४२००१९५९७