बुलडाणा - नुकताच राज पत्राद्वारे जात पडताळणी अधिनियमाचा मसुदा प्रसिद्ध करण्यात आला आहे. यावर काही हरकती असल्यास १६ फेब्रुवारीपर्यंत नोंदवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने ओबीसी अधिकारी कर्मचारी संघाची व्हर्चुअल बैठक संघटनेचे राज्य सल्लागार डॉ. शिवशंकर गोरे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. या मसुद्यावर भाष्य करताना हा मसुदा ओबीसींसह अन्य मागास प्रवर्गावर अन्याय करणारा असल्याचे दिसून येत आहे. मोठ्या प्रमाणावर बोगस जात प्रमाणपत्र दिले जातील. तसेच अनेक गुतागुतीचे सामाजिक प्रश्न निर्माण होतील, असे मत डॉ. शिवशंकर गोरे यांनी व्यक्त केले.
त्यानंतर सर्वांच्या संमतीनुसार अधिसूचने विरोधात हरकती नोंदवण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. त्यामध्ये प्रामुख्याने दोन दिवस हरकती या ईमेल च्या माध्यमातून नोंदवून यांचे स्क्रीन शॉर्ट सोशल मीडियावर प्रसिद्ध करण्यात येतील. तसेच समाजातील व्यक्तीकडून मोठ्या प्रमाणात हरकती नोंदवण्यासाठी मसुद्यावर नाव, सही घेऊन पोस्ट केले जातील. सोबतच तालुका, जिल्हा पातळीवर निवेदनांच्या स्वरूपात हरकती संघटनेच्या वतीने नोंदवल्या जाणार आहेत. तर काही जिल्ह्यात हरकती नोंदवण्याच्या मसुद्याची हजारोंच्या संख्येत प्रिंट घेऊन घराघरापर्यंत पोहचून मसुदा वाटप केला जाईल. त्यानंतर हा मसुदा नागरिकांकडून पोस्ट केला जाईल. यावेळी संघटनेचे कोकण विभागीय अध्यक्ष विजय केसरकर, नागपूर विभागीय अध्यक्ष निवृत्ती तांगडे, राज्य महासचिव राम वाडीभष्मे, धुळे जिल्हा उपाध्यक्ष खुशाल चित्ते, सचिव मुरलीधर नान्हकर, हिंगोली जिल्हा कार्याध्यक्ष चंद्रकांत फुटके, जिल्हा सल्लागार पंढरीनाथ मुंढे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख विशाल जिरवनकर, हरिश्चंद्र गोलाईतकर, के. एम. जांभूटकर, नांदेड जिल्हाध्यक्ष रमेश गरुडकर, सातारा जिल्हाध्यक्ष भानुदास वासके, गणेश हिंगमीरे, महिला अध्यक्षा सुनीता लोहार, वाशीम जिल्हा प्रभारी केशव गिर्हे, जिल्हाध्यक्ष संभाजी साळसुंदर, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख अनिल बाली, यवतमाळ जिल्हाध्यक्ष शशिकांत लोळगे, जालना जिल्हा प्रभारी मौर्य आकाश मेहत्रे, जिल्हाध्यक्ष सुनील भाळतीलक, अहमदनगर जिल्हा प्रभारी रामदास डोईफोडे, छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रभारी संतोष तठे, भंडारा जिल्हा प्रभारी दामोदर डहाळे, श्रीराम काळे, बुलडाणा जिल्हाध्यक्ष किशोर पवार आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.