सावित्रीच्या लेकींनी उचलला अधिवेशन यशस्वीतेचा एकजुटीने गोवर्धन
सत्यशोधक समाज स्थापनेच्या शतकोत्तर सुवर्ण वर्षपूर्ती व सत्यशोधका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतिदिनानिमित सत्यशोधक समाज संघ आयोजित राज्यस्तरीय पहिले महिला अधिवेशन रविवार दिनांक १० मार्च २०२४ रोजी नायगाव तालुका खंडाळा जिल्हा सातारा येथे होत आहे. त्या निमित्ताने सेवा त्याग आणि समर्पण वृत्तीने महाराष्ट्रातील सत्यशोधक समाजाच्या समस्त क्रियाशील कार्यकर्त्या तसेच समविचारी संघटनेतील महिला भगिनी एकजुटीने कुटूंबाची जबाबदारी सांभाळून तसेच अक्षरशः भुक तहान विसरून अधिवेशन यशस्वीतेसाठी जिवाचे रान करीत आहे. सत्यशोधक समाज महिला संघ आयोजित पहिलेच अधिवेशन ऐतिहासिक व संस्मरणीय व्हावे, नविन अभ्यासू कार्यक्षम व निर्भय माता भगिनी कार्यकत्थ ची भक्कम व अतूट फळी निर्माण होण्याचे उद्दिष्टे संमेलन पूर्वीच पूर्णत्वास येत असल्याचा सुखद प्रत्यय अधिवेशनाच्या सर्वस्तरीय जायत तयारी बघून येत आहे अशी सहर्ष भावना संमेलनाचे मुख्य संयोजक तथा सत्यशोधक संघाचे राज्य संस्थापक अध्यक्ष अरविंद खैरनार यांनी आमचे महाराष्ट्र सारथी दैनिकाचे विशेष प्रतिनिधी तथा संमेलनाचे प्रसिद्धी प्रमुख विजय लुल्हे यांच्याशी सुसंवाद साधतांना व्यक्त केल्या. नियोजनानुसार संमेलनाच्या यशस्वीतेसाठी स्वागत समिती, निष्पादन समिती, संयोजन समिती प्रसिद्ध समिती नियुक्त करून अहोरात्र नियोजनबद्ध कार्यवाही डोळ्यांत तेल घालून स्वागत समिती अध्यक्षा साधना नेवसे, कार्याध्यक्षा रुपाली इंगोले, संयोजि एकदिलाने, अदम्य जिद्दीसह अचूकतेने करीत आहेत. नोकरी, व्यवसाय, गृहोद्योग व कौटुंबिक जबाबदारी सांभाळयाची कसरत करूनही सावित्रीच्या लेकींनी केलेल्या कामांनी आम्ही थक झालो नव्हे अवाक झालो! अशी सह भावना सत्यशोधक समाज संघ संस्थापक अरविंद खैरनार व सचिव डॉ. सुरेश झाल्टे यांनी व्यक्त केली.
विविध संघटना व संस्थांचे अभूतपूर्व योगदान : महाराष्ट्रातून अनेकविध सत्यशोधक महिला संघ, सत्यशोधक ओबीसी परिषद, महासंघ, अ. भा. फुले समता परिषद, संत शिरोमणी सावता माळी समाज मंडळ, माळी समाज सेवा संस्था, माळी सेवा संघ, सावित्रीबाई फुले महिला मंडळ, आम्ही सावित्रीच्या लेकी क्रांतीज्योती महिला संघटना, भारतीय बौद्ध महासभा संघर्ष वहिनी, जिजाऊ ब्रिगेड, विदर्भ तेली समाज, गुरुदेव सेवाश्रम मंडळ समाजक्रांती यांसह विविध समविचारी संघटना यांनी संमेलन यशस्वी करण्याचा विडा उचलला असून त्याप्रमाणे बेभानपणे कार्यवाही करीत आहेत, अशी माहिती अधिवेशन तथा सामाजिक कार्यकत्यां शशिवमती उज्वला तांबे ( शिरवळ ) यांनी महाराष्ट्र सारथीचे तुल्हे यांना दिली.
फुलेप्रेमी अजीत जाधव यांचा प्रतिमा व पुस्तक भेट देण्याचा प्रेरक संकल्प फलटण येथील महात्मा फुले प्रेमी अजीत जाधव यांनी प्रेरणादायी संकल्प केला आहे. अधिवेशनातील उपस्थित भगिनींना ते महात्मा जोतिराव फुले वसीयती सावित्रीमाई फुले यांची प्रतिमा मोफत वितरण करणार आहेत तसेच मान्यवरांना क्रांतीज्योती काव्य संग्रह (संपादित) - रासकर जाधव, गार्ड हे पुस्तक सप्रेम भेट देणार संपादक आहेत. कार्याध्यक्ष रूपाली इंगोले ( उद्योजिका पुणे) सुसंवादात म्हणाल्या की, 'पहिल्या महिला अधिवेशनास महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आणि विविधस्तरातून ज्येष्ठ तसेच उत्साही नुतन कार्यकर्त्या बहुसंख्येने येवून क्रांतीज्योती सावित्री माईच्या जन्म तपोभूमीला अभिवादन करण्याचे पुर्णसंचित मिळावे आणि कार्यऊर्जा घेऊन उपेक्षित, वंचित व पददलीत अन् अन्याय ग्रस्त आबालवृद स्त्रियांच्या उन्नती, व्यावसायिक व शैक्षणिक समृद्धीसाठी प्रेरणा आणि मार्गदर्शन घेण्यासाठी त्यांच्यात विधायक अहमहमिका लागली आहे.
अधिवेशनाला येणाऱ्या हजारो कार्यकत्यांचा निरंतर संपर्क : विभागीय नेतृत्वशील कार्यकत्यां चे फोन अविरत येत असून आजतायत झालेल्या संवादा नुसार छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातून १५० पुणे- १३० सातारा १२५ कोकण १२० नागपुर 900 नगर ९० बीड व बुलढाणा १५० लोणंद- ७५. कोल्हापूर ६०, सांगली - ५०, सोलापूर ४५ कार्यकर्त्या येणार आहेत. येत्या २ दिवसात येणाऱ्या महिला भगिनी व कार्यकत्यांची ही संख्या ५ पटीने निश्चित वाढणार असल्याचे इंगोले मॅडम विश्वासपूर्वक म्हणाल्या