इंजि. प्रदीप ढोबळे यांच्या आरक्षणाची पोटदुखी या पुस्तकाला पुरस्कार - भारतीय पिछडा शोषित संघटनेच्या वतीने कार्यक्रम
नांदेड - येथील भारतीय पीछडा शोषित संघटन जिल्हा शाखेच्या वतीने राज्यस्तरावरील ओबीसी लेखकाला या वर्षापासून स्मृतीशेष प्रा. हरी नरके फुले-आंबेडकरी विचारधारा साहित्या पुरस्कार देण्याचे ठरले आहे. त्या अनुषंगाने संघटने अंतर्गत पुरस्कार निवड व वितरण समितीने २०२४ या वर्षातील पहिला राज्यस्तरीय पुरस्कार मुंबई येथील ओबीसी सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष, विचारवंत तथा फुले-आंबेडकरी विचाराचे व्याख्याते, लेखक इंजि. प्रदीप ढोबळे यांच्या 'आरक्षणाची पोटदुखी' या पुस्तकास जाहीर झाला आहे. हा पुरस्कार स्वर्गीय नागोजीराव भुमन्ना आक्केमवाड यांच्या स्मरणार्थ दिल्या जातो.