डॉ. महेंद्र धावडे, राजकीय विश्लेषक
चर्चेची पार्श्वभूमी अशी की महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या नेतृत्वबदलाच्या आणि दिल्लीवारीच्या चर्चा नेहमीच रंगत असतात. त्यातच 'देवेंद्र फडणवीस केंद्रात जाणार आणि राज्याची कमान चंद्रशेखर बावनकुळे सांभाळणार' या विधानाने राजकीय वातावरण तापवले आहे.
देवेंद्र फडणवीस हे सध्या महाराष्ट्राचे “मी पुन्हा येईन” या घोषणेने व त्यांनी त्यासाठी केलेल्या फोडा-फोडीच्या निमित्ताने राजकारणातील अनुभवी आणि एक खंबीर मुख्यमंत्री म्हणून ओळखले जातात, तर चंद्रशेखर बावनकुळे हे तेली समाजाचे व भाजपचे संकटमोचक आणि पक्षाचे प्रमुख ओबीसी (OBC) चेहरा आहेत.

दिल्लीच्या राजकारणातील संभाव्य 'पंतप्रधान' पदाचे दावेदार म्हणून फडणवीस यांच्याकडे पाहिले जात आहे कारण जे दिल्लीतील राजकीय वर्तुळात मोठ्या घडामोडी घडत आहेत प्रशासकीय कामाचा दांडगा अनुभव आणि अफाट राजकीय चातुर्य आहे. मिडियाला समोर जाण्याची कुवत आणि संघाचा आशीर्वाद व भाजपातील अंतर्गत वाद तसेच नरेंद्र मोदी यांच्या विरोधात असलेल्या राजकीय पक्षांचे नेतृत्व हे फक्त मॅनेज करू शकतात असा चेहरा म्हणून फडणवीस यांचे कडे संघ पाहत आहे.
भविष्यात फडणवीस दिल्लीत गेले, तर ते भाजपचे राष्ट्रीय पातळीवरील सर्वात प्रमुख आणि तरुण चेहऱ्यांपैकी एक असतील. त्यांच्यात भविष्यातील पंतप्रधान (PM) होण्याची क्षमता असल्याचे त्यांचे समर्थक आणि काही राजकीय विश्लेषक बोलून दाखवतात.
राष्ट्रीय स्तरावर पायाभूत सुविधा ,आर्थिक धोरणे आणि संघटन कौशल्य मजबूत करण्यासाठी फडणवीस यांच्यासारख्या 'व्हिजनरी' नेत्याची केंद्राला गरज आहे कारण भाजपा परतीच्या वाटेवर चालला आहे असे संघाच्या बौद्धिक मान्यवरांचा अंदाज आहे त्यामुळे जी राज्यात त्यांनी जुळवा जुळव करून आघाडी घेतली त्यामुळे केंद्रात गरज भासू शकते या दृष्टीने भाजपात व संघात आंतरिक चर्चा आहेत.
महाराष्ट्राचे संभाव्य ?
'मुख्यमंत्री'देवेंद्र फडणवीस दिल्लीत गेल्यास, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री (CM) म्हणून चंद्रशेखर बावनकुळे यांचे नाव आघाडीवर येणे स्वाभाविक आहे कारण त्यांनी नागपुरातील भाजप आणि संघ परिवाराला सोबत घेऊन समन्वय साधून आगळा वेगळा प्रयोग केला आहे.
बावनकुळे यांनी नागपूरच्या स्थानिक राजकारणापासून (जिल्हा परिषद सदस्य) ते राज्याचे महसूल मंत्री आणि भाजप प्रदेशाध्यक्ष पदापर्यंतचा प्रवास स्वतःच्या हिमतीवर केला आहे त्यामुळे अंतर्गत कलह दूर करण्याची हातोडी त्यांच्यात आहे आणि दुसरे कारण असे की तेली बहुसंख्य समाजाला आज पावेतो अन्य पक्षाने मुख्यमंत्री पदाची जबाबदारी दिलेली नाही त्यामुळे त्यांना मुख्यमंत्री पदावर विराजमान होण्याची संधी आहे.
बावनकुळे हे राज्यातील सर्वात मोठ्या संख्येने असलेल्या तेली समाजाचे आहेत आणि त्यांच्या पासून कोणताही धोका निर्माण होणार नाही याची संघ व भाजपाला खात्री आहे.महाराष्ट्रासारख्या जातीपातीच्या समीकरणांमध्ये महत्त्वाच्या असणाऱ्या राज्यात, एका सक्षम तेली व्यक्ती कडे मुख्यमंत्रीपद जाणे हे भाजपसाठी राजकीयदृष्ट्या प्रचंड फायदेशीर ठरू शकते.
संपूर्ण महाराष्ट्रात भाजपचे संघटन मजबूत करण्यात आणि 'महायुती'मध्ये समन्वय साधण्यात बावनकुळे यांनी नेहमीच मोलाची भूमिका बजावली आहे.
स्वतंत्र विदर्भ राज्य
प्रधानमंत्री पदी देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री पदी चंद्रशेखर बावनकुळे हे समीकरण जर कधी जुळून आले, तर तो विदर्भासाठी ऐतिहासिक क्षण असेल. दोन्ही नेते नागपूर (विदर्भ) परिसरातील असल्यामुळे फडणवीस यांनी जी प्रतिज्ञा घेतली होती ती म्हणजे “ *विदर्भ राज्य होई पर्यंत विवाह करणार नाही “* तो त्याच्या मनात सलत असलेला प्रश्न पूर्ण करण्यासाठी संघ व भाजपा असा प्रयोग करू शकतो यात शंका नाही.
अनेक वर्षा पासून विदर्भाची असलेली मागणी या मार्गाने पूर्ण झाल्यास विदर्भात भाजपला फायदा होईल आणि एक हाती सत्ता मिळेल असे चित्र निर्माण झाले आहे.
निष्कर्ष
"देवेंद्र फडणवीस पंतप्रधान आणि चंद्रशेखर बावनकुळे मुख्यमंत्री" हे चित्र सध्या एक 'भविष्यातील शक्यता' किंवा 'राजकीय तर्क' असले, तरी ते अशक्य नक्कीच नाही. दोन्ही नेत्यांची कामगिरी पाहता, जर भविष्यात राष्ट्रीय आणि राज्य पातळीवर अशी जबाबदारी मिळाली, तर ते महाराष्ट्राला व विदर्भाला विकासाच्या एका नव्या शिखरावर नेण्यास सक्षम आहेत. हे समीकरण भारतीय राजकारणाला एक नवी दिशा देणारे ठरेल यात शंका नाही.
डॉ. महेंद्र धावडे, राजकीय विश्लेषक