महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील सावित्रीमाईंच्या लेकी झाल्या साक्षीदार ! .. धरणगावकर झाले या ऐतिहासिक अधिवेशनाचे साक्षीदार !.....
धरणगांव - जळगाव जिल्ह्यातील सत्यशोधक कार्यकर्ते या ऐतिहासिक अधिवेशनाचे साक्षीदार झाले. सत्यशोधक समाज संघातर्फे सावित्रीमाई फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त आणि सत्यशोधक समाज संघाच्या १५० सुवर्ण वर्षपूर्तीच्या निमित्त सत्यशोधक समाजाचे राज्यस्तरीय पहिले महिला अधिवेशन नायगाव, तालुका खंडाळा येथे उत्साहात झाले. सर्वप्रथम सर्व महिला ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले यांचे घर व स्मारकाला अभिवादन करून नायगाव गावातील सरपंच साधनाताई नेवसे यांनी क्रांतीची मशाल घेऊन रॅलीची सुरुवात करण्यात आली. रॅलीमध्ये सर्व बहुजन महामानव व महामातांच्या घोषणा दिल्या गेल्या. यानंतर रैली ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले सभा मंडपामध्ये आले. पहील्या सत्राच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सत्यशोधक समाज महिला संघाच्या अध्यक्षस्थानी वंदनाताई बनकर होत्या. प्रमुख वक्त्या स्मिताताई पानसरे, अँड वैशालीताई डोळस, सुजातालाई मुख, दर्शनाताई पवार, अँड. वासंती नलावडे, जेवूनिस्सा शेख उपस्थित होत्या.
यानंतर सत्यशोधक समाज संघाच्या वतीने हरी नरके लिखित "ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले व पी डी पाटील लिखित "आदर्श महामाता पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. या अधिवेशनात विविध पुस्तकांचे स्टॉल लावण्यात आलेले होते. अधिवेशनाला आलेल्या महिलांनी हजारोच्या संख्येत पुस्तकाची खरेदी करून वैचारिक मेजवानी घेतली. सत्यशोधक समाज महिला संघाच्या वतीने विविध ठराव पारित करण्यात आले व सर्वांनी एकमताने मंजुरी देण्यात आली, महाराष्ट्रातून जास्तीत जास्त सत्यशोधक बंधू- भगिनींनी सहकुटुंब सहपरिवार या नायगाव येथील ऐतिहासिक महिला अधिवेशनाचे साक्षीदार झाले यांचा मनस्वी आनंद आहे. सूत्रसंचालन माधुरी खैरनार, प्रतिभा महाजन तर आभार अनुरीता झगडे, व कु. श्वेता शिंदे यांनी केले.
सत्यशोधक समाज संघाचे संस्थापक अध्यक्ष अरविंद खैरनार, सचिव सुरेश झाल्टे, कार्यक्रमाचे अध्यक्ष वंदनाताई वनकर, स्वागत समिती अध्यक्षा साधनाताई नेवसे, कार्याध्यक्ष रुपालीताई इंगोले. संयोजिका शिवमती उज्वला तांबे. डॉ. डी.बी. रोडे, विधेकर्ते साबुबा पांडव, रामचंद्र भागवत, विजय तुल्हे, पी डी पाटील, कैलास जाधव, शिवदास महाजन, रमेश वराडे, कविराज पाटील तसेच सर्व सत्यशोधक समाज संघाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते अधिवेशन यशस्वीतेसाठी सर्वांनी परिश्रम घेतले.